नवी दिल्लीः करोना व्हायरसमुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर अनेक खासगी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना म्हणजेच घरून काम करण्यास सांगितले आहे. वर्क फ्रॉम होम करताना त्यासाठी कम्प्यूटर, लॅपटॉप आणि चांगली इंटरनेट कनेक्टिविटी गरजेचे असते. परंतु, वर्क फ्रॉम होम करताना अनेकांना कमी वाय फायची स्पीड मिळत आहे, अशा तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे त्यांना काम करताना अडचणींना सामोरे जावे लागते आहे.

कठीण पासवर्डचा वापर करा

वायफायची स्पीड वाढवण्यासाठी कठीण पासवर्ड ठेवा. जर कठीण पासवर्ड ठेवला नाही तर अनेक जण तुमच्या वायफाय नेटवर्कचा वापर करतील. त्यामुळे डेटाची स्पीड कमी होईल. त्यामुळे वायफायचा पासवर्ड अवघड ठेवावा. तसेच तुमच्या वायफायचा पासवर्ड कुणाला सांगू नका. असे केल्यास वायफायचा इंटरनेट स्पीड वाढेल.

वायफाय राऊटर योग्य ठिकाणी ठेवा

घरात वायफाय राऊटर तुम्ही कुठे ठेवता यावरही वायफायची इंटरनेट स्पीड अवलंबून आहे. अनेकदा आपला वायफाय राऊटर सामानाच्या मागे ठेवला जातो. त्यामुळे इंटरनेट स्पीड कमी होते. त्यामुळे राउटरच्या आजुबाजुला जास्त सामान ठेवू नका.

वायफाय राऊटरला जमीनीवर ठेवू नका

वाय फाय राऊटरमधून मिळणाऱ्या इंटरनेट स्पीडसाठी योग्य काळजी घ्या. मेटल किंवा काँक्रिट यासारख्या भिंतीआड राऊटर ठेवू नका. वायफाय राऊटरला काही अडचण निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या. तसेच राऊटरला जमीनीवर खाली ठेवू नका.

वायफायच्या अँटिनाने मिळणार हाय स्पीड डेटा

जवळपास सर्वच राऊटरला बाहेरच्या दिशेने अँटिना लावलेले असतात. त्याला अॅडजस्ट केल्याने सिग्नल सुधारण्यास मदत होऊ शकते. अनेकदा काही अँटिना खाली झुकलेले असतात त्यामुळे कमी सिग्नल मिळते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here