फसवणूक करणारे देखील वेग-वेगळ्या मार्गाने फ्रॉड्स करत असलयाचे दिसून येते आहे. गेल्या काही काळात स्मार्टफोन हॅकिंगचे प्रमाण तर वाढलेच आहे. परंतु, Sim swapping आणि सिम कार्डच्या माध्यमातून देखील फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. स्कॅमर्स तुमच्या सिमकार्डचा चुकीचा वापर करून तुम्हाला मोठ्या अडचणीत आणू शकतात. म्हणूनच सिम कार्ड वापरतांना काळजी आवश्यक घेणे आवशयक आहे. आजकाल सर्व जण फोन वापरतात. मग तो स्मार्टफोन असेल किंवा फीचर फोन. फोनमध्ये मोबाईलमध्ये सिमकार्ड देखील असतेच हे वेगळे सांगायची गरज नाही. कारण, त्याशिवाय मोबाईल फोन निरुपयोगी आहे. पण एक छोटेसे सिमकार्ड तुम्हाला तुरुंगात पाठवू शकते. हे कदाचित तुम्हाला माहित नसेल. तुमच्या सिमकार्डचा चुकीच्या पद्धतीने वापर करून फसवणूक करणारे तुमचे मोठे नुकसान करू शकतात. म्हणून हे वापरतांना लक्ष देणे आवश्यक आहे.

​याकडे द्या लक्ष

जर तुमच्या मोबाईलवर नेटवर्क नसेल आणि तुम्हाला बराच वेळ SMS आला नसेल, तर तुमच्या सेवा प्रदात्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो. काही सर्व्हिस प्रोव्हायडर्स सिम स्वॅप करण्यापूर्वी टेक्स्ट नोटिफिकेशन पाठवतात. तुम्ही सावधगिरीचा उपाय म्हणून काही गोष्टी करू शकता. सोशल मीडिया साइटवर तुमचा फोन नंबर सार्वजनिक करणे टाळा. डिव्हाइसवर अँटी-फिशिंग आणि मालवेअर विरोधी संरक्षण इन्स्टॉल करा. जर तुमची बँक तुमच्या सर्व बँकिंग Activities साठी एसएमएस आणि ईमेल सूचना देत असेल, तर दोन्ही पर्याय निवडा.

Sim Swapping चा देखील बसू शकतो फटका

sim-swapping-

सिम कार्ड स्वॅपचा देखील बसू शकतो फटका: सिम कार्ड स्वॅपिंगचे नाव तम्ही ऐकले असेलच. आजकाल सिम कार्ड स्वॅपिंगचा वापर करून अनेक गैरव्यवहार होत असलयाचे समोर येत आहे. सिम कार्ड स्वॅपिंगमुळेही तुमचे नुकसान होऊ शकते. सिम कार्ड स्वॅपिंग दुसरे-तिसरे काहीही नसून म्हणजे सिम कार्ड बदलणे. आजकाल, हे फसवेगिरीचे एक नवीन साधन बनले आहे, जे आपल्या नकळत घडते. फसवणूक करणारे त्याच नंबरचे दुसरे सिम कार्ड जारी करतात. त्यानंतर OTP / Details टाकून तुमच्या बँक खात्यातील संपूर्ण पैसे ते चुकीच्या पद्धतीने मिळवू शकतात .

​धमकी देण्यासारखे सारखे प्रकार

धमकी देण्यासारखे सारखे प्रकार घडू शकतात : जर तुमचे सिम कार्ड एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडले आणि समोरच्या व्यक्तीने तुमच्या नंबरवरून दुसऱ्या व्यक्तीला कॉल करून असभ्य भाषा वापरली किंवा त्या व्यक्तीला धमकी दिली. तर अशा परिस्थितीत तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते. म्हणूनच नेहमी असा सल्ला दिला जातो की, तुमच्याकडे जास्ती सिम कार्ड असले तरीही, तुमच्या अगदी व्यक्तींना सुद्धा तुमचे सिम कार्ड देऊ नका. असे केल्यास कधी-कधी दुसऱ्या व्यक्तीमुळे तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

सिम कार्डमुळे होऊ शकते फसवणूक

सिम कार्डच्या चुकीच्या वापरामुळे होऊ शकते तुमची फसवणूक: एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, तुमचे सिम कार्ड कधीही चुकीच्या व्यक्तीच्या हाती जाता कामा नये. यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. समोरच्या व्यक्तीने तुमच्या सिमकार्डने काही फसवणूक केली किंवा त्याचा कोणत्याही प्रकारे गैरवापर केला तर, त्यासाठी तूम्हाला तुरुंगात टाकले जाऊ शकते. तसेच, तुमचे सिम कार्ड हरवले तर लगेच नंबर बंद करा. अन्यथा, सिम कार्ड चुकीच्या पद्धतीने वापरल्यास तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here