नवी दिल्लीः विरुद्ध लढण्यासाठी जगभरातील सरकारने आपली आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत. सरकारला मदत करण्यासाठी जगभरातील कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. अनेक जण पुढे येऊन आर्थिक मदत करीत आहेत. आता या यादीत आणखी एक नाव जोडले गेले आहे. मायक्रो ब्लॉगिंग आणि सोशल नेटवर्किंग साइट ट्विटर Twitter चे सीईओ डोर्सी यांनी करोना विरूद्धच्या लढाईसाठी १ अब्ज डॉलरची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.

ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी ट्विट करून या मदतीची घोषणा केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, करोना व्हायरस विरुद्ध लढाईसाठी १ अब्ज डॉलरची मदत करीत आहे. जॅकने पुढे म्हटले की, ही मदत स्टार्ट स्मॉलच्या माध्यमातून केली जात आहे. ज्यावेळी आपण या महामारी रोगाच्या विरोधातील लढाई जिंकू, त्यानंतर या फंडचा उपयोग बालकांच्या शिक्षणासाठी आणइ आरोग्यासाठी करण्यात येईल. त्यांनी हा पूर्ण फंड कसा खर्च करण्यात येईल, याचा जगातील कोणताही व्यक्ती ट्रेकिंग करू शकेल. यासाठी जॅक यांनी एक लिंक सुद्धा शेअर केली आहे. ज्यात एक फंडच्या हिशोबानुसार, शीट बनवण्यात आली आहे. ट्विटरच्या सीईओशिवाय जगातील मोठ्या कंपन्यांनी करोना विरुद्ध आपले आर्थिक योगदान याआधी दिले आहेत.

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी करोना व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी ३० मिलियन डॉलरची मदत जाहीर केली आहे. तसेच अॅमेझॉनचे जेफ बेजोस यांनी अमेरिकेतील खाद्य बँकांना १०० मिलियन डॉलरची मदत केली आहे. तर अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी मार्च महिन्यात घोषणा केली होती की इटलीत मेडिकल सप्लाय दान करणार आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here