करा तक्रार

येथे करा तक्रार: बँकेने सांगितले आहे की, त्यांची आयटी सुरक्षा टीम यावर योग्य ती कारवाई करेल. पुढे, SBI ने ग्राहकांना ईमेल/ एसएमएस /कॉल/ एम्बेडेड लिंक्सना प्रतिसाद न देण्याचा सल्ला दिला आहे. ग्राहकांनी त्यांचे वैयक्तिक किंवा बँकिंग तपशील शेअर करू नयेत. बँका सहसा कोणताही OTP मेसेज किंवा वैयक्तिक माहिती विचारत नाहीत. SBI ग्राहकांना अशा फिशिंग मेसेजची तक्रार report.phishing@sbi.co.in या ईमेल आयडीवर करण्याचा सल्ला देत असून ग्राहक हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधू शकतात.
वाचा :सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल कुठे मिळतय ? एका क्लिकवर होणार माहित, ‘हे’ Apps करतील मदत, पाहा डिटेल्स
फसवणूक टाळण्यासाठी हा सल्ला

फसवणूक टाळण्यासाठी एसबीआयने दिला हा सल्ला: तुम्ही जर SBI ग्राहक असाल तर तुम्हाला सावध राहणे आवश्यक आहे. अन्यथा तुमचेही मोठे नुकसान होऊ शकते. ही फसवणूक टाळणे शक्य आहे. त्यामुळे SBI आपल्या ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही अज्ञात मेसेज लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला देत आहे. लिंकवर क्लिक केल्यास आणि कोणतीही संवेदनशील माहिती टाकल्यास तुमचे पैसे चोरी जाऊ शकतात .
वाचा: आता WhatsApp वर फेक न्यूज फॉरवर्ड करणाऱ्यांची खैर नाही, लवकरच येतय ‘हे’ फीचर, पाहा डिटेल्स
फिशिंग मेसेज काय आहे?

SBI फिशिंग मेसेज काय आहे ? SBI ग्राहकांना एक टेक्स्ट मेसेज पाठवला जात आहे. दिलेल्या लिंकवर त्यांचा पॅन क्रमांक अपडेट न केल्यास त्यांचे ‘YONO’ Account ब्लॉक केले जाईल असे यात सांगण्यात येत आहे. येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे YONO हे SBI चे डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म आहे. मेसेजमध्ये दिलेली बनावट लिंक एसबीआय पेजवर जाते. जी युजर्सना संवेदनशील माहिती एंटर करण्यास सांगते. जेव्हा युजर्स त्यावर त्यांचे डिटेल्स एंटर करतात तेव्हा त्यांची माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचते आणि ते तुम्हाला फसवणुकीचे बळी बनवतात.
वाचा :स्वस्तात मस्त स्मार्टवॉच भारतात लाँच, फीचर्स एकदम स्मार्टफोनसारखे, कॉलिंगही करता येणार
SBI ग्राहकांना येतोय हा मेसेज

SBI ग्राहकांना येतोय हा मेसेज: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांना सध्या Alert राहण्याची गरज आहे. लोकांना या स्कॅममध्ये अडकवण्यासाठी फ्रॉडस्टर स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना त्यांचा पॅन नंबर अपडेट करण्यासाठी एसएमएस पाठवत आहेत. ज्यामध्ये, बनावट लिंक देण्यात येत आहे. लिंकवर क्लिक करताच ती लिंक तुम्हाला तुमचे डिटेल्स विचारणाऱ्या बनावट SBI वेबपेजवर घेऊन जाईल आणि हॅकर मिनिटांत तुमचे रिकामे अकाउंट रिकामे करेल. ही फसवणूक कशी टाळता येईल हे सविस्तर जाणून घ्या.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times