नवी दिल्लीः व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर करोना व्हायरसच्या ज्या पद्धतीने चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहे. अशा फेक बातम्यांची व्हॉट्सअॅपने गंभीर दखल घेतली आहे. करोना संदर्भातील बातम्या, व्हिडिओ, फोटोमधून अफवा पसरवल्याने व्हॉट्सअॅपने मोठा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअॅपने एकाचवेळी पाच जणांना मेसेज फॉरवर्डींग करण्यात येत असलेल्या मेसेजवर मर्यादा आणली आहे. युजर्स आता केवळ एकाच व्यक्तीला करू शकणार आहे. याआधी एकाचवेळी पाच व्यक्तींना मेसेज पाठवता येवू शकत होता.
करोना व्हायरसला रोखण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू असताना व्हॉट्सअॅपवर काही जण जाणीवपूर्वक मेसेजमधून फेक बातम्या व्हायरल करीत आहेत. या फेक बातम्या पसरू नये, यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times