जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल पण तुमचे बजेट कमी असेल. तर, काळजीचे कारण नाही. तुम्ही खूप कमी किमतीत काही भन्नाट स्मार्टफोन्स खरेदी करू शकता. स्मार्टफोन बायर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, Flipkart Apple, Google, Samsung, Xiaomi सारख्या ब्रँड्सच्या रिफर्बिश्डस्मार्टफोन्सवर प्रचंड सवलत देत आहे. या फोन्समध्ये एकापेक्षा एक भारी फीचर्स देण्यात आले असून प्रत्येक स्मार्टफोन यूजर्सना ते नक्कीच आवडतील. फ्लिपकार्टच्या रिफर्बिश्ड स्टोअरमध्ये, Apple iPhones ९,९९९ रुपयांपासून सुरू होत आहेत, सॅमसंग स्मार्टफोन्सची किंमत ३,९९९ रुपये आणि Xiaomi स्मार्टफोनची किंमत ४,२९९ रुपयांपासून सुरू आहे. त्याच वेळी, Google Pixel स्मार्टफोन ९९९८ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहेत. जाणून घ्या या स्मार्टफोन्सबद्दल सविस्तर. विशेष म्हणजे, या स्मार्टफोन्सच्या किमती खूपच कमी असल्याने तुम्ही हे गिफ्ट म्हणून देखील देऊ शकता.

​काय आहेत Refurbished स्मार्टफोन ?

-refurbished-

refurbished स्मार्टफोन काय आहेत? स्मार्टफोन खरेदी करायचा आहे. पण, कमी बजेटमुळे खरेदी न करता येणाऱ्यांकरिता refurbished mobile sale एक चांगला पर्याय ठरू शकतो refurbished mobile sale स्मार्टफोन हे प्री ओन्ड डिव्हाइसेस असतात. जे पूर्वी काही इतर युजर्सने वापरले आहेत. पण, फ्लिपकार्टने सांगण्यात आले आहे की, हे स्मार्टफोन्स प्लॅटफॉर्मवर लिस्ट होण्यापूर्वी ४७ गुणवत्तेची तपासणी करतात आणि तीन किंवा सहा महिन्यांच्या वॉरंटीसह येतात, जे स्मार्टफोन चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करते. थोडक्यात सांगायचे तर, कमी किमतीत तुम्ही मोबाईल खरेदी करू शकता.

वाचा : उन्हाळ्यात दिवसभर बिनधास्त वापरा AC, Electricity Bill येणार कमी, फॉलो करा ‘या’ कूल टिप्स

​Xiaomi स्मार्टफोन

xiaomi-

Xiaomi स्मार्टफोन (Xiaomi स्मार्टफोन): दुसरीकडे, जर आपण Xiaomi बद्दल बोललो तर, रिफर्बिश्ड Redmi 4A च्या २ GB RAM + १६ GB स्टोरेज पर्यायाची किंमत Flipkart वर ४,९८९ रुपये आहे, तर रिफर्बिश्ड Mi Redmi Note 6 Pro फ्लिपकार्ट रिफर्बिश्ड वर ७१,९९ रुपयांना विकण्यात येत आहे. Redmi 4A स्मार्टफोनचा डिस्प्ले ५ इंचांचा आहे. रेझ्युलेशन ७२० x १२८० पिक्सल्स इतके आहे. स्मार्टफोनची इंटर्नल मेमरी १६ जीबी आहे. याबरोबर१२८ जीबी पर्यंतचे मायक्रोएसडी कार्डाचा वापरही करता येणार आहे.

वाचा स्मार्टवॉच खरेदीमध्ये कन्फ्युज असाल तर पाहा स्वस्त स्मार्टवॉचची ‘ही’ लिस्ट, सुरुवातीची किंमत २,४९९ रुपये, फीचर्सही सुपरहिट

​Google Pixel फोन

google-pixel-

Google Pixel फोन: Google Pixel 3a 64GB व्हेरिएंट ब्लॅक आणि व्हाईट अशा दोन्ही कलर पर्यायांमध्ये फ्लिपकार्टच्या रिफर्बिश्ड स्टोअरमध्ये उपलब्ध आहे, ज्याची किंमत ९,९९८ रुपये आहे. तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म रिफर्बिश्ड Google Pixel 3 XL (६४ GB) १३,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ‘३ A’ सीरिजमध्ये १२.२ मेगापिक्सलचा ड्युल-पिक्सल सोनी ‘आयएमएक्स ३६३’ कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. ‘पिक्सल ३ ए’मध्ये युएसबी टाइप-सी पोर्ट, सिंगल नॅनो सिम सपोर्ट, ३.५ एमएम हेडफोन जॅक, ब्लूटूथ ५.० आणि एनएफसीसारखे फीचर्स आहेत.

वाचा : UPI वापरतांना युजर्स हमखास करतात ‘या’ चुका, तुम्हीही करत असाल तर लगेच अलर्ट व्हा, पाहा डिटेल्स

​सॅमसंग फोनवर डिस्काउंट

सॅमसंग फोन वर डिस्काउंट: सॅमसंग कंपनीचे स्मार्टफोन्स ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. सॅमसंगचे काही जबरदस्त फोन कमी किमतीत खरेदी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. रिफर्बिश्ड सॅमसंग गॅलेक्सी J2 स्मार्टफोनची किंमत फ्लिपकार्टवर ३,९९९ रुपये आहे, तर Samsung On5 Pro च्या गोल्ड कलर व्हेरिएंटची किंमत ४,४९९ रुपये आणि ब्लॅक कलर १६ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४,८९५ रुपये आहे. त्याच वेळी, Samsung Galaxy J5 ची किंमत ४,७८९ रुपये आहे. हे सर्व स्मार्टफोन्स सेलमध्ये स्वस्तात उपलब्ध आहेत. म्हणजेच या स्मार्टफोनसाठी तुम्हाला खूपच कमी पैसे द्यावे लागतील.

वाचा :Realme च्या फास्ट चार्जिंग लॅपटॉपसह Buds Air 3 चा पहिला सेल आज, डिव्हाइसेस स्वस्तात खरेदीची संधी

Apple आयफोनवर मिळतोय इतका डिस्काउंट

apple-

Apple आयफोनवर मिळतोय इतका डिस्काउंट: फ्लिपकार्टवर अॅपलच्या फोनवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. रिफर्बिश्ड Apple iPhone 7 (ब्लॅक, ३२ GB) Flipkart वर ७६ % च्या सूटसह १४,४९९ रुपयांमध्ये विकला जात आहे. त्याच वेळी, रिफर्बिश्ड Apple iPhone 6s (३२ GB) फ्लिपकार्टवर ११,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. तर, दुसरीकडे iPhone SE ब्लॅक कलर ९,९५० रुपयांना आणि व्हाइट आणि सिल्व्हर कलर पर्याय ९,९९९ रुपयांना विकले जात आहे. याशिवाय, स्पेस ग्रे कलरमधील iPhone 8 च्या ६४ GB व्हेरिएंटची किंमत १७,८९० रुपये आहे.

वाचा: पॉवर कटला वैतागून इन्व्हर्टर खरेदी करण्यापेक्षा घरी आणा ‘हे’ रिचार्जेबल Led Bulbs, किंमत २९० रुपये, बॅटरी लाईफ ५ तास

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here