नवी दिल्लीः इन्स्टंट मेसेजिंग अॅप whatsapp जगात सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. जगभरात व्हॉट्सअॅपचे २.७ बिलियन अॅक्टिव युजर्स आहेत. हे अॅप अँड्रॉयड आणि आयओएस या दोन्ही व्हर्जनवर काम करते. या अॅपवर केवळ चॅटिंग करता येत नाही तर स्टेट्स सुद्धा ठेवता येते. तसेच व्हॉईस कॉल आणि व्हिडिओ कॉल सुद्धा करता येतो. परंतु, व्हॉट्सअॅपने आता आपल्या युजर्संना व्हिडिओ कॉलिंगची आणखी मजा यावी यासाठी एक नवीन फीचर अपडेट केले आहे.

व्हॉट्सअॅप व्हर्जन २.२०.१०८ मध्ये आता सरळ कोणत्याही ग्रुपवर व्हिडिओ कॉल कनेक्ट करू शकता. जर ग्रुपमध्ये चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर त्या सर्वांना वेगवेगळे व्हिडिओ कॉल करण्याची गरज नाही. व्हॉट्सअॅपच्या या ग्रुप अपडेट कॉलमध्ये कॉलिंग साठी एक नवीन पर्याय दिला आहे. आता ग्रुप चॅटच्या वरच्या भागात व्हिडिओ कॉल आयकॉनवर टॅप करून जास्तीत जास्त चार व्यक्तींना एकाचवेळी व्हिडिओ कॉल करता येवू शकतो. विशेष म्हणजे कॉल करण्यासाठी वेगवेगळे व्यक्तींना निवडण्याची गरज नाही. नवीन फीचरने ग्रुपमधील सर्व सदस्यांना (जास्तीत जास्त ४) एकाचवेळी कॉल करता येईल.

जगभरात अनेकांच्या पसंतीस असलेली व्हॉट्सअॅप whatsapp कंपनी आपल्या युजर्ससाठी २०२० या वर्षापासून नवीन नवीन फीचर्स आणत आहे. फेसबुकच्या मालकीची असलेल्या या कंपनीच्या युजर्सची संख्या २ अब्जापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे कंपनी नेहमीच नवीन-नवीन फीचर्स आणत आहे. या वर्षात व्हॉट्सअॅपमध्ये आणखी नवीन फीचर्स येणार आहेत. त्यामुळे व्हॉट्सअॅप युजर्संची चॅटिंग मज्जा आणखी वाढणार आहे. कंपनीने नुकताच डार्क मोड फीचर आणले होते. हे फीचर अनेकांना आवडले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here