Tecno Pop 5 LTE

तुम्ही हा फोन २ जीबी रॅम + ३२ जीबी इंटरनल स्टोरेजसह ६,७९९ रुपयांना Amazon India वरून खरेदी करू शकता. Dual सिम सपोर्टसह येणारा हा फोन अँड्राइड १० गो एडिशनवर काम करतो. यात ६.५२ इंच एचडी+ आयपीएस एलसीडी (७२०x१५६० पिक्सल) डिस्प्ले आहे. यात ऑक्टा-कोर यूनिसोक SC९६८३ प्रोसेसरसोबत ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. स्टोरेजला मायक्रोएसडी क्रार्डने २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता .फोटोग्राफीसाठी यात Dual रियर कॅमेरा सेटअप असून याचा मुख्य सेंसर ८ मेगापिक्सल आणि दुसरा दोन मेगापिक्सल आहे.
Redmi 9A Sport

सेलमध्ये Redmi 9A Sport अतिशय कमी किमतीत खरेदी करू शकणार आहात. हा फोन Amazon India वर ६,९९९ रुपयांच्या किंमतीसह लिस्ट झाला आहे. या फोनचे स्टोरेज ३२ GB पर्यंत आहे. ज्यामध्ये तुम्हाला ५१२ GB पर्यंत microSD कार्ड सपोर्ट मिळेल. पॉवरसाठी, Redmi 9A सपोर्टमध्ये ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी, १० W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी, यात ३.५ mm ऑडिओ जॅक, 4G LTE, वाय-फाय आणि मायक्रो-USB पोर्ट समाविष्ट आहे. या फोनमध्ये AI फेस अनलॉक सपोर्ट देण्यात आला आहे.
Realme Narzo 5oi

२ GB रॅम आणि ३२ GB इंटर्नल स्टोरेजने सुसज्ज असलेल्या या फोनची किंमत Amazon India वर ७, ४९९ रुपये आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने या फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ६.५ इंच डिस्प्ले आहे. यात ऑक्टा-कोर SC९६८३A प्रोसेसरसह २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज मिळते. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डने २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता. तसेच, पॉवरसाठी ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. हा फोन अँड्राइड ११ वर काम करतो.
JioPhone Next

२ GB रॅम आणि ३२ GB इंटर्नल स्टोरेजने सुसज्ज असलेल्या या फोनची किंमत Amazon India वर सध्या ५,५५० रुपये आहे. फोनमध्ये ६० Hz च्या रिफ्रेश रेट आहे. JioPhone Next च्या डिस्प्लेबद्दल सांगायचे तर यामध्ये ५.४५ इंच एचडी+ टचस्क्रीन डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोनची टच स्क्रीन आउटडोर प्रकाशात देखील व्यवस्थित दिसते. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस १३ -मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि समोर ८ -मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. Jio चा हा फोन ३५०० mAh रिमूव्हेबल बॅटरीसह येतो. बजेट बायरसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
Realme C11 2021

हा फोन फ्लिपकार्टवर ७,४९९ रुपयांच्या किंमतीसह लिस्ट आहे. २ GB रॅम आणि ३२ GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये UniSoc SC9863A प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनी फोनमध्ये ६.५ -इंचाचा डिस्प्ले देत आहे. त्याच वेळी, फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये ८-मेगापिक्सलचा प्रायमरी आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. हा Realme मोबाइल फोन Android 11 वर आधारित Realme UI २.० वर चालतो. डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर, या हँडसेटमध्ये तुम्हाला ६.५ -इंचाचा HD+ डिस्प्ले मिळेल. फोन ८९.५ टक्के स्क्रीन टू बॉडी रेशो आणि २०:९ आस्पेक्ट रेशो सह येतो.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times