आजपासून (२६ मार्च) IPL 2022 सुरू होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेट चाहते आयपीएल सुरू होण्याची वाट पाहत आहे. आपल्या आवडत्या खेळाडू आणि संघाला पुन्हा एकदा मैदानावर खेळताना पाहण्याची सर्वांनाच आतुरता आहे. जवळपास पुढील दोन महिने क्रिकेट चाहत्यांसाठी ही पर्वणी असणार आहे. तुम्ही आयपीएलचा आनंद टीव्हीवर तर घेऊ शकताच, मात्र तुम्हाला फोनवर देखील मोफत मॅच पाहता येईल. अनेक टेलिकॉम कंपन्या आपल्या रिचार्ज प्लानमध्ये मोफत Disney+Hotstar चे सबस्क्रिप्शन देत आहे. त्यामुळे तुम्हाला कोठुनही घरबसल्या आयपीएलचा आनंद घेता येणार आहे. यातच आता देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स Jio ने आयपीएल सुरू होण्याआधी खास Cricket Add-On Prepaid Plan लाँच केला आहे. यामुळे तुम्ही खूपच कमी किंमतीत आयपीएलचा आनंद घेऊ शकता. या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Jio चा २७९ रुपयांचा प्लान

jio-

रिलायन्स जिओने आयपीएल सुरू होण्याआधी आपल्या ग्राहकांसाठी खास २७९ रुपयांचा क्रिक्रेट अ‍ॅड-ऑन प्लान सादर केला आहे. हा प्लान डिज्नी+ हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शनसह येतो. आजपासून आयपीएल सुरू होणार असून, या प्लानच्या माध्यमातून तुम्ही सामन्यांचा आनंद घेऊ शकता. प्लानसोबत Disney+Hotstar Mobile चे १ वर्षाचे सबस्क्रिप्शन मिळेल. तसेच, १५ जीबी हाय-स्पीड इंटरनेट देखील मिळते. यामुळे यूजर्सला वेगळे सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही. परंतु, हा नवीन प्लान ठराविक यूजर्ससाठीच असून, तुम्ही MyJio मध्ये तुमच्यासाठी प्लान उपलब्ध आहे की नाही याची माहिती घेऊ शकता. या प्लानमध्ये कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळत नाही.

(वाचा – धमाकेदार सेल! ५०MP कॅमेऱ्यासह येणाऱ्या Infinix च्या ‘या’ फोन्सला खूपच स्वस्तात खरेदीची संधी, पाहा ऑफर्स )

​जिओचा ४९९ रुपयांचा प्लान

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio कडे Disney+ Hotstar च्या सबस्क्रिप्शनसह येणारे अनेक प्लान्स उपलब्ध आहेत. कंपनीकडे ४९९ रुपये किंमतीचा शानदार प्रीपेड प्लान उपलब्ध आहे. या प्लानची वैधता २८ दिवस आहे. प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा या प्रमाणे एकूण ५६ जीबी डेटाचा फायदा मिळतो. प्लानचे वैशिष्ट्ये म्हणजे यात मोफत Disney+ Hotstar चे मोबाइल सबस्क्रिप्शन दिले जात आहे. सोबतच, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएस देखील मिळतील.

(वाचा – स्मार्ट टीव्ही खरेदी करतांना खूप पैसे खर्च करण्याआधी ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष, नुकसान होणार नाही )

​जिओचा ६०१ रुपयांचा प्लान

टेलिकॉम कंपनी Reliance Jio कडे ६०१ रुपये किंमतीचा शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानची वैधता २८ दिवस असून, यात दररोज ३ जीबी डेटाचा फायदा मिळेल. अशाप्रकारे, प्लानमध्ये एकूण ८४ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये देखील तुम्हाला Disney+ Hotstar चे मोबाइल सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे. म्हणजेच, आयपीएल पाहण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. तसेच, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची देखील सुविधा मिळते.

(वाचा – वॉटर रेसिस्टेंस, वॉटर रिपेलेंट आणि वॉटर वॉटरप्रूफ स्मार्टफोनमध्ये नक्की फरक काय? जाणून घ्या सर्वकाही )

​Vodafone Idea आणि Airtel चे स्वस्त प्लान्स

vodafone-idea-airtel-

Vodafone Idea आणि Airtel च्या प्लान्समध्ये देखील डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. Vodafone Idea च्या ६०१ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटासह डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. तर Airtel च्या ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटासह डिज्नी+ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. या दोन्ही प्लान्सची वैधता २८ दिवस असून, यामध्ये यूजर्सला देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसमएसची सुविधा मिळते.

(वाचा – Amazon चा धमाकेदार सेल! लॅपटॉप, टीव्हीसह ‘या’ गेमिंग प्रोडक्ट्सवर ५०% डिस्काउंट, पाहा डिटेल्स )

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here