आजकाल स्मार्टफोन मार्केटमध्ये रोज नव-नवीन स्मार्टफोन्स लाँच केले जातात असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. अनेक नामंकित कंपन्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना परवडतील आणि आवडतील असे स्मार्टफोन्स सादर करत असतात. ग्राहक देखील आजकाल नव-नवी स्मार्टफोन्सना अपग्रेड करत असतात. तुम्‍हीही स्‍वत:साठी नवीन स्‍मार्टफोन खरेदी करण्‍याचा विचार करत असाल, तर, तुमच्यासाठी सध्या मार्केटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गेल्या आठवड्यात अनेक भन्नाट स्मार्टफोन्सने बाजारात एन्ट्री घेतली आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला नुकतेच बाजारात लाँच झालेल्या काही उत्तम स्‍मार्टफोन्सबद्दल सविस्तर सांगणार आहोत. यामध्ये Samsung Galaxy M33 5G, Samsung Galaxy A73 5G, OnePlus 10 Pro 5G, Realme C31 आणि Poco X4 Pro 5G यांचा समावेश आहे. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.पाहा ही जबरदस्त लिस्ट आणि स्वतःसाठी खरेदी करा एक जबरदस्त स्मार्टफोन.

​Samsung Galaxy M33 5G

samsung-galaxy-m33-5g

Samsung Galaxy M33 5G मध्ये Android 12 आधारित One UI 4.1 आहे. याशिवाय, यात १२० Hz च्या Refresh rate सह ६.६ -इंचाचा फुल एचडी प्लस इन्फिनिटी डिस्प्ले आहे. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास ५ चे संरक्षण देण्यात आले आहे. फोनमध्ये ८ GB पर्यंत रॅम आणि १२८ GB पर्यंत स्टोरेज आहे. यात ५ nm Exynos प्रोसेसर आहे. RAM १६ GB पर्यंत वाढवता येते. यासाठी सॅमसंगने रॅम प्लस फीचर सुद्धा आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy M33 5G च्या ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत १८,९९९ रुपये आहे.

वाचा: स्मार्टफोनला हॅकर्सच्या नजरेपासून सेफ ठेवायचे असल्यास ट्राय करा ‘या’ भन्नाट टिप्स, डिव्हाइस राहील कायम सुरक्षित

Poco X4 Pro 5G

poco-x4-pro-5g

फोनमध्ये ६.६७ -इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्यूशन १०८० x २४०० पिक्सेल, रिफ्रेश रेट १२० Hz आणि २० : ९ आस्पेक्ट रेशो आहे. स्मार्टफोन ऑक्टा-कोर क्वालकॉम SM6375 स्नॅपड्रॅगन 695 5G (६ nm) प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. बॅटरीबद्दल सांगायचे तर, Poco X4 Pro 5G ५००० mAh बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. जी ६७ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ही बॅटरी केवळ ४१ मिनिटांत १-१०० % चार्ज होऊ शकते. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Poco X4 Pro 5G च्या ६ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत १७,९९९ रुपये आहे.

वाचा: सावधान ! Sim Card Swapping मुळे होऊ शकते मोठे नुकसान, सिम फसवणूक कशी होते ते जाणून घ्या

Samsung Galaxy A73 5G

samsung-galaxy-a73-5g

फोनमध्ये ६.६ इंचाचा FHD+ सुपर इन्फिनिटी-O AMOLED डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्यूशन १०८० x २४०० पिक्सेल, १२० Hz रिफ्रेश रेट आणि २० : ९ आस्पेक्ट रेशो आहे. फोनमध्ये १०८ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, १२ मेगापिक्सेल दुसरा कॅमेरा, ५ मेगापिक्सेल तिसरा कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेल चौथा कॅमेरा आहे. त्याच वेळी, या स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी आहे. जी २५ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. किमतीबद्दल बोलायचे तर, Samsung Galaxy A73 5G च्या ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४१,९९९ रुपये आहे.

वाचा: मस्तच! एक्स्ट्रा पैसे खर्च न करता वर्षभर फ्री मध्ये घ्या Disney+ Hotstar चा आनंद, सोबत ‘हे’ बेनिफिट्स सुद्धा मिळणार

Realme C31

realme-c31

फोनमध्ये ६.७ -इंचाचा LTPO2 Fluid AMOLED डिस्प्ले आहे. फोनमध्ये Octa core 12nm Unisoc T612 प्रोसेसर देण्यात आला आहे. कॅमेराबद्दल सांगायचे तर, मागील बाजूला १३ मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, २ मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा आणि ०.३ मेगापिक्सेलचा तिसरा-कॅमेरा आहे. या स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात ५००० mAh बॅटरी आहे. जी ८० W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ही बॅटरी फक्त ३२ मिनिटांत १-१०० % पर्यंत चार्ज होऊ शकते. Realme C31 च्या ३ GB रॅम आणि ३२ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ८,९९९ रुपये आहे.

वाचा : मस्तच ! पुन्हा स्वस्त झाला OnePlus 9 सीरीजचा ‘हा’ पॉवरफुल 5G स्मार्टफोन, होणार १० हजारांपेक्षा अधिक सेव्हिंग

​OnePlus 10 Pro 5G

oneplus-10-pro-5g

फोनमध्ये ६.७ -इंचाचा LTPO2 फ्लुइड AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन १४४० x ३२१६ पिक्सेल आहे. रिफ्रेश रेट १२० Hz आणि २०.१: ९ आस्पेक्ट रेशो आहे. फोनमध्ये ऑक्टा कोअर क्वालकॉम SM8450 G8450 स्नॅपनड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला ४८ मेगापिक्सल्सचा पहिला कॅमेरा, ८ मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा आणि ५० मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा मिळेल. फोनच्या फ्रंटमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आहे. यात ५००० mAh बॅटरी आहे. जी ८० W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. OnePlus 10 Pro 5G च्या ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ६६,९९९ रुपये आहे.

वाचा:स्वस्तात मस्त स्मार्टवॉच भारतात लाँच, फीचर्स एकदम स्मार्टफोनसारखे, कॉलिंगही करता येणार

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here