टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नव-नवीन प्लान्स जबरदस्त फायद्यांसह ऑफर करत असतात. भारतातील Reliance Jio, भारती Airtel आणि Vodafone-Idea चे वर्चस्व कमी करण्यासाठी. बीएसएनएल देखील सतत एकापेक्षा एक भन्नाट प्लान आणत असते. ज्यात युजर्सना कमी किमतीत अनेक फायदे मिळतात. विशेष म्हणजे अनेक BSNL प्लान खाजगी ऑपरेटर्स पेक्षा खूपच स्वस्त आहेत. परंतु फायद्यांच्या बाबतीत ते अगदी टॉप आहेत. तुम्ही जर BSNL युजर्स असाल किंवा BSNL वॉर स्विच करायचा तुमचा विचार असेल तर, आज आम्ही तुम्हाला बीएसएनएलने ऑफर केलेल्या अशाच काही प्रीपेड प्लान्सबद्दल सविस्तर सांगणार आहोत. ज्यांची किंमत ५० ते २५० रुपयांच्या दरम्यान आहे. या योजना दीर्घ वैधता तसेच अनेक इंटरनेट आणि अनेक वैशिष्ट्यांसह येतात. जाणून घ्या BSNL च्या प्लान्सविषयी डिटेलमध्ये आणि खरेदी करा स्वतःसाठी बेस्ट प्लान.

२४७ रुपयांचा प्लान

BSNL चा २४७ रुपयांचा प्लान : या BSNL रिचार्ज प्लानमध्ये एकूण ५० GB डेटा उपलब्ध आहे, वैधतेच्या बाबतीत सांगायचे तर, या प्लानची वैधता 30 दिवसांची आहे. हाय स्पीड डेटा संपल्यानंतर इंटरनेट ८० Kbps च्या वेगाने काम करते. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर, या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. याशिवाय, या प्लानमध्ये दररोज १०० मेसेजेस उपलब्ध आहे. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, BSNL Tunes आणि Eros Now Entertainment Services या प्लानमध्ये प्रवेश मिळवतात.

१९८ रुपयांचा प्लान

BSNLचा १९८ रुपयांचा प्लान : २०० रुपयांच्या बजेटमध्ये जर तुम्हाला प्लान हवा असेल तर, कंपनीकडे जबरदस्त प्लान आहे. BSNLच्या १९८ रुपयांच्या या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज २ GB डेटा मिळतो. वैधतेच्या बाबतीत सांगायचे तर, या प्लानमध्ये तुम्हाला ५० दिवसांची वैधता मिळेल. यानुसार एका महिन्यात एकूण १०० GB डेटा BSNLच्या १९८ रुपयांच्या या प्लानमध्ये मिळेल. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हा कंपनीचा डेटा प्लान आहे.

१८५ आणि १८७ रुपयांचा प्लान

BSNL १८५ आणि १८७ रुपयांचा प्लान : BSNL च्या १८५ रुपयांच्या पुढील प्लानमध्ये ग्राहकांना १ GB डेटा देण्यात येतो. तसेच, यात अनलिमिटेड व्हॉइस कॉल्सची सुविधा देखील मिळते. या प्लानमध्ये तुम्हाला २८ दिवसांच्या वैधतेसाठी दररोज १०० SMS मिळतात. हा प्लान बीएसएनएल ट्यून्समध्ये प्रवेश देखील प्रदान करतो. बजेट युजर्ससाठी हा एक चांगला प्लान आहे. telco चा Voice_१८७ पॅक, २८ दिवसांच्या वैधतेसाठी १०० SMS/ दिवसासह कंपनी यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल ऑफर करते . परंतु १८७ रुपयांमध्ये २ GB डेटा प्रतिदिन मिळतो.

११८ आणि १४७ रुपयांचा प्लान

BSNL चा ११८ आणि १४७ रुपयांचा प्लान: या प्लानमध्ये इतर बेनिफिट्स देखील मिळतात. डेटा ऑफरसह येणाऱ्या पॅकबद्दल बोलायचे झाल्यास, BSNL च्या STV_११८ प्लानची किंमत ११८ रुपये आहे आणि २६ दिवसांच्या वैधतेच्या कालावधीसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलसह यात ग्राहकांना दररोज ०.५ GB डेटा ऑफर करण्यात येतो. तर, दुसरीकडे, telco कडून STV_१४७ पॅक, अनलिमिटेड व्हॉइस कॉलसह येतो. यात एकूण १० GB डेटा आणि १४७ रुपयांमध्ये ३० दिवसांच्या वैधता कालावधीसाठी BSNL ट्यूनमध्ये प्रवेश प्रदान करतो.

२५० रुपयांपेक्षा कमी किमतीचे प्लान्स

BSNL कडे २५० रुपयांपेक्षा कमीमध्ये आहेत हे प्लान्स: BSNL कंपनी ग्राहकांना खूपच स्वस्तात काही प्लान्स ऑफर करते. तुम्ही BSNL चे ४९ आणि ९९ रुपयांचे प्लान खरेदी करू शकता. BSNL च्या ४९ रुपयांच्या प्लानमध्ये २४ दिवसांसाठी एकूण २ GB डेटासह १०० मिनिटे मोफत व्हॉईस कॉल्स मिळतात. दुसरीकडे, BSNL चा STV_९९ पॅक २२ दिवसांच्या वैधतेसाठी ९९ रुपयांमध्ये बेसिक अनलिमिटेड व्हॉईस कॉल ऑफर करतो. कंपनीकडे व्हॉईस_१३५ पॅक देखील आहे. जो १३५ रुपयांमध्ये २४ दिवसांच्या वैधतेसाठी ११४० मिनिटे व्हॉइस कॉल ऑफर करतो.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here