Reliance Jio आपल्या युजर्सना टॉप 5 ट्रेंडिंग प्लान ऑफर करत आहे. या प्लान्सची सुरुवातीची किंमत २९९ रुपये आहे. यामध्ये कंपनी ९१२.५ GB पर्यंत डेटा ऑफर करत आहे. तसेच, या प्लान्समध्ये युजर्सना ३६५ दिवसांपर्यंत वैधता देखील मिळत आहे. शिवाय, मोफत Hotstar चे बेनिफ्टस वेगळेच. रिलायन्स जिओ युजर्समध्ये खूप लोकप्रिय असून कंपनी युजर्सना उत्तम प्रीपेड प्लान्सची एक लांबलचक लिस्टच ऑफर करते. या प्लानमध्ये काही रिचार्ज देखील आहेत, ज्याला कंपनी टॉप ट्रेंडिंग प्लान म्हणता येईल. कंपनीच्या वेबसाइटवरील टॉप ट्रेंडिंग प्लानच्या लिस्टमध्ये एकूण पाच प्लान्सचा समावेश आहे. या प्लान्समध्ये, कंपनी भरपूर डेटा, Unlimited कॉलिंग आणि विनामूल्य Disney + Hotstar ऑफर करत आहे. ज्याची, वैधता एक वर्षापर्यंत आहे. जाणून घ्या या प्लान्सबद्दल सविस्तर आणि खरेदी करा बेस्ट प्लान.

​या दोन प्लान्समध्ये फ्री Hotstar

-hotstar

या दोन प्लान्समध्ये फ्री Hotstar: Jio त्याच्या टॉप ट्रेंडिंग प्लॅनच्या यादीमध्ये सध्याच्या ४९९ आणि २९९९ रुपयांच्या प्लानमध्ये Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करत आहे. दोन्ही प्लानमध्ये तुम्हाला दररोज १०० मोफत एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. याशिवाय, हे दोन्ही प्लान जिओ अॅप्सवर मोफत प्रवेश देखील देतात. ४९९ रुपयांच्या प्लानमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी दररोज २ जीबी डेटा देते. याची वैधता २८ दिवसांची आहे. तर, २९९९ रुपयांचा प्लान ३६५ दिवस चालतो. यामध्ये दररोज २.५ जीबीनुसार एकूण ९१२.५ जीबी डेटा मिळेल.

वाचा : बेस्ट ऑफर ! ४६ % डिस्काउंटसह अर्ध्यापेक्षा कमी किमतीत मिळतोय ‘हा’ जबरदस्त AC , पाहा डिटेल्स

​जिओचा ७१९ रुपयांचा प्लान

जिओचा ७१९ रुपयांचा प्लान: रिलान्स जीओकडे ७१९ रुपयांचा प्लान देखील आहे. जिओच्या या ७१९ रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला ८४ दिवसांची वैधता देखील मिळेल. तुम्ही जर अधिक डेटा वापरात असाल तर इंटरनेट वापरण्यासाठी, तुम्हाला या प्लानमध्ये दररोज २ GB डेटा मिळेल. यामध्ये कंपनी देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग देखील देत आहे. दररोज १०० मोफत एसएमएस असलेल्या या प्लानमध्ये तुम्हाला Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शनही मिळेल. अधिक व्हॅलिडिटी आणि जास्त डेटा वापरणाऱ्यांची हा प्लान बेस्ट आहे.

वाचा : ‘या’ कारणांमुळे होतो स्मार्टफोनमध्ये ब्लास्ट, उन्हाळ्यात अशी ‘घ्या’ स्मार्टफोनची काळजी, पाहा या टिप्स

​जिओचा ६६६ रुपयांचा प्लान​

जिओचा ६६६ रुपयांचा प्लान: जर तुम्हाला अधिक दिवसांची व्हॅलिडिटी हवी असेल तर, तुम्ही या प्लानची निवड करू शकतात जिओच्या ६६६ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ८४ दिवसांची वैधता मिळते. तसेच, या प्लानमध्ये तुम्हाला दररोज १.५ GB नुसार एकूण १२६ GB डेटा मिळेल. प्लानमध्ये, कंपनी दररोज १०० मोफत एसएमएससह अनलिमिटेड कॉलिंग देखील देत आहे. जिओ युजर्ससाठी हा प्लान एक चांगला पर्याय ठरू शकतो. प्लानमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Jio अॅप्सचा मोफत प्रवेश देखील समाविष्ट आहे.

वाचा : ‘हा’ पोर्टेबल Fridge ५ डिग्री पर्यंत थंड करू शकतो ड्रिंक, किंमत १५०० रुपयांपेक्षा कमी, प्रवासासाठीही बेस्ट

​जिओचा २९९ रुपयांचा प्लान

जिओचा २९९ रुपयांचा प्लान: कंपनी युजर्सना अनेक स्वस्तात मस्त प्लान्स ऑफर करते . हे प्लान्स स्वस्त असले तरी यात युजर्सच्या आवडी आणि गरजांनुसारच फायदे दिले जातात. जिओचा २९९ रुपयांचा हा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये कंपनी दररोज २ GB नुसार एकूण ५६ GB डेटा ऑफर करते. या प्लानमध्ये, तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगच लाभ देखील मिळतो. तसेच, या प्लानमध्ये दररोज १०० मोफत एसएमएस देखील मिळतील. जिओच्या २९९ रुपयांच्या प्लानमध्ये प्लानच्या सदस्यांना Jio अॅप्सवर मोफत प्रवेश देखील दिला जात आहे.

वाचा : Mivi ने खूपच कमी किमतीत लाँच केले Made in India साउंडबार्स; युजर्सना मिळणार जबरदस्त आवाजाचा अनुभव

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here