भारतीय बाजारात गेल्या काही महिन्यात स्मार्टफोनसोबतच स्मार्ट टीव्हीची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोक घरीच मोठ्या स्क्रीनवर चित्रपट, सीरिजचा आनंद घेत आहेत. बाजारात मोठ्या स्क्रीन साइजमध्ये येणारे अनेक स्वस्त टीव्ही उपलब्ध आहेत. तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ई-कॉमर्स साइट Flipkart वर सध्या सुरू असलेला Big Savings Day Sale सेल तुमच्या फायद्याचा ठरेल. हा सेल १२ एप्रिलपासून सुरू झाला असून, तुम्ही १४ एप्रिलपर्यंत स्वस्तात टीव्ही खरेदी करू शकता. Flipkart Big Savings Day Sale सेलमध्ये LG, Mi, Samsung आणि Realme सारख्या कंपन्यांच्या Smart TV वर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळत आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये ४३ इंचाचे शानदार टीव्ही स्वस्तात उपलब्ध आहेत. या टीव्हींवर शानदार डील्स, एक्सचेंज ऑफर्स आणि बँक ऑफरचा फायदा मिळेल.

​Mi 5X 108 cm (43 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV with Dolby Atmos and Dolby Vision

mi-5x-108-cm-43-inch-ultra-hd-4k-led-smart-android-tv-with-dolby-atmos-and-dolby-vision

Mi 5X 43 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV ची मूळ किंमत ४९,९९९ रुपये आहे. परंतु, सेलमध्ये ३९ टक्के डिस्काउंटनंतर फक्त ३०,४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. जुना टीव्ही दिल्यास तुम्हाला ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. तसेच, ICICI Bank क्रेडिट कार्डचा वापर करून टीव्ही खरेदी केल्यास १० टक्के (१,२५० रुपयांपर्यं) डिस्काउंट मिळेल. तर HDFC Bank क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १,२५० रुपये डिस्काउंटचा फायदा होईल. HDFC क्रेडिट/डेबिट कार्ड ईएमआयवर २ हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल.

वाचा – १८ हजारांचा रियलमीचा शानदार स्मार्ट टीव्ही फक्त ३,९९९ रुपयात होईल तुमचा, ऑफर्सचे शेवटचे दिवस; जाणून घ्या संपूर्ण माहिती

​Mi 4X 108 cm (43 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV

mi-4x-108-cm-43-inch-ultra-hd-4k-led-smart-android-tv

Mi च्या ४३ इंच Ultra HD (4K) LED Smart Android TV ची मूळ किंमत ३४,९९९ रुपये आहे. परंतु, २३ टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही फक्त २६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर तुम्हाला १६,९०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळेल. तसेच, ICICI Bank क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १० टक्के (१,२५० रुपयांपर्यंत) डिस्काउंटचा फायदा होईल. HDFC Bank क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १,२५० रुपये डिस्काउंट मिळेल. HDFC क्रेडिट/डेबिट कार्ड ईएमआयवर २ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिले जात आहे.

वाचा: धमाकेदार फीचर्ससह BoAt चे नवीन इयरबड्स भारतात लाँच, ५ मिनिटांच्या चार्जमध्ये १ तास ऐकू शकता गाणी; जाणून घ्या किंमत

​Samsung Crystal 4K 108 cm (43 inch) Ultra HD (4K) LED Smart TV

samsung-crystal-4k-108-cm-43-inch-ultra-hd-4k-led-smart-tv

फ्लिपकार्ट सेलमध्ये Samsung च्या टीव्हीवर देखील आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळत आहे. सॅमसंगच्या ४३ इंच LED Smart TV ची मूळ किंमत ५२,९०० रुपये आहे. तुम्ही ३६ टक्के डिस्काउंटनंतर ३३,९९० रुपयात खरेदी करू शकता. ICICI Bank क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला टीव्ही १,२५० रुपयांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंटचा फायदा मिळेल. तसेच, एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. जुना टीव्ही दिल्यास तुम्हाला ११ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा होईल.

वाचा: १० हजारांच्या बजेटमध्ये धुमाकूळ घालायला येतोय ‘हा’ दमदार स्मार्टफोन, १५ एप्रिलला भारतात करणार एंट्री

​Realme 108 cm (43 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV

realme-108-cm-43-inch-ultra-hd-4k-led-smart-android-tv

Realme 43 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV देखील फ्लिपकार्ट सेलमध्ये आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध आहे. Realme च्या या टीव्हीची किंमत ३२,९९९ रुपये आहे. परंतु, सेलमध्ये १५ टक्के डिस्काउंटनंतर २७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. रियलमीच्या टीव्हीवर ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. याशिवाय, ICICI Bank क्रेडिट कार्ड वापरून टीव्हीला खरेदी केल्यास १,२५० रुपयांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंटचा फायदा होईल. अशाप्रकारे, टीव्हीला स्वस्तात खरेदी करू शकता.

वाचा: वारंवार चार्जिंगची गरज नाही! २८ तासांच्या बॅटरी लाईफसह Oppo चे शानदार इयरबड्स भारतात लाँच, किंमत खूपच कमी

​LG 108 cm (43 inch) Ultra HD (4K) LED Smart TV

lg-108-cm-43-inch-ultra-hd-4k-led-smart-tv

LG 43 inch Ultra HD (4K) LED Smart TV ची मूळ किंमत ५९,९९० रुपये आहे. परंतु, ४३ टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही फक्त ३३,९९९ रुपयात टीव्हीला खरेदी करू शकता. यावर एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळेल. जुना टीव्ही दिल्यास ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा होईल. याशिवाय, ICICI Bank क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. तुम्ही जर कमी किंमतीत येणारा मोठा टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे चांगले पर्याय ठरतील.

वाचा: ८GB रॅम आणि ६४MP ट्रिपल कॅमेऱ्यासह Oppo चे दोन भन्नाट स्मार्टफोन्स भारतात लाँच, किंमत तुमच्या बजेटमध्ये; पाहा डिटेल्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here