Vivo T1 5G

Vivo T1 5G स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत १५,९९० रुपये आहे. फोनमध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा डिस्प्ले दिला आहे. यात 5G-रेडी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ SoC चा सपोर्ट मिळतो. याच्या डिस्प्लेच्या टॉपवर दिलेला ड्यूड्रॉप नॉच थोडा जुना वाटू शकतो, परंतु याचा डिस्प्ले २४० हर्ट्ज टच सँपलिंग रेटसह येतो. याचा फायदा गेमर्सला होईल. फोनमध्ये १८ वॉट चार्जिंग सपोर्टसह पॉवरफुल बॅटरी दिली असून, डिव्हाइस ५जी कनेक्टिव्हिटीसह येतो. याच्या ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेजची किंमत १६,९९० रुपये आहे.
Moto G71 5G

Moto G71 5G स्मार्टफोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १८,९९९ रुपये आहे. हा फोन अँड्राइड ११ वर काम करतो. कंपनी पुढील अपडेट देखील देण्याची शक्यता आहे. ५जी कनेक्टिव्हिटीसह येणाऱ्या या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ SoC चा सपोर्ट मिळतो. यामध्ये फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तर सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे.
Redmi Note 11T 5G

Redmi Note 11T 5G स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंशन ८१० चिपसेटचा सपोर्ट दिला आहे. गेमर्ससाठी हा बजेट फोन चांगला पर्याय आहे. यामध्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि २४० हर्ट्ज टच सँपलिंग रेटसह येणारा डिस्प्ले दिला आहे. तसेच, ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी देखील तुम्हाला यात मिळेल. फोनला पाणी आणि धुळीपासून सुरक्षेसाठी आयपी५३ रेटिंग मिळाले आहे. फोनच्या ६ जीबी + ६४ जीबी व्हेरिएंटची किंमत १५,९९९ रुपये आणि ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १६,९९९ रुपये आहे.
OPPO A74 5G

OPPO A74 5G स्मार्टफोनमध्ये ६.४९ इंच FHD+ पंच-होल डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन २४००x१०८० पिक्सल आहे. तर स्क्रीन टू बॉडी रेशियो ९०.५ टक्के आहे. फोनमध्ये ५जी कनेक्टिव्हिटीसह Qualcomm Snapdragon ४८० ५G प्रोसेसर दिला आहे. तसेच, पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. हँडसेटमध्ये फोटोग्राफीसाठी रियरला ४८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल आणि फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनच्या ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १६,९९० रुपये आहे.
Samsung Galaxy M32 5G

Samsung Galaxy M32 5G च्या ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १८,९९९ रुपये आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये ६.५ इंच HD+ डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आहे. डिस्प्ले गोरिल्ला ग्लास ५ प्रोटेक्शनसह येतो. यात फोटोग्राफीसाठी रियरला ४८ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल +५ मेगापिक्सल आणि फ्रंटला १३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. यात मीडियाटेक डायमेंसिटी ७२० प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. तर पॉवरसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल.
(नोट – वरील स्मार्टफोन्सच्या किंमतीत ऑफर्स आणि व्हेरिएंटनुसार बदल होऊ शकतो.)
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times