Tecno POVA 2

Tecno POVA 2 हा पॉवरफुल बॅटरीसह येणारा भारतातील प्रमुख फोन पैकी एक आहे. या फोनमध्ये ७००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. यात तुम्हाला ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल. कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यामध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्यासह दोन प्रत्येकी २-२ मेगापिक्सलचे आहेत. तसेच, एआय लेंस देखील दिली आहे. यामध्ये ६.९५ इंच फुल एचडी डिस्प्ले मिळेल. हा फोन Amazon वर फक्त ११,९९९ रुपयात उपलब्ध आहे.
Samsung Galaxy F62

Samsung Galaxy F62 स्मार्टफोनमध्ये ७००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळेल. यात फोटोग्राफीसाठी क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, दोन ५-५ मेगापिक्सल सेंसर आणि एक कॅमेरा १२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. यामध्ये ६.७ इंच फुल एचडी डिस्प्ले मिळेल. Samsung Galaxy F62 स्मार्टफोनला तुम्ही रिलायन्स डिजिटलवरून २३,९९९ रुपयात खरेदी करू शकता.
वाचा: भन्नाट ! WhatsApp वर नंबर सेव्ह न करताही चॅट करता येणार, येतय ‘हे’ नवीन फीचर, पाहा डिटेल्स
Power Armor 14 Rugged

Power Armor 14 Rugged हा या लिस्टमधील सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन आहे. यामध्ये १०००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळेल. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात २० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि दोन कॅमेरा २-२ मेगापिक्सलचे आहेत. तर सेल्फीसाठी फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. यात ६.५२ इंच एचडी डिस्प्ले मिळतो. या फोनची किंमत २८,९५० रुपये आहे.
S97 Pro Rugged

S97 Pro Rugged स्मार्टफोनमध्ये ८५०० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोनला सिंगल चार्जमध्ये तुम्ही अनेक तास वापरू शकता. यामध्ये ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे. फोन क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात ४८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, दोन कॅमेरा ५-५ मेगापिक्सल आणि एक कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आहे. यात ६.३९ इंच फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. Amazon वर हा फोन ३७,५०० रुपये किंमतीत उपलब्ध आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times