नवी दिल्लीः चीनची कंपनी शाओमीचा रेडमी के ३० प्रो झूम एडिशन चा १२ जीबी रॅमचा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत ४४९९ युआन म्हणजेच जवळपास ४७ हजार ९०० रुपये आहे. लाँचिंग दरम्यान कंपनीने हा स्मार्टफोन ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजमध्ये लाँच केला होता. या दोन्ही फोनची किंमत अनुक्रमे चिनी युआन ३७९९ म्हणजेच ४१ हजार रुपये आणि ३९९० चिनी युआन म्हणजेच ४३ हजार रुपये होती.

redmi k30 pro zoom edition फोनचे खास वैशिष्ट्ये

या स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. हा फोन अँड्रॉयड १० वर आधारीत एमआययूआय ११ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ ५जी चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. पॉवरसाठी फोनमध्ये ४७०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. ३३ वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट करते.

redmi k30 pro zoom edition चा कॅमेरा
फोटोग्राफीसाठी रियरमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. पहिला ६४ मेगापिक्सलचा, दुसरा ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स, तिसरा १३ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स आणि चौथा २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये फ्रंटला २० मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी ५ जी कनेक्टिविटी, वाय फाय, ब्लूटूथ आणि यूएसबी पोर्ट टाइप सी यासारखे फीचर्स दिले आहेत. या फोनचे वजन २१८ ग्रॅम इतके आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here