तुम्हाला जर लॅपटॉप, नवीन स्मार्टफोन, स्मार्टबँड किंवा ईयरबड्स खरेदी करायचे असतील तर तुमच्याकडे जबरदस्त संधी आहे. ही सर्व डिव्हाइसेस तुम्ही स्वस्तात घरी आणू शकता. फ्लिपकार्टवर Flipkart Electronics Sale नामक सेल २७ मार्चपासून सुरू झाला आहे. ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारची इलेक्ट्रॉनिक उत्पादने अतिशय स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे . Flipkart Electronics Sale मध्ये स्मार्टफोन, स्मार्टवॉच, इअरबड्स आणि लॅपटॉप (लॅपटॉप) सारखी अनेक डिव्हाइसेस मोठया डिस्काउंटसह खरेदी करू शकता. यामध्ये Asus Vivo Book 14 thin and lite laptop, Lenovo M7 HD टॅब्लेट,बोल्ट ऑडिओ एअर-बेस एक्स-पॉड्स, Realme 9 5G, Realme 9 Pro, Realme 9 Pro Plus 5G सारख्या प्रोडक्टसवर जबरदस्त ऑफ देण्यात येत आहे. या सेलच्या सर्वोत्तम ऑफर्सवर एक नजर टाका आणि खरेदी करा हे प्रोडक्टस. करा मोठी सेव्हिंग.

Asus VivoBook 14

asus-vivobook-14

Asus VivoBook 14 slim and lite laptop: Asus चा ४०,९९० रुपयांचा लॅपटॉप ३४,९९० रुपयांना विकला जात आहे. तो खरेदी करताना CITI बँकेचे कार्ड वापरून तुम्ही २ हजार रुपयांची बचत करू शकता आणि तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास तुम्हाला आणखी १८,१०० रुपयांची सूट मिळेल. अशा प्रकारे, तुम्ही Asus लॅपटॉप Rs १४,८९० मध्ये खरेदी करू शकता.

Lenovo M7 HD टॅब्लेट: लेनोवोचा हा ७-इंचाचा वायफाय-ओन्ली टॅबलेट ९,९९० रुपयांऐवजी ७,९९९ रुपयांना विकला जात आहे. तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात हे डिव्हाईस खरेदी करून तुम्ही तब्बल ७,४५० रुपयांपर्यंत बचत करू शकता. तुम्हाला या ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास, लेनोवो टॅब्लेटची किंमत तुमच्यासाठी ५४९ रुपये असेल.

वाचा : सेफ WhatsApp एक्स्पीरियंससाठी ‘या’ ५ महत्वाच्या गोष्टी प्रत्येक युजरला माहित असायलाच हव्या

Boult Audio Airbass XPods

boult-audio-airbass-xpods

Boult Audio Airbass XPods : २० तासांचा प्लेबॅक टाइम असलेला हा ब्लूटूथ हेडसेट ४,९९९ रुपयांऐवजी १,२९९ रुपयांना खरेदी करता येईल. तुम्ही Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरून ५ % चा कॅशबॅक मिळवू शकता, ज्यामुळे तुम्हाला Boult Audio Airbass XPods Earbuds १,२३४ मध्ये खरेदी करता येतील.यरबड्स मध्ये दमदार साउंडसाठी 13mm चे ड्रायव्हर दिले आहेत. बड्सची डिझाइन खूपच जबरदस्त आहे. तसेच सहज फिट होते. ब्लूटूथ ५.१ कनेक्टिविटीला सपोर्ट करणाऱ्या बड्स मध्ये IPX5 रेटिंग आहे.

वाचा :‘या’ कारणांमुळे लवकर संपतोय तुमचा मोबाईल डेटा, बदला ५ सेटिंग्स, १.५ GB डेटा देखील चालणार खूप

Realme Band 2

realme-band-2

रियलमी बँड 2: Realme चा हा फिटनेस बँड आणि स्मार्टवॉच ३,४९९ रुपयांऐवजी २,१९९ रुपयांना उपलब्ध आहे. रियलमी बँड 2 खरेदी करण्यासाठी Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरून, तुम्हाला ५ % चा कॅशबॅक मिळू शकेल. ज्यामुळे Realme Band 2 ची किंमत २,०२९ रुपयांवर येईल. यात अनेक स्पोर्ट मोड्स आहेत. ज्यात सायकलिंग, चालणे आणि धावणे यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, एसपीओ 2 सह हार्ट-रेट सारखे महत्वाचे सेन्सर बँड 2 मध्ये उपलब्ध असतील. Realme Band 2 मध्ये २०४ mAh ची बॅटरी आहे.

वाचा : बापरे! तुमचा Facebook डेटा चोरतंय हे App ,फोनमध्ये असेल तर लगेच करा Delete, अन्यथा होईल नुकसान

​Poco M3 Pro 5G

poco-m3-pro-5g

Poco M3 Pro 5G: १७,७९९९ रुपये किंमतीचा हा 5G स्मार्टफोन २२ % च्या सवलतीनंतर १३,९९९ रुपयांना विकला जात आहे. जर तुम्ही तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात हा फोन खरेदी केला आणि तुम्हाला या ऑफरचा पूर्ण फायदा मिळाला , तर तुम्ही १३ हजार रुपये अधिक वाचवू शकता, ज्यामुळे Poco M3 Pro 5G फक्त ९९९ रुपयांना खरेदी करता येईल.फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ प्रोटेक्शन मिळते. हँडसेटमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डाइमेंसिटी ७०० प्रोसेसर प्रोसेसर देण्यात आला आहे. पॉवरसाठी फोनमध्ये ५०००एमएएचची दमदार बॅटरी मिळेल.

वाचा : जबरदस्त ! ‘ही’ लोकप्रिय कंपनी भारतात सहा स्मार्टफोन्स लाँच करण्याच्या तयारीत, तुम्ही कोणता खरेदी करणार?

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here