फोनचा वापर आता पूर्वीप्रमाणे फक्त कॉलिंग पुरता मर्यादित नसून अनेक कामं देखील आजकाल स्मार्टफोन्स वरून करता येतात. आजकालच्या स्मार्टफोन्समध्ये असलेल्या कॅमेरांमुळे तर लोकांना प्रोफेशनल कॅमेरांचा विसर पडला आहे. विशेष म्हणजे हे स्मार्टफोन्स सर्वांच्या बजेटमध्ये येतील अशा किमतीत उपलब्ध आहेत. तुम्हाला जर फोटो काढायला आवडत असेल आणि चांगल्या कॅमेरा स्मार्टफोनवर अपग्रेड करायच्या विचारात जर तुम्ही असाल तर, ही माहिती तुमच्यासाठी. भारतात Vivo पासून Redmi पर्यंत अनेक स्मार्टफोन आहेत, जे वेगवेगळ्या फीचर्ससह येतात. विशेष म्हणजे या स्मार्टफोन्समध्ये अधिक रॅम आणि स्टोरेज आहे. आज आम्ही ५० मेगापिक्सल कॅमेरा लेन्स असलेल्या काही जबरदस्त स्मार्टफोन्सबद्दल सविस्तर माहिती देणार आहो. हे मोबाइल फोन तुम्ही फ्लिपकार्ट, Amazon आणि स्थानिक बाजारातून खरेदी करू शकता. जाणून घ्या या फोन्सविषयी सविस्तर . नोट-व्हेरियंटनुसार किमती बदलू शकतात.

Redmi Note 11

redmi-note-11

Redmi Note 11 तुम्हाला १४,११५ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या फोनमध्ये ६ GB रॅम आणि ६४ GB इंटरनल स्टोरेज आहे. तसेच, यात ६.४३ -इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये ५००० mAh बॅटरी देण्यात आली असून ३३ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह आहे. फोन मागील बाजूस क्वाड-कॅमेरा सेटअप पॅक करतो. ज्यामध्ये ५० MP मुख्य कॅमेरा, ८ MP अल्ट्रावाइड कॅमेरा, २ MP मॅक्रो कॅमेरा आणि २ MP डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी यात ८ MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये ६.४३ -इंचाचा फुल HD + AMOLED डिस्प्ले आहे. जो ९० Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो.

वाचा: ऑफरर्सचा पाऊस ! बेस्ट फीचर्ससह येणाऱ्या ‘या’ शानदार स्मार्टफोन्सवर अनेक जबरदस्त डील्स, पाहा लिस्ट

Samsung Galaxy F23 5G

samsung-galaxy-f23-5g

Samsung Galaxy F23 5G मध्ये, 1 TB पर्यंतचे SD कार्ड बसवता येऊ शकते. याच्या मागील पॅनलवर ५० मेगापिक्सेल कॅमेरा आहे. तसेच ८-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. या मोबाईलमध्ये ५००० mAh बॅटरी आहे. यात स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर आहे. Galaxy F23 5G स्मार्टफोन Android १२ आधारित OneUI ४.१ वर काम करतो. यामध्ये ६.६ इंच Full HD+ स्क्रीन दिली आहे. जी १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि गोरिल्ला ग्लास ५ प्रोटेक्शनसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ५जी, ४जी, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, एनएफसी, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि ३.५ एमएम ऑडिओ जॅक मिळतो.

वाचा:Lenovo, HP, Acer सह ‘हे’ पॉप्युलर लॅपटॉप्स मिळताहेत फक्त ३० हजारात, संधी गमावू नका, पाहा लिस्ट

Vivo T1 5G

vivo-t1-5g

Vivo T1 5G स्मार्टफोन नुकताच भारतात लाँच करण्यात आला आहे. या मोबाईलची सुरुवातीची किंमत १५,९९० रुपये आहे. या किंमतीत ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे. या मोबाईलच्या मागील पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा आहे. यात १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये ६.५८ इंच फुल एचडी+ (१०८०x२४०८ पिक्सल) आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. विवोच्या या डिव्हाइसमध्ये स्नॅपड्रॅगन ६९५ ५जी प्रोसेसर देण्यात आले आहे.

वाचा: ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास एक छोटेसे सिम कार्ड सुद्धा तुम्हाला जेलमध्ये पाठवू शकते, पाहा डिटेल्स

Realme C35

realme-c35

Realme C35 फोन ११,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा फोन ४ GB रॅम आणि ६४ GB इंटर्नल स्टोरेजसह येतो. यामध्ये १ TB पर्यंतचे SD कार्ड बसवता येते. रियलमीचा हा स्मार्टफोन iPhone 13 सारख्या डिझाइनसह येतो. याचा कॅमेरा सेटअप देखील आयफोनप्रमाणेच आहे. या फोनच्या मागील पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा ५० मेगापिक्सेल आहे. यात ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. Realme C35 स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये ६.६ इंच फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे.

वाच:ऑफरर्सचा पाऊस ! बेस्ट फीचर्ससह येणाऱ्या ‘या’ शानदार स्मार्टफोन्सवर अनेक जबरदस्त डील्स, पाहा लिस्ट

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here