स्मार्टकॉइन (SmartCoin)

इंस्टंट लोन हवे असल्यास स्मार्टकॉइन (SmartCoin) हे अॅप तुम्हाला खूपच उपयोगी येईल. या अॅपचा उपयोग करून तुम्ही पर्सनल लोन घेऊ शकता. अॅपद्वारे अॅप्लिकेशन भरल्यावर तुम्हाला काही मिनिटातच कर्ज मिळेल. यासाठी तुम्हाला एक ओळखपत्र, सेल्फी, कर्जाची रक्कम व बँक खात्याची माहिती द्यावी लागेल. या अॅपद्वारे तुम्हाला १० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत पर्सनल लोन मिळेल. तुम्हाला जर कोणत्याही कामासाठी कर्ज हवे असल्यास तुम्ही हे अॅप वापरू शकता.
वाचा- खूपच शानदार आहे ‘हा’ कूलर, AC प्रमाणे भिंतीवरही टांगता येईल; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
कॅपिटल फर्स्ट (Capital First)

इंस्टंट लोनसाठी कॅपिटल फर्स्टसाठी (Capital First) हे देखील एक चांगले अॅप आहे. कॅपिटल फर्स्ट अॅपमुळे तुमची कर्जाची चिंता एकाच ठिकाणी दूर होईल. या अॅपच्या मदतीने तुम्ही मिनिटात कर्जासाठी अर्ज करू शकता. याद्वारे तुम्हाला पर्सनल, बिझनेस आणि कार लोनसाठी अर्ज करू शकता. तसेच, तुम्हाला अॅपमध्ये कर्जाशी संबंधित सर्व माहिती मिळेल. कॅपिटल फर्स्ट हे अॅप यूजर्सला नॉटिफिकेशनच्या माध्यमातून पर्सनल लोन ऑफर्सची माहिती देते.
कॅशे (CASHe)

तुम्हाला अगदी कमी कालावधीसाठी कर्ज हवे असल्यास कॅशे (CASHe) हे अॅप एक चांगला पर्याय आहे. कॅशे (CASHe) अॅप १५ दिवसांच्या कालावधीसाठी इंस्टंट लोन प्रदान करते. या अॅपद्वारे तुम्हाला १० हजार ते २० हजार रुपयांपर्यंत त्वरित कर्ज मिळेल. नोकरदार वर्गासाठी हे अॅप चांगला पर्याय आहे. विशेष म्हणजे कर्जासाठी तुम्हाला जास्त कागदपत्रं देखील द्यावी लागत नाही. यूजर्सला केवळ पॅन कार्ड नंबर, एड्रेस प्रूफ, लेटेस्ट सॅलरी स्लिप, बँक स्टेटमेंट आणि सेल्फी इत्यादी माहिती द्यावी लागेल.
क्रेडिटबी (KreditBee)

क्रेडिटबी (KreditBee) हे इंस्टंट लोन अॅप आहे. तुम्हाला कर्ज म्हणून जास्त पैसे हवे असल्यास या अॅपचा वापर करू शकता. मात्र, कर्जासाठी तुम्हाला सुरुवातीला एक लांबलचक अॅप्लिकेशन फॉर्म भरून द्यावा लागेल. तुम्हाला अॅप्लिकेशनमध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड व इतर खासगी माहिती द्यावी लागेल. KreditBee च्या माध्यमातून तुम्ही २ हजार रुपये ते २ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता. कर्जाची सर्व प्रक्रिया ऑनलाइनच पार पडते.
वाचा: १० हजारांच्या बजेटमध्ये धुमाकूळ घालायला येतोय ‘हा’ दमदार स्मार्टफोन, १५ एप्रिलला भारतात करणार एंट्री
एमपॉकेट (mPokket)

एमपॉकेट (mPokket) हे एक इंस्टंट लोन अॅप आहे. याद्वारे तुम्हाला ५०० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज त्वरित उपलब्ध होते. अॅपद्वारे कर्जाची रक्कम टप्प्या टप्प्याने देखील घेऊ शकता. या अॅपच्या माध्यमातून एकाच दिवशी तुम्ही कमी रक्कमेचे वेगवेगळे कर्ज घेऊ शकता. mPokket हे विद्यार्थ्यांना देखील कर्ज देते. mPokket या अॅपची सुरुवात २०१६ साली झाली आहे. तसेच, अॅपला प्ले स्टोरवर ४ स्टार रेटिंग देखील मिळाले आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times