आता चांगला स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास खूप पैसे खर्च करावे लागत नाही. मोठ-मोठ्या वेबसाईट्स अनेक सेलचे आयोजन करतच असतात. देशातील आघाडीच्या ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर १० एप्रिलपासून Amazon Fab Phones Fest सेल सुरू आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर भरघोस सूट आणि अनेक आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा पाच स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही 200 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. तुम्हाला जर हे भन्नाट स्मार्टफोन्स खरेदी करायचे असतील तर तुम्हाला थोडी घाई करावी लागेल. कारण, Amazon सेल १४ एप्रिलपर्यंत लाइव्ह असेल. या लिस्टमध्ये Oppo A15s, redmi 9a स्पोर्ट, Samsung Galaxy M12, lava X2 सारख्या जबरदस्त स्मार्टफोन्सचा समावेश आहे. ही लिस्ट पाहा आणि तुमच्या आवडीचा स्मार्टफोन मोठ्या डिस्काउंटसह घरी आणा.

Redmi 9A Sport

redmi-9a-sport

Redmi 9A Sport Amazon वर ६,९९९ रुपयांना उपलब्ध आहे तर, त्याची मूळ किंमत ८,४९९ रुपये आहे. HSBC कॅशबॅक कार्ड वापरून तुम्हाला ३५० रुपयांची सूट मिळेल आणि एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ घेतल्यावर तुम्हाला ६, ६०० रुपयांची सूट मिळेल. तुम्ही Redmi चा फोन ४९ रुपयांना खरेदी करू शकता.Redmi 9 Sport फोनमध्ये जाड बेझल देण्यात आले आहेत. या फोनचे स्टोरेज ३२ GB पर्यंत आहे. ज्यामध्ये तुम्हाला ५१२ GB पर्यंत microSD कार्ड सपोर्ट मिळेल. पॉवरसाठी, Redmi 9A सपोर्टमध्ये ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे.

वाचा :मस्तच ! एका रिचार्जमध्ये चालणार ३ सिम, १५० GB पर्यंत डेटा आणि OTT बेनिफिट्सही मिळणार, फक्त ‘या’ प्लानमध्ये, पाहा डिटेल्स

Lava X2

lava-x2

मजबूत बॅटरी आणि अप्रतिम डिस्प्ले असलेला हा लावा फोन ७,९९९ रुपयांऐवजी ६,९९८ रुपयांना विकला जात आहे. HSBC कॅशबॅक कार्ड वापरून तुम्हाला ३५० रुपयांची सूट मिळेल आणि तुम्ही एक्सचेंज ऑफरसह ६,६०० रुपये वाचवाल. दोन्ही ऑफरचा पूर्ण लाभ घेतल्यानंतर, तुम्ही Lava X2 ४८ मध्ये खरेदी करू शकाल.स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. यात फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉकचा देखील सपोर्ट मिळतो. फोटोग्राफीबद्दल सांगायचे तर Lava X2 मध्ये सिंगल कॅमेरा सेटअप आहे. यात ८ मेगापिक्सल मुख्य कॅमेर आणि फ्रंटला सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

वाचा: स्मार्टवॉच खरेदीमध्ये कन्फ्युज असाल तर पाहा स्वस्त स्मार्टवॉचची ‘ही’ लिस्ट, सुरुवातीची किंमत २,४९९ रुपये, फीचर्सही सुपरहिट

Samsung Galaxy M12

samsung-galaxy-m12

सॅमसंगचा हा Samsung Galaxy M12 स्मार्टफोन १२,९९९ रुपयांऐवजी १०,४९९ रुपयांना विकला जात आहे. HSBC कॅशबॅक कार्ड युजर्सना ५ % सूट मिळेल आणि तुम्ही एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळवून ९,८०० रुपये वाचवू शकाल. तुम्ही Samsung Galaxy M12 १७४ रुपयांमध्ये घरी घेऊ शकता. Samsung Galaxy M12 स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात प्रायमरी सेन्सर ४८ मेगापिक्सल, ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, २ मेगापिक्सलचा डेप्थ आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा दिला आहे.

वाचा :का आणि किती वेळा झाले OnePlus Nord स्मार्टफोनमध्ये ब्लास्ट? पाहा लिस्ट, अशी घ्या काळजी

Tecno Pop 5

tecno-pop-5

या स्टायलिश स्मार्टफोनची किंमत ८,९९९ रुपये आहे. पण, सेलमध्ये तो ६,५९९ रुपयांना विकला जात आहे. HSBC बँकेचे कॅशबॅक कार्ड वापरून, तुम्हाला ५% सवलत मिळेल म्हणजेच ३३० रुपये आणि तुम्ही एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळवून ६,२०० रुपये वाचवू शकाल. एकूणच, तुम्ही हा फोन ६९ रुपयांना खरेदी करू शकता.या फोनमध्ये ६.५२ इंच Dot Notch HD+ डिस्प्ले दिला आहे. यात पॉवरसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. तर फोटोग्राफीसाठी ८ मेगापिक्सल ड्यूल रियर कॅमेरा आणि फ्रंटला सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज मिळेल.

वाचा: पहिल्याच सेलमध्ये स्वस्तात खरेदी करा Realme 9 4G , मिळतोय हजारोंचा डिस्काउंट, फोनमध्ये १०८ MP कॅमेरासारखे फीचर्स

Oppo A15s

oppo-a15s

हा Oppo फोन १३,९९० रुपयांऐवजी १०,९९० रुपयांना विकला जात आहे. HSBC कॅशबॅक कार्ड युजर्स ५ % सवलत मिळवू शकतात. Oppo A15s तुम्ही एक्स्चेंज ऑफरवर देखील खरेदी करू शकता. आणि एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ घेतल्यास तुम्ही Oppo A15s वर संपूर्ण १०,२५० रुपये वाचवू शकता. म्हणजेच तुम्ही Oppo A15s फक्त १९० रुपयांना खरेदी करू शकता. या फोनमध्ये ६.५२ इंचाचा एचडी प्लस वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिला आहे. फोनची बॉडीची डिझाईन ३डी कर्व्ड आहे. फोनमध्ये अँड्रॉयड आधारीत कलर्स ७.२ दिला आहे. तसेच यात डार्क मोड सुद्धा आहे.

वाचा : उन्हाळ्यात दिवसभर बिनधास्त वापरा AC, Electricity Bill येणार कमी, फॉलो करा ‘या’ कूल टिप्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here