नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी एअरटेलने युजर्संना डोळ्यासमोर ठेवून अनेक प्रीपेड प्लान लाँच केले आहेत. भारतातील मोठी टेलिकॉम कंपनीपैकी एक असलेल्या ४ जी आणि ३ जी सेवा देशभरात देत आहे. कंपनी वेगवेगळ्या किंमतीचे रिचार्ज प्लान्स ऑफर करीत आहे. एअरटेलचे टॉप १० प्लानची खास यादी तुमच्यासाठी देत आहोत. पाहा कोणता प्रीपेड प्लान तुमच्यासाठी खास आहे.

१९ रुपयांचा प्लान
या प्लानची वैधता दोन दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग सोबत २०० एमबी डेटा दिला जातो. अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग देणारा कंपनीचा हा सर्वात स्वस्त प्लान आहे.

४८ रुपयांचा प्लान
या प्लानची वैधता ४८ दिवसांसाठी आहे. यात ३ जीबी डेटा मिळतो. परंतु, यात व्हाईस कॉलची सुविधा मिळत नाही.

९८ रुपयांचा प्लान
एअरटेलच्या या प्लानमध्ये व्हाईस कॉलिंगची सुविधा युजर्संना मिळत नाही. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये ६ जीबी डेटा मिळतो.

२४९ रुपयांचा प्लान
कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग करण्यासाठी हा प्लान बेस्ट आहे. यात दररोज १.५ जीबी डेटा आणि १०० एसएमएस फ्री मिळतात. या प्लानची वैधता २८ दिवस इतकी आहे.

३४९ रुपयांचा प्लान
या प्लानमध्ये अॅमेझॉन प्राईम सब्सक्रिप्शन मिळते. तसेच सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळते. या प्लानची वैधता २८ दिवसाची आहे. या प्लानमध्ये युजर्संना दररोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळतात.

३७९ रुपयांचा प्लान
कंपनीच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा तसेच ६ जीबी डेटा आणि ९०० एसएमएस मिळतात. या प्लानची वैधता ८४ दिवस आहे.

३९९ रुपयांचा प्लान
या प्लानची वैधता ५६ दिवसाची आहे. या प्लानमध्ये ५६ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटा आणि १०० एसएमएस फ्री मिळतात. तसेच अनलिमिटेड व्हाईस कॉलिंगची सुविधा आहे.

४४९ रुपयांचा प्लान
या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सह दररोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस फ्री मिळतात. या प्लानची वैधता ५६ दिवस आहे.

५५८ रुपयांचा प्लान
या प्लानची वैधता ५६ दिवस आहे. यात सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच दररोज ३ जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळतात.

६९८ रुपयांचा प्लान
या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जातो. ८४ दिवसांची वैधता मिळते. अनलिमिटेड व्हाईस कॉलिंगसह २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस फ्री मिळतात.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here