नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. ई-कॉमर्स साइट Flipkart वर आजपासून बिग सेव्हिंग डेज सेल सुरू झाला आहे. १२ एप्रिलपासून सुरू झालेल्या या सेलचा फायदा १४ एप्रिलपर्यंत घेता येईल. सध्या नियमित टीव्हीच्या तुलनेत स्मार्ट एलईडी टीव्ही खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. त्यामुळे फ्लिपकार्ट सेलमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या टीव्हीवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळत आहे. विशेष म्हणजे या टीव्हींची किंमत खूपच कमी आहे. तुम्ही १० हजार रुपये सुरुवाती किंमती टीव्हीला खरेदी करू शकता. Flipkart big saving days sale मध्ये तुम्हाला Kodak, Thomson, MarQ, Thomson आणि Coocaa या कंपन्यांच्या टीव्हीवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळेल. Flipkart sale मध्ये स्वस्तात मिळणाऱ्या या टीव्हींच्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Kodak LED TV

kodak-led-tv

Flipkart sale मध्ये Kodak च्या शानदार LED TV ला स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये २४ इंच टीव्ही फक्त ७,४९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये २० वॉट स्पीकर आउटपूट मिळतो. तर स्क्रीन ६० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येतो. यात दोन एचडीएमआय पोर्ट आणि २ यूएसबी पोर्ट दिले आहेत. तसेच, ICICI Bank क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी केल्यास १० टक्के डिस्काउंटचा फायदा मिळेल.

वाचा – Xiaomi चा ४० हजारांचा पॉवरफुल फोन १० हजार रुपये स्वस्तात खरेदीची संधी, मिळेल १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा

​Thomson R9 टीव्ही

thomson-r9-

Thomson R9 टीव्ही देखील Flipkart Sale मध्ये स्वस्तात उपलब्ध आहे. या २४ इंच शानदार टीव्हीला तुम्ही फक्त ७,९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. तसेच, ICICI Bank क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी केल्यास १० टक्के डिस्काउंट देखील मिळेल. या २४ इंच स्क्रीनसह येणाऱ्या टीव्हीमध्ये २० वॉटचा साउंड आउटपूट दिला आहे. यात १३६६x७६८ पिक्सल रिझॉल्यूशनसह येणारा HD Ready पॅनेल आहे, जो ६० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येतो.

वाचा: रिचार्ज एक फायदे अनेक! Jio च्या ‘या’ धमाकेदार प्लान्समध्ये मिळेल डेटा-कॉलिंग-ओटीटी बेनिफिट्स; किंमत खूपच कमी

​MarQ टीव्ही

marq-

Flipkart Sale मध्ये MarQ HD Ready LED TV १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे. या टीव्हीला तुम्ही ८,९९९ रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता. याशिवाय, ICICI Bank कार्डचा वापर केल्यास १० टक्के डिस्काउंटचा देखील फायदा मिळेल. MarQ च्या या शानदार टीव्हीमध्ये ३२ इंच स्क्रीन दिली आहे. याची HD Ready रिझॉल्यूशनसह येणारी स्क्रीन ६० हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्ट करते. यात २० वॉट साउंड आउटपूट दिला आहे.

वाचा: फक्त ४९ रुपयात ‘ही’ कंपनी देतेय जास्त वैधतेसह डेटा-कॉलिंग फ्री, पाहा शानदार प्रीपेड प्लान्स

​Thomson टीव्ही

thomson-

Thomson च्या ३२ इंच स्क्रीनसह येणाऱ्या टीव्हीवर देखील सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळतो. यात ३२ इंच टीव्हीमध्ये एचडी रेडी डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट६० हर्ट्ज आहे. हा टीव्ही २० वॉटच्या साउंड आउटपूटसह येतो. यात कनेक्टिव्हिटीसाठी दोन एचडीएमआय पोर्ट आणि २ यूएसबी पोर्ट दिले आहेत. थिन बेझल डिझाइनसह येणारे हा टीव्ही फक्त ८,९९९ रुपयात उपलब्ध आहे. यावर तुम्हाला बँक ऑफर्सचा देखील फायदा मिळेल.

वाचा: ‘हा’ पिटुकला प्रिंटर आहे खूपच कामाचा, धडाधड प्रिंट करतो कागदपत्रं; किंमत फक्त…

​Coocaa स्मार्ट टीव्ही

coocaa-

Coocaa स्मार्ट टीव्हीची किंमत १० हजार रुपयांपेक्षा थोडी जास्त आहे. हा ३२ इंच स्क्रीन साइजसह येणारा टीव्ही ६० हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. यामध्ये २० वॉट साउंड आउटपूट दिला आहे. टीव्ही Coolita ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फ्लिपकार्ट सेलमध्ये या टीव्हीला तुम्ही फक्त १०,४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. तसेच, ICICI Bank कार्डचा वापर केल्यास तुम्हाला टीव्हीवर १० टक्के डिस्काउंट देखील मिळेल.

वाचा: फोन हरवला अथवा चोरीला गेल्यास मिनिटात करू शकता ट्रॅक, ‘ही’ भन्नाट ट्रिक येईल कामी

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here