सध्याच्या काळात आधार कार्ड (Aadhaar Card) हे एक महत्त्वाचे कागदपत्रं झाले आहे. प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड उपयोगी येते. अगदी बँक खाते उघडण्यापासून ते नवीन सिम कार्ड खरेदी करायचे असेल, प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड महत्त्वाचे झाले आहे. महत्त्वाचे कागदपत्रं असण्यासोबतच ओळखीचा पुरावा म्हणून देखील आधार उपयोगी येते. आधार कार्डचा जसजसा वापर वाढत चालला आहे, तसतसे याचा वापर करून फसवणुकीच्या घटना देखील समोर येत आहे. कोणीही तुमच्या आधार कार्डचा उपयोग करून बनावट सिम कार्ड खरेदी करू शकते. तसेच, अनेक बेकायदेशीर कामासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बँकिंग फ्रॉडपासून वाचण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. अशा Financial Fraud पासून वाचण्यासाठी UIDAI ने नागरिकांना आधार कार्डला लॉक आणि अनलॉक करण्याची देखील सुविधा दिली आहे.

​UIDAI ने ट्विट करत दिली माहिती

uidai-

UIDAI ने आपल्या अधिकृत ट्विटरच्या माध्यमातून आधार कार्डधारकांना नवीन सुविधेची माहिती दिली आहे. यामुळे कार्डधारक आधार कार्ड नंबरला ऑनलाइन लॉक आणि अनलॉक करू शकतात. एकदा आधार कार्ड नंबरला लॉक केल्यास याचा वापर Authentication साठी करता येणार नाही. नागरिकांना आधार नंबरचा उपयोग करण्यासाठी पुन्हा अनलॉक करावे लागेल. मात्र, ऑथेंटिकेशनसाठी VID म्हणजेच Virtual ID असणे गरजेचे आहे. या Virtual ID द्वारे तुम्ही सहज आधार कार्डला लॉक आणि अनलॉक करू शकता.

वाचा: iPhone 14 ची किंमत आली समोर, iPhone 13 पेक्षा स्वस्त असण्याची शक्यता; फीचर्सचाही खुलासा

​Virtual ID असणे गरजेचे

virtual-id-

आधार कार्ड नंबरला लॉक अथवा अनलॉक करण्यासाठी तुमच्याकडे व्हर्च्यूअल आयडी (Virtual ID) असणे गरजेचे आहे. Virtual ID नसल्यास तुम्ही आधारला लॉक अथवा अनलॉक करू शकणार नाही. जर तुमच्याकडे व्हर्च्यूअल आयडी नसल्यास तुम्ही १९४७ यावर मेसेज पाठवू शकता. तसेच, वेबसाइटवरून VID Generator च्या मदतीने देखील तुम्हाला Virtual ID मिळेल. UID ला लॉक केल्यानंतर बायोमेट्रिक डेटा जसे की फिंगरप्रिंट्स आणि आयरिस इत्यादी लॉक होते.

वाचा: Realme 9 Series च्या स्मार्टफोन्समध्ये युजर्सना मिळणार १०८ MP Pro Light कॅमेरा, पाहा डिटेल्स

​असा लॉक करा आधार नंबर?

 • आधार कार्ड नंबरला लॉक करण्यासाठी UIDAI च्या वेबसाइटवर जा.
 • यानंतर My Aadhaar पर्यायावर क्लिक करा.
 • आता Aadhaar Services ऑप्शनवरील Aadhaar lock/unlock या पर्यायावर क्लिक करा.
 • आता व्हर्च्यूअल आयडी (Virtual ID), पिन कोड आणि कॅप्चा कोड टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करा.
 • यानंतर रजिस्टर्ड मोबाइलवर तुम्हाला एक ओटीपी येईल. तो व्हेरिफाय करून Enable वर क्लिक करा.
 • ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर लॉक होईल.

वाचाः Nokia ने गुपचूपणे लाँच केले दोन सर्वात स्वस्त फोन, फुल चार्जिंगमध्ये १८ दिवसांपर्यंत चालणार बॅटरी

​असा अनलॉक करा आधार नंबर?

 • आधार कार्ड नंबरला अनलॉक करण्यासाठी UIDAI ची अधिकृत वेबसाइट www.uidai.gov.in वर जा.
 • त्यानंतर My Aadhaar पर्यायावर क्लिक करा.
 • आता Aadhaar Services ऑप्शनवरील Aadhaar lock/unlock या पर्यायावर क्लिक करा.
 • आता Unlock UID वर क्लिक करून व्हर्च्यूअल आयडी (Virtual ID) आणि सिक्योरिटी कोड टाका.
 • आता Send OTP वर क्लिक करा आणि ओटीपी टाकल्यानंतर सबमिटवर क्लिक करा.
 • या प्रोसेसनंतर तुमचा आधार नंबर अनलॉक होईल.

वाचाः ८ हजारांच्या बजेटमध्ये लाँच झाला Redmi चा शानदार स्मार्टफोन, कमी किंमतीत मिळतील जबरदस्त फीचर्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here