BenQ GV30 Portable Projector

BenQ GV30 हा एक Portable Projector आहे. याच्या माध्यमातून तुम्ही मोठ्या पडद्यावर क्रिकेटच्या सामन्याचा आनंद घेऊ शकता. तसेच, घरापासून लांब असल्यास मित्रांसोबत देखील क्रिकेट सामना पाहण्यासाठी याचा उपयोग होईल. BenQ GV30 या पोर्टेबल स्मार्ट वायरलेस प्रोजेक्टरमध्ये एकापेक्षा एक शानदार फीचर्स दिले आहेत. यामध्ये बिल्ट-इन २.१ चॅनेल स्पीकर्स, १३५ डिग्री प्रोजेक्शन, अँड्राइड टीव्ही ९.० आणि सिनेमॅटिक कलरसह येतो. या पोर्टेबल प्रोजेक्टरची किंमत ५२,५०० रुपये आहे.
BenQ X3000i

BenQ India द्वारे काही दिवसांपूर्वीच या शानदार प्रोजेक्टरला लाँच करण्यात आले आहे. BenQ X3000i प्रोजेक्टरची किंमत थोडी जास्त आहे. मात्र, याद्वारे तुम्ही घरीच मित्र आणि कुटुंबासोबत IPL चा आनंद मोठ्या पडद्यावर घेऊ शकता. हा प्रोजेक्टर एक कॉम्पॅक्ट डिव्हाइस आहे, जो स्ट्रीमिंगचा आनंद, चित्रपट पाहण्यासाठी आणि गेम खेळण्यासाठी उपयोगी येईल. तुम्हाला चित्रपट पाहायचो असो अथवा गेम खेळायची आहे, BenQ X3000i हा एक चांगला पर्याय आहे. याची किंमत जवळपास ४ लाख रुपये आहे.
V7050i

V7050i हा देखील BenQ चाच एक शानदार प्रोजेक्टर आहे. BenQ V5070i च्या माध्यमातून तुम्ही डोळ्यांना जास्त स्ट्रेस न देता घरीच थिएटरचा आनंद घेऊ शकता. या प्रोजेक्टरमुळे तुम्ही घरबसल्याच कोणताही नवीन चित्रपटचा आनंद घेऊ शकता. याशिवाय आयपीएल दरम्यान तुमच्या आवडीच्या संघाचे सामने देखील तुम्ही यावरून पाहू शकता. हे डिव्हाइस एक टेबलटॉप माउंटेड अल्ट्रा-शॉर्ट-थ्रो प्रोजेक्टर आहे. हा 4K HDR प्रोजेक्टर असून, यामध्ये अँड्राइड टीव्हीचा सपोर्ट दिला आहे. याची किंमत ५,४९,००० रुपये आहे.
W1800

या लिस्टमधील चौथा प्रोजेक्टर W1800 हा देखील BenQ कंपनीचाच आहे. BenQ W1800 हा एक ४के एचडीआर होम सिनेमा प्रोजेक्टर आहे. प्रोजेक्टरच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या क्लिअॅरिटीसह चित्रपट, सीरिजचा आनंद घेऊ शकता. हा प्रोजेक्टर मोशन, कॅडेंस, सिनेमॅटिक कलर, डायनॅमिक रेंज आणि ब्राइटनेससाठी एका खास मोडसह येतो. मोठ्या पडद्यावर चित्रपट, क्रिकेट सामने पाहण्यासाठी अनेकांकडून या प्रोजेक्टर पसंती दिली जाते. याची किंमत २,२५,०० रुपये आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times