दावा

करोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी लोकांना घरात थांबा असे सांगणारी एक कविता फेसबुक आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. ही कविता शेअर करताना दावा करण्यात येत आहे की, ही कविता १८६९ मध्ये लिहिण्यात आली होती. तसेच १९१९ मध्ये स्पॅनिश फ्लू महामारी आल्यानंतर ही कविता पुन्हा एकदा छापण्यात आली. अनेक पोस्टमध्ये मास्क घातलेल्या दोन महिलासोबत ही कविता शेअर केली जात आहे.

ट्विटर आणि फेसबुक या दोन्ही युजर्संनी ही कविता एकाच कॅप्शनसोबत शेअर केली आहे. या ठिकाणी पाहा उदाहरणः

खरं काय आहे ?

ही कविता १८६८ साली नव्हे तर मार्च २०२० म्हणजेच मागच्या महिन्यात करोना व्हायरसवर लिहिली आहे.

कशी केली पडताळणी ?

व्हायरल कविताच्या काही ओळी आम्ही गुगलवर सर्च केल्या. त्यानंतर आम्हाला ‘O, the Oprah Magazine’ वेबसाइटवर एक
मिळाले. हे आर्टिकल लिहिणाऱ्या वर होते.

आर्टिकलचे शीर्षक ‘Kitty O’Meara, of “And the People Stayed Home,” Open Up About Writing That ’ होते. आर्टिकलमध्ये म्हटले की, करोना व्हायरसवर लिहिलेली ही कविता आता जगभरात व्हायरल होत आहे. ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर खूप साऱ्या युजर्संनी या कविताला शेअर केले आहे. तसेच अनेक जणांना उत्सुक आहे की, Kitty O’Meara आहे तरी कोण?

या आर्टिकलच्या माहितीनुसार, Kitty अमेरिकेच्या विसकॉन्सिन राज्याची राजधानी मॅडिसनमध्ये राहते. तसेच आता निवृत्त झालेली आहे. Kitty ने सांगितले की, त्यांची ही व्हायरल कविता सांगते की, सध्या आपण काय करायला हवे. गेल्या काही महिन्यात करोनाच्या बातम्या पाहिल्यानंतर आणि ऐकल्यानंतर ही कविता मला सूचली आहे, असे Kittyने सांगितले.

मी गेल्या काही महिन्यांपासून उदास राहत होते. विशेष म्हणजे, माझे जे मित्र आरोग्य विभागात काम करीत आहेत आणि ते या व्हायरस विरोधात लढाई लढत आहेत. म्हणून माझ्या मनात त्यांच्याविषयी एक उदासपणा आला होता. मी काहीच करू शकत नव्हते. मी माझ्या मित्रांची मदत करू शकत नव्हते. मी त्यांच्यासाठी खूप चिंताग्रस्त होते. माझ्या पतीने म्हटले, तू लिही. पुन्हा लिही. आणि मी ही कविता एकाचवेळी लिहिली.

ही कविता लिहिल्यानंतर आपल्या मित्रांसोबत फेसबुकवर शेअर केली. त्यानंतर ती व्हायरल झाली.

निष्कर्ष

करोना व्हायरसवर मार्च २०२० मध्ये लिहिलेली कविता सोशल मीडियावर १८६९ साली लिहिलेली कविता म्हणून शेअर केली जात आहे, असे ‘मटा फॅक्ट चेक’च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here