Caviar ने या फोनचे लिमिटेड एडिशन बनवले आहे. त्याचे नाव Galaxy S20 Ultra Fortune Gold Joker ठेवण्यात आले आहे. या कलेक्शनमध्ये केवळ जोकर नव्हे तर Ace ‘A’ कार्ड्सचाही समावेश आहे. कार्ड गेमचा सर्वात जास्त स्कोअर २१ असल्याने तितकेच डिव्हाईस बनवण्यात आले आहेत. या लग्झरी जोकर स्मार्टफोनचा बॅक पॅनेल कंपोझिट कीरिनाइटन बनवला आहे. हे एलिगेंट ब्लू फिनिश फोनचा मस्त स्टायलिश फील देतो. तसेच या स्मार्टफोनवर जोकरची आकृती २४ कॅरेट सोन्याने बनवण्यात आली आहे. त्यामुळे या फोनला एक वेगळाच लूक आला आहे. तसेच यात ३ रूबी आणि ३ नीलम असल्याने ते आणखी मस्त दिसते.
पत्त्यात सर्वात जास्त स्ट्राँग जोकर असतो. म्हणून मोबाइलच्या मागे जोकरला स्थान देण्यात आले आहे. त्याची डिझाईन त्यासारखीच करण्यात आली आहे. या स्माार्टफोनचे केवळ २१ कॉपी बनवण्यात येणार आहेत. या स्मार्टफोनची किंमत ३९,९०० डॉलर म्हणजेच जवळपास ३० लाख रुपये आहे. कंपनीकडून डिझाइन करण्यात आलेला आत्तापर्यंतचा हा सर्वात महागडा स्मार्टफोन आहे. जोकर एडिशन शिवाय कंपनी ए कार्ड्सचे चार मॉडेल तयार करणार आहे. या स्मार्टफोनची केवळ २१ कॉपी बनवण्यात येणार आहे. या स्मार्टफोनच्या कंपोझिटमध्ये रेड स्टोन लावण्यात येणार आहे. याची किंमत ५२९० डॉलर म्हणजेच जवळपास ४ लाख रुपये असणार आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times