तुम्हाला गाणी ऐकण्याची अथवा गेम खेळण्याची आवड असेल व नवीन हेडफोन्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर भारतीय बाजारात अनेक चांगल्या कंपन्यांचे हेडफोन्स उपलब्ध आहेत. नोकिया ब्रँडचे अनेक चांगले हेडफोन्स देखील कमी किंमतीत तुम्ही खरेदी करू शकता. नोकिया केवळ स्मार्टफोन आणि फीचर फोन्सपर्यंत मर्यादित नसून, कंपनीने भारतात इतर प्रोडक्ट्स देखील लाँच केले आहेत. यातीलच एक प्रोडक्ट इयरफोन असून, हे खूपच कमी किंमतीत उपलब्ध आहे. ब्रँडने वेगवेगळ्या प्राइस सेगमेंटमध्ये इयरफोन्स आणि इयरबड्सला लाँच केले आहे. याची सुरुवाती किंमत फक्त २९९ रुपये आहे. तुम्ही कमी किंमतीत Nokia Wired Buds, Nokia नेकबँड ब्लूटूथ हेडसेट, Nokia T3020 ब्लूटूथ हेडसेट आणि Nokia Lite इयरबड्सला खरेदी करू शकता. दमदार फीचर्ससह येणाऱ्या या प्रोडक्ट्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Nokia Wired Buds

nokia-wired-buds

Nokia Wired Buds ची किंमत खूपच कमी आहे. कंपनीचा हा वायर्ड हेडफोन चार रंगात येतो. तुम्ही हेडफोनला ब्लू, ऑरेंज, व्हाइट आणि ब्लॅक या रंगात खरेदी करू शकता. यामध्ये १०mm चे ड्राइव्हर्स दिले आहेत. तसेच, १.२एम फ्लॅट केबल मिळते, जी मायक्रोफोनसह येते. या हेडफोनमध्ये तुम्हाला एक बटन देखील मिळेल. या बटनाच्या मदतीने तुम्ही कॉल रिसिव्ह आणि डिसकनेक्ट करू शकता. Nokia Wired Buds ची किंमत फक्त २९९ रुपये आहे.

(वाचा – Amazon चा धमाकेदार सेल! लॅपटॉप, टीव्हीसह ‘या’ गेमिंग प्रोडक्ट्सवर ५०% डिस्काउंट, पाहा डिटेल्स )

Nokia नेकबँड ब्लूटूथ हेडसेट

nokia-

Nokia नेकबँड ब्लूटूथ हेडसेट हे ई-कॉमर्स साइट Flipkart वर खूपच कमी किंमतीत उपलब्ध आहे. या नेकबँड हेडफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ व्हर्जन ५.१ दिले आहे. याची वायरलेस रेंज १० मीटर आहे. तसेच, यात ११ एमएमचे शानदार ड्राइव्हर्स कंपनीने दिले आहेत. कंपनीचा दावा आहे की, याची बॅटरी सिंगल चार्जमध्ये १४ तास टिकते. तसेच, डिव्हाइस रॅपिड चार्ज सपोर्टसह येतो. कंपनीनुसार, नेकबँडला केवळ १० मिनिटं चार्ज करून ९ तास वापरू शकता.

(वाचा – वॉटर रेसिस्टेंस, वॉटर रिपेलेंट आणि वॉटर वॉटरप्रूफ स्मार्टफोनमध्ये नक्की फरक काय? जाणून घ्या सर्वकाही )

Nokia T3020 ब्लूटूथ हेडसेट

nokia-t3020-

तुम्हाला गाणी ऐकण्याची आवड असल्यास Nokia T3020 ब्लूटूथ हेडसेट एक चांगला पर्याय आहे. याची किंमत दोन हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या ब्लूटूथ हेडसेटमध्ये वॉइस असिस्टेंट सपोर्ट, दमदार बॅटरी लाइफ, वॉटर आणि मॉयस्चर रेसिस्टेंट सारख्या अनेक फीचर्सचा सपोर्ट मिळतो. Nokia T3020 ब्लूटूथ हेडसेट ला तुम्ही ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वरून फक्त १,७९९ रुपयात खरेदी करू शकता. या प्रोडक्टसोबत कंपनी १ वर्षाची वॉरंटी देखील देत आहे.

(वाचा – स्मार्ट टीव्ही खरेदी करतांना खूप पैसे खर्च करण्याआधी ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष, नुकसान होणार नाही )

Nokia Lite इयरबड्स

nokia-lite-

Nokia लाइट इयरबड्सला तुम्ही प्रमुख ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून फक्त २,७९९ रुपयात खरेदी करू शकता. यामध्ये ६ तासांची दमदार बॅटरी लाइफ मिळते. तसेच, टच कंट्रोल सपोर्ट दिला आहे. नोकियाचे हे शानदार इयरबड्स प्रीमियम डिझाइन आणि स्टूडिओ ट्यून्ड साउंड क्वालिटीसह येतात. यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.० चा सपोर्ट दिला असून, याचे रेंज १० मीटर आहे. यात ४०० एमएएचची बॅटरी दिली असून, USB टाइप-सी चार्जिंग पोर्ट मिळतो.

वाचा – मोफत घ्या IPL चा आनंद! Jio ने लाँच केला खूपच स्वस्त क्रिकेट प्लान; १५ GB डेटासह हॉटस्टार फ्री

Nokia Power Earbuds Lite

nokia-power-earbuds-lite

Nokia Power Earbuds Lite ला तुम्ही ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून ३,३९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. यामध्ये ३५ तासांपर्यंत प्ले टाइम मिळतो. तसेच, कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.० चा सपोर्ट दिला आहे. बड्स क्रिस्टल क्लिअर साउंड आणि नॉर्डिक डिझाइनसह येतात. पाण्यापासून सुरक्षेसाठी या बड्सला IPX७ रेटिंग मिळाले आहे. यात टच कंट्रोल सपोर्ट देखील दिला आहे. याशिवाय, नोकियाच्या या बड्समध्ये चार्जिंगसाठी type-C USB cable मिळेल.

(नोट – वरील हेडफोन्सच्या किंमतीत ऑफर्सनुसार बदल होऊ शकतो.)

वाचा – धमाकेदार सेल! ५०MP कॅमेऱ्यासह येणाऱ्या Infinix च्या ‘या’ फोन्सला खूपच स्वस्तात खरेदीची संधी, पाहा ऑफर्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here