Redmi 9 Power

फोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. संरक्षणासाठी कंपनीने कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 दिला आहे. या फोनमध्ये चार Rear कॅमेरे आहेत. ज्यामध्ये मुख्य लेन्स ४८ मेगापिक्सेल, दुसरा लेन्स ८ मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल, तिसरी लेन्स २ मेगापिक्सल मॅक्रो आणि चौथा लेन्स २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा लेन्स आहे. यात ६००० mAh बॅटरी आहे जी १८ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Redmi 9 पॉवरच्या ४ GB RAM सह ६४ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आहे, तर ४ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ११,९९९ रुपये आहे.
वाचा: UIDAI ने केले सावध, Aadhaar Card ला त्वरित ‘असे’ करा लॉक; चुकीच्या कामासाठी होऊ शकतो वापर
Samsung Galaxy M12

Samsung Galaxy M12: Samsung Galaxy M12 Android आधारित One UI Core OS वर काम करते आणि Samsung च्या इन-हाउस Exynos 850 SoC ने सुसज्ज आहे. हे डिव्हाइस दोन स्टोरेज प्रकारांमध्ये येते. ज्यात ४ GB + ६४ GB समाविष्ट आहे. Samsung Galaxy M12 ची किंमत १०,९९९ रुपये आणि ६ GB + १२८ GB आहे ज्याची किंमत भारतात १३,४९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन आकर्षक ब्लॅक, एलिगंट ब्लू आणि ट्रेंडी एमराल्ड ग्रीन कलर पर्यायांसह येतो. हा स्मार्टफोन साइड-माउंट केलेल्या फिंगरप्रिंट सेन्सरसह ६,००० mAh बॅटरी पॅक करतो.
Realme Narzo 50A

Realme Narzo 50A: ६.५ -इंचाच्या क्लासिक मिनी-ड्रॉप फुल स्क्रीन डिस्प्लेसह येतो आणि त्याची किंमत ११,४९९ रुपये आहे. मजबूत परफॉर्मन्ससाठी, स्मार्टफोनमध्ये Helio G85 गेमिंग प्रोसेसर आणि ६००० mAh बॅटरी आहे जी क्विक आणि रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते. कॅमेरा वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Realme Narzo 50A मध्ये 50MP AI ट्रिपल कॅमेरा आणि 8MP AI सेल्फी कॅमेरा आहे. ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये ५० MP प्रायमरी कॅमेरा, २ MP पोर्ट्रेट लेन्स आणि २ MP मॅक्रो लेन्सचा समावेश आहे.
वाचा: थिएटरची मजा देतात ‘हे’ जबरदस्त प्रोजेक्टर्स, मूव्हीज, IPL चा आनंद आता घरीच, पाहा किंमत-फीचर्स
Realme C15

Realme C15 स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा HD + LCD डिस्प्ले आहे. ज्याचा आस्पेक्ट रेशो २०:९ आहे. चांगल्या कामगिरीसाठी फोनमध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर आहे. हा नवीन स्मार्टफोन Android 10 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. कॅमेर्याबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आहे. याशिवाय, यूजर्सना या स्मार्टफोनमध्ये १८ W फास्ट चार्जिंगसह ६००० mAh बॅटरी आहे. Realme C15 स्मार्टफोनच्या ३ GB + ३२ GB वेरिएंटची किंमत ९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. त्याच वेळी, ४ GB + ६४ GB व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आहे.
Samsung Galaxy F22

Samsung Galaxy F22 ७२० × १६०० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.४० -इंच टचस्क्रीन डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले असून स्मार्टफोन ऑक्टा-कोर MediaTek Helio G80 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोन One UI 3.1 वर काम करतो जो Android 11 वर आधारित आहे. कंपनीने हा बजेट सेगमेंट स्मार्टफोन दोन स्टोरेज प्रकारांमध्ये लाँच केला आहे. ज्यात ४ GB + ६४ GB ची किंमत १२,४९९ रुपये आहे. फोनला अधिक पॉवरफुल बनण्यासाठी Samsung Galaxy F22 मध्ये ६००० mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times