टेलिकॉम कंपन्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) निमित्ताने Disney+ Hotstar सबस्क्रिप्शनसह येणारे प्लान्स ऑफर करत आहेत. खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडियाकडे Disney+ Hotstar सबस्क्रिप्शनसह येणारे अनेक प्लान्स आहेत. या प्लान्समध्ये यूजर्सला वर्षभरासाठी प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शन मिळत आहे. यातच आता वोडाफोन आयडियाने (Vodafone Idea) ग्राहकांसाठी दोन नवीन प्लान्स सादर केले आहेत. या प्लानची किंमत ४९९ रुपये आणि १,०६६ रुपये असून, यामध्ये Disney+ Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. ओटीटी सबस्क्रिप्शनसह या प्लान्समध्ये यूजर्सला डेली डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज मोफत एसएमएसची देखील सुविधा मिळत आहे. Vodafone Idea कडे Disney+ Hotstar च्या मोफत सबस्क्रिप्शनसह येणारे ५ प्लान्स उपलब्ध आहेत. या स्वस्त प्लान्समध्ये मिळणाऱ्या शानदार बेनिफिट्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Vodafone Idea चा ४९९ रुपयांचा प्लान

vodafone-idea-

टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडियाकडे (Vodafone Idea) ४९९ रुपये किंमतीचा शानदार प्रीपेड प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता २८ दिवस आहे. म्हणजेच, संपूर्ण कालावधीसाठी एकूण ५६ जीबी डेटा तुम्हाला मिळेल. याशिवाय, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. या प्लानमध्ये दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय, वर्षभरासाठी Disney+ Hotstar Mobile चे सबस्क्रिप्शन मिळेल.

वाचा: सोशल मीडियावर #BoycottPatanjali ट्रेंड सुरू होताच भन्नाट मिम्स व्हायरल

​Vodafone Idea चा १,०६६ रुपयांचा प्लान

vodafone-idea-

Vodafone Idea ने १,०६६ रुपयांचा आणखी एक प्लान यूजर्ससाठी आणला आहे. १,०६६ रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सला दररोज २ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता ८४ दिवस आहे. यामध्ये कंपनी १ वर्षासाठी Disney+ Hotstar Mobile चे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे. याशिवाय, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच, दररोज १०० मोफत एसएमएस देखील या प्लानमध्ये मिळतात. आयपीएलचा आनंद घेण्यासाठी हा प्लान चांगला आहे.

वाचा: १ एप्रिलपासून देशभरात नवे कस्टम नियम; काय स्वस्त होणार व काय महाग होणार, पाहा संपूर्ण लिस्ट

​Vodafone Idea चा ६०१ रुपयांचा प्लान

vodafone-idea-

वोडाफोन आयडियाकडे (Vodafone Idea) ६०१ रुपये किंमतीचा शानदार प्रीपेड प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा मिळेल. याशिवाय, कंपनी अतिरिक्त १६ जीबी डेटा देखील देत आहे. या प्लानची वैधता २८ दिवस आहे. वीआयच्या या प्रीपेड प्लानमध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच, दररोज १०० मोफत एसएमएस मिळतात. यात १ वर्षासाठी Disney+ Hotstar Mobile सबस्क्रिप्शन दिले जाते.

वाचा: ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास एक छोटेसे सिम कार्ड सुद्धा तुम्हाला जेलमध्ये पाठवू शकते, पाहा डिटेल्स

​Vodafone Idea चा ९०१ रुपयांचा प्लान

vodafone-idea-

Vodafone Idea (वीआय) चा ९०१ रुपयांचा प्रीपेड प्लान हा ७० दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा आणि अतिरिक्त ४८ जीबी डेटा कंपनी देत आहे. याशिवाय, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा देखील मिळते. यात दररोज १०० मोफत एसएमएस दिले जात आहेत. तसेच, आयपीएलचा मोफत आनंद घेण्यासाठी तुम्हाला १ वर्षासाठी Disney+ Hotstar Mobile चे सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

वाचा: ‘ही’ भन्नाट ट्रिक वापरल्यास WhatsApp कॉलमुळे लवकर संपणारा Mobile Data खूप दिवस चालणार

​Vodafone Idea चा ३,०९९ रुपयांचा प्लान

vodafone-idea-

या लिस्टमधील हा सर्वात महागडा प्लान आहे. वीआयच्या ३,०९९ रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला दररोज १.५ जीबी डेटाचा फायदा मिळेल. या प्लानची वैधता १ वर्ष म्हणजेच ३६५ दिवस आहे. यामध्ये वर्षभरासाठी देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची देखील सुविधा दिली जात आहे. प्लानमध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर यात १ वर्षासाठी Disney+ Hotstar Mobile चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

वाचा: एकच नंबर! अवघ्या १० सेकंदात १ लाखांपेक्षा अधिक यूनिट्सची विक्री, Realme च्या ‘या’ भन्नाट फोनचा बाजारात दबदबा

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here