ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवर दर आठवड्याला नवनवीन सेलचे आयोजन केले जात असते. ग्राहकांना स्वस्तात प्रोडक्ट्स खरेदी करता यावे यासाठी या सेलचे आयोजन केले जाते. याशिवाय, प्रोडक्ट्स बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्सचा देखील फायदा मिळतो. ई-कॉमर्स साइट Amazon वर सध्या मोबाइल सेविंग्स डेज सेल सुरू आहे. यासोबतच, टीव्ही सेविंग्स डेज सेलचा देखील फायदा घेता येईल. या दोन्ही सेल्समध्ये खूपच कमी किंमतीत स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. तुम्ही जर नवीन स्मार्टफोन अथवा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा सेल तुमच्या फायद्याचा ठरेल. Amazon Sale मध्ये टॉप सेलिंग स्मार्टफोनवर ४० टक्के डिस्काउंट मिळत आहे. सेलमध्ये Mivi, सॅमसंग, वनप्लस, रियलमी, रेडमी, iQOO आणि इतर ब्रँड्सच्या एक्सेसरीजवर आकर्षक ऑफरचा फायदा मिळत आहे. या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​या प्रोडक्ट्सवर मिळेल आकर्षक ऑफर्स

तुम्ही जर टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या सेलचा फायदा घेऊ शकता. सेलमध्ये Redmi, OnePlus, Samsung आणि सोनी सारख्या ब्रँड्सच्या टीव्हीवर ५५ टक्क्यांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. ५ एप्रिलपासून सुरू झालेला हा सेल ९ एप्रिलपर्यंत चालेल. सेलमध्ये OnePlus Nord CE 2 5G, OnePlus Nord 2 5G, OnePlus 9RT, Samsung Galaxy M32 5G, Mi 11X, Xiaomi 11 Lite NE 5G, iQoo 9 Pro 5G आणि iQoo 9 SE सारख्या स्मार्टफोन्सवर देखील आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळेल. यासोबतच, बँक ऑफ बडोदा आणि सिटी बँकेच्या कार्ड्सचा वापर केल्यास १० टक्के डिस्काउंट मिळेल. यूजर्सला नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळेल.

वाचा: Amazon चा खास सेल, स्वस्तात मिळेल AC-कूलर आणि पंखे; किंमत २१९९ रुपयांपासून सुरू

​OnePlus Nord CE 2 5G वर आकर्षक ऑफर्स

oneplus-nord-ce-2-5g-

Amazon सेलमध्ये OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोनला फक्त २१,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या फोनमध्ये ६५W SUPERVOOC चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. यात ८ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल. यात ६.४३ इंच FHD+ AMOLED Display दिला आहे. सेलमध्ये OnePlus Nord 2 5G स्मार्टफोनला तुम्ही २८,४९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर एक्सचेंज व इतर ऑफर्सचा फायदा मिळेल. तसेच, Samsung Galaxy M32 ला देखील ऑफर्ससह फक्त ११,७४९ रुपयात खरेदी करता येईल.

वाचा: पहिल्याच सेलमध्ये स्वस्तात खरेदी करा POCO चा ‘हा’ दमदार स्मार्टफोन, ६४MP कॅमेरा आणि ५०००mAh बॅटरीसह मिळेल बरचं काही

​Xiaomi 11X स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर्स

xiaomi-11x-

Xiaomi 11X स्मार्टफोन सेलमध्ये २२,९९९ रुपयात उपलब्ध आहे. या फोनमध्ये ६.६७ इंच डिस्प्ले, Qualcomm Snapdragon ८७० ५G प्रोसेसर, ४५२० एमएएचची दमदार बॅटरीसह अनेक शानदार फीचर्स मिळतात. सेलमध्ये Xiaomi 11 Lite NE 5G स्मार्टफोन २१,९९९ रुपये, Mi 11X Pro स्मार्टफोन ३१,९९९ रुपये आणि Redmi 11 Pro Plus 5G स्मार्टफोन १८,९९९ रुपयात उपलब्ध आहे. iQOO फोन्सवर देखील ६ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. ऑफर्सचा फायदा मिळाल्यास फोन्सला तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता.

वाचा: विजेशिवाय तब्बल १५ तास थंड हवा देईल ‘हा’ पिटुकला पंखा, किंमत एवढी कमी की विश्वास बसणार नाही

​TV वर देखील मिळेल आकर्षक ऑफर्स फायदा

tv-

या सेलमध्ये OnePlus टीव्हीवर देखील शानदार ऑफर्स मिळत आहे. सेलमध्ये तुम्ही १५,९९९ रुपये सुरुवाती किंमतीत टीव्ही खरेदी करू शकता. Redmi TV 32-inch सेलमध्ये १५,४९९ रुपयात उपलब्ध आहे. तर 50-inch 4K UHD मॉडेल फक्त ३४,९९९ रुपयात उपलब्ध आहे. सिटी बँक आणि बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास १,५०० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. Amazon Sale मध्ये सोनी ब्रँडचे स्मार्ट टीव्ही फक्त २२,७९९ रुपये सुरुवाती किंमतीत उपलब्ध आहेत.

(नोट – वरील प्रोडक्ट्सच्या किंमतीत ऑफर्स आणि व्हेरिएंटनुसार बदल होऊ शकतो.)

वाचा: १ रुपयाही अतिरिक्त न देता फ्री मिळेल Hotstar, Netflix, Prime सबस्क्रिप्शन; पाहा ‘हे’ भन्नाट रिचार्ज प्लान्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here