Redmi Note 11 Pro

Redmi Note 11 Pro स्मार्टफोनची किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत फक्त १९,९९९ रुपये आहे. फोनमध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा डिस्प्ले दिला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी ६७ वॉट फास्ट चार्जरसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. यात बॅक पॅनेलवर क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १०८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.
वाचा – फक्त ४९८ रुपयात उपलब्ध आहे ‘ही’ खास मिक्सर बॉटल, मिनिटात तयार होईल ज्यूस; पाहा डिटेल्स
OPPO A96

OPPO A96 स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १९,९९९ रुपये आहे. फोनमध्ये १२८ जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज दिले आहे. यामध्ये पंच होल कटआउट डिस्प्ले दिला असून, यात फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ६.५९ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनच्या बॅक पॅनेलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो. पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. तसेच, स्नॅपड्रॅगन ६८० चिपसेटचा सपोर्ट मिळतो.
वाचा: स्वस्तात AC-कूलर खरेदी करण्याची उद्या शेवटची संधी, ‘या’ साइटवर मिळत आहेत एकापेक्षा एक शानदार डील्स
Vivo T1 5G

Vivo T1 5G स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत १९,९९० रुपये आहे. हा फोन ५जी कनेक्टिव्हिटीसह येतो. यात स्नॅपड्रॅगन ६९५ चिपसेटचा सपोर्ट दिला आहे. कंपनीने फोनममध्ये टर्बो कूलिंग टेक्नोलॉजी दिली असून, यामुळे गेमिंग आणि मल्टी टास्किंग दरम्यान फोन गरम होत नाही. Vivo T1 5G फोनमध्ये बॅक पॅनेलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, यात ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो. तर पॉवरसाठी ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे.
Realme 8

Realme 8 स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत १८,०९९ रुपये आहे. फोनमध्ये १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. तसेच, स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता. फोनमध्ये बॅक पॅनेलवर क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. यात MediaTek Helio G९५ प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो.
Poco M4 Pro 4G

Poco M4 Pro 4G स्मार्टफोन काही दिवसांपूर्वीच भारतीय बाजारात लाँच झाला आहे. या फोनला तुम्ही १८,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवू शकता. फोनच्या बॅक पॅनेलवर ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. तर सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. यात मीडियाटेक डायमेंसिटी ८१० चिपसेटचा सपोर्ट दिला आहे.
वाचा: #XEVariant is Coming.. सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस, लोकांची Creativity पाहण्यासारखी
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times