करोना काळात सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे थिएटरमध्ये जावून चित्रपट पाहण्याची सवय कमी झाली आहे. लोक घरीच मोठ्या टीव्हीवर चित्रपट आणि सीरिज पाहण्याचा आनंद घेत आहेत. बाजारात अगदी २४ इंचापासून ते १०० इंच स्क्रीन साइजसह येणारे स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत. मोठ्या स्क्रीन साइज स्मार्ट टीव्हीमुळे तुम्ही घरबसल्याच अगदी थिएटरमध्ये चित्रपट पाहत असल्याचा अनुभव घेऊ शकता. याशिवाय, सध्या सुरू असलेल्या आयपीएलचा आनंद देखील तुम्ही मोठ्या टीव्हीवर घेऊ शकता. बाजारात ५५ इंच स्क्रीनसह येणारे काही चांगले स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत. हे टीव्ही ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर निम्म्या किंमतीत उपलब्ध आहे. याशिवाय या टीव्हींवर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळेल. Flipkart वरून तुम्ही LG, Vu, iFFALCON चे शानदार स्मार्ट टीव्ही स्वस्तात खरेदी करू शकता. या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​LG (55 inch) OLED UHD (4K) Smart TV(OLED55BXPTA)

lg-55-inch-oled-uhd-4k-smart-tvoled55bxpta

या टीव्हीची मूळ किंमत २,१९,९९० रुपये आहे. परंतु, ५४ टक्के डिस्काउंटनंतर फ्लिपकार्टवरून फक्त ९९,९९९ रुपयात खरेदी करू शकता. टीव्हीवर ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. तसेच, ८,३३४ रुपये दरमहिना देवून देखील टीव्ही खरेदी करू शकता. टीव्हीसोबत ६ महिन्यांचे गाना+ सबस्क्रिप्शन मोफत मिळेल. ठराविक डेबिट-क्रेडिट कार्डवर कंपनी अतिरिक्त २ हजार रुपये सूट देत आहे. या टीव्हीमध्ये ५५ इंच UHD (४K) डिस्प्ले, ४०W साउंड आउटपुट, गुगल असिस्टेंट आणि नेटफ्लिक्स, डिज्नी+ हॉटस्टार आणि यूट्यूब सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळेल.

वाचा: सावधान ! Sim Card Swapping मुळे होऊ शकते मोठे नुकसान, सिम फसवणूक कशी होते ते जाणून घ्या

​Vu Premium (55 inch) UHD (4K) LED Smart TV

vu-premium-55-inch-uhd-4k-led-smart-tv

Vu च्या या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत ७५,००० रुपये आहे. परंतु, ४८ टक्के डिस्काउंटनंतर फक्त ३८,९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. टीव्हीवर ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर्सचा फायदा मिळेल. या टीव्हीला तुम्ही १,३३३ रुपये दरमहिना देऊन ईएमआयवर खरेदी करू शकता. टीव्हीसोबत ६ महिन्यांचे गाना+ सबस्क्रिप्शन देखील मोफत मिळेल. यामध्ये देखील ५५ इंच UHD (४K) डिस्प्ले, ४०W साउंड आउटपुट, गुगल असिस्टेंट, नेटफ्लिक्स, डिज्नी+ हॉटस्टार आणि यूट्यूब सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळतो.

वाचा: मस्तच ! पुन्हा स्वस्त झाला OnePlus 9 सीरीजचा ‘हा’ पॉवरफुल 5G स्मार्टफोन, होणार १० हजारांपेक्षा अधिक सेव्हिंग

​Vu Cinema TV Action Series (55 inch) UHD (4K) LED Smart Android TV with Sound by JBL(55LX)

vu-cinema-tv-action-series-55-inch-uhd-4k-led-smart-android-tv-with-sound-by-jbl55lx

Vu च्या या ५५ इंच टीव्हीमध्ये UHD (४K) डिस्प्ले, १००W साउंड आउटपुट, गुगल असिस्टेंट, बिल्ट-इन क्रोमकास्ट आणि नेटफ्लिक्स, डिज्नी+ हॉटस्टार व युट्यूब सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळेल. या टीव्हीवर ४७ टक्के डिस्काउंट मिळत आहे. टीव्हीची किंमत ८५ हजार रुपये असून, डिस्काउंटनंतर फक्त ४४,४०० रुपयात खरेदी करू शकता. टीव्हीवर ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर, दरमहिना १,५१८ रुपये ईएमआयची सुविधा मिळते. तसेच, टीव्ही खरेदीवर ६ महिन्यांचे गाना+ सबस्क्रिप्शन देखील मोफत मिळेल.

वाचा: १६ GB पर्यंतच्या व्हर्च्युअल रॅमसह Samsung Galaxy M33 5G लाँच, खरेदीवर इन्स्टंट डिस्काउंट, पाहा फीचर्स

​iFFALCON 139 cm (55 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV(55K61)

iffalcon-139-cm-55-inch-ultra-hd-4k-led-smart-android-tv55k61

iFFALCON च्या या शानदार ५५ इंच टीव्हीमध्ये UHD (४K) डिस्प्ले, २४W साउंड आउटपुट, गुगल असिस्टेंट, बिल्ट-इन क्रोमकास्टसह नेटफ्लिक्स, डिज्नी+ हॉटस्टार आणि युट्यूब सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळेल. या टीव्हीवर ४६ टक्के डिस्काउंटचा फायदा मिळेल. टीव्हीची किंमत ७०,९९० रुपये असून, तुम्ही फक्त ३७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय, दरमहिना फक्त १,२९९ रुपये देऊन टीव्हीला घरी नेऊ शकता. यावर ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनसचा देखील फायदा मिळेल.

वाचा: स्वस्तात मस्त स्मार्टवॉच भारतात लाँच, फीचर्स एकदम स्मार्टफोनसारखे, कॉलिंगही करता येणार

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here