नवी दिल्ली: स्मार्टफोनमध्ये ब्लास्ट होणे आता नवीन राहिले नसून अनेक नामंकित कंपन्यांच्या स्मार्टफोन्समध्ये देखील स्फोट झाल्याचे समोर येत असते. अशात, आता सोशल मीडियावर अशाच एका घटनेची चर्चा सुरु आहे. ज्यामध्ये फोन कॉल दरम्यान OnePlus Nord 2 युनिटचा कथित स्फोट झाला असल्याचा दावा करण्यात आला असून यात युजर जखमी झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे . @lakshayvrm च्या ट्विटर पोस्टनुसार, स्फोटानंतर स्मार्टफोनचे काही भाग खराब झाले. तसेच, यामुळे त्याच्या भावाच्या हाताला आणि चेहऱ्याला दुखापत झाली आहे .युजरने सांगितले की, ही घटना घडली जेव्हा त्याचा भाऊ OnePlus Nord 2 वर फोन कॉलवर होता. कंपनीनेही या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे उत्तर ट्विटर पोस्टला दिले आहे.

वाचा: नवीन स्मार्टफोनवर अपग्रेड करायचे असल्यास ‘हा’ सेल आहे बेस्ट, बजेट ते प्रीमियम सर्वच मॉडेल्सवर हजारोंचा डिस्काउंट

एका युजरने ट्विटर प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात खराब झालेला स्मार्टफोन दिसत असून हा फोन OnePlus Nord 2 असल्याचा दावा करण्यात आला आहे . व्हिडिओमध्ये, खराब झालेल्या स्मार्टफोनमधील स्क्रीन आणि धूर सुद्धा दिसत आहे. घटनेनंतर व्हिडिओ शूट करण्यात आला असल्यामुळे स्फोटामागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. तर, दुसरीकडे, वनप्लसने अद्याप ट्वीट्स किंवा सोशल मीडिया चॅनेलला प्रतिसाद दिलेला नाही.
ha

यापूर्वी देखील OnePlus Nord 2 मध्ये ब्लस्टच्या अनेक घटना घडल्या आहेत. ज्या डिव्हाइस लाँच झाल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर समोर आल्या होत्या . सप्टेंबर २०२१ मध्ये OnePlus Nord 2 मध्ये स्फोट झाला होता आणि युजरने कंपनी आणि Amazon विरुद्ध गुन्हाही दाखल केला होता. कथित घटनेच्या १० दिवसांपूर्वीच हा स्मार्टफोन खरेदी करण्यात आला होता. युजरने दावा केला होता की, स्फोटाच्या वेळी OnePlus Nord 2 5G स्मार्टफोन त्याच्या कोटच्या खिशात होता. यात दुखापत झाल्याचे आणि कपड्यांचही नुकसान झाले असल्याचे युजरने सांगितले.

OnePlus Nord 2 blast tweet

फोटो- ट्विटर/@lakshayvrm

सप्टेंबर २०२१ मध्ये बेंगळुरूमध्ये हा प्रकार घडला होता. पण, यावर स्पष्टीकरण देत वनप्लसतर्फे सांगण्यात आले होते की, हा स्फोट External factorsशी संबंधित एका वेगळ्या घटनेमुळे झाला आहे. MediaTek Dimensity 1200 SoC वर आधारित OnePlus Nord 2 १ जुलै २०२१ मध्ये भारतात लाँच करण्यात आला होता.

वाचा: स्वस्तात मस्त स्मार्टवॉच भारतात लाँच, फीचर्स एकदम स्मार्टफोनसारखे, कॉलिंगही करता येणार

वाचा: स्मार्टफोनला हॅकर्सच्या नजरेपासून सेफ ठेवायचे असल्यास ट्राय करा ‘या’ भन्नाट टिप्स, डिव्हाइस राहील कायम सुरक्षित

वाचा: २८ दिवसांचे टेन्शन संपले ! Airtel ने लाँच केले ३० दिवस आणि पूर्ण महिन्याची वैधता असलेले दोन जबरदस्त प्लान्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here