नवी दिल्लीः संपूर्ण जगात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जगातील अनेक देशात करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना घरातच थांबावे लागत आहे. करोना व्हायरसमुळे लोकांच्या अडचणी वाढल्या असल्या तरी अॅप कंपन्यांना याचा मोठा फायदा झाला आहे. लॉकडाऊनमध्ये स्मार्टफोन आणि अॅप्स मनोरंजन हेच अनेकांची करमणूक साधन बनले आहे. त्यामुळे लोक यावर जास्त वेळ घालवत आहेत. त्यामुळे युजर्संनी अॅप्सवर २०२० च्या पहिल्या तिमाहित २३.४ बिलियन अमेरिकी डॉलर म्हणजेच १७८१ अब्ज रुपये खर्च केले आहेत.

वाचाः

अॅप मनी (App Annie) च्या एका रिपोर्टनुसार, वर्ष २०२० मध्ये सर्वात जास्त युजर्संनी मोबाइल अॅप्लिकेशनवर खर्चे केले आहे. २०१९ च्या तुलनेत या वर्षी युजर्संने दर आठवड्याला अॅप्स आणि गेम्सवर २० टक्क्यापेक्षा अधिक वेळ घालवला आहे.

अॅपल अॅप स्टोरवर १५ बिलियन डॉलर खर्च

अॅप मनीच्या रिपोर्टनुसार, प्रत्येक पेजवर खर्च झालेल्या २३.४ बिलियन डॉलर्समध्ये अॅपल अॅप स्टोरवर १५ बिलियन डॉलर आणि गुगल प्ले स्टोरवर ८.३ बिलियन डॉलर खर्च करण्यात आले आहेत. दोन्ही प्रसिद्ध अॅप प्लेटफॉर्मवर २०१९ ते आता पर्यंत ५ टक्के इयर ऑन वाढ अशी नोंद करण्यात आली आहे. तसेच आयओएस युजर्सने नॉन गेमिंग अॅप्लिकेशनवर ३५ टक्के आणि गुगल स्टोरवर युजर्संनी १५ टक्के खर्च केलेत.

वाचः

खर्च करण्यात हे देश टॉपवर

तिमाहित गेम्सवर १६.७ बिलियन अमेरिकन डॉलर खर्च करण्यात आले. जारी करण्यात आलेल्या डेटानुसार, अमेरिका आणि चीनमध्ये आयओएस वर सर्वात जास्त खर्च करण्यात आले. तर गुगल प्ले स्टोरवर जपान आणि दक्षिण कोरियांच्या युजर्संनी सर्वात जास्त खर्च केले. अँड्रॉयडचे प्रसिद्ध अॅप्स गेम्स, सोशल मीडिया, इंटरटेनमेंटशिवाय डिजनी प्लस आणि Twitch यासारख्या स्ट्रिमिंग सेवेचा समावेश होता.

वाचाः

टिकटॉकची प्रसिद्धीत वाढ

आयओएसवर युजर्संने गेम, इंटरटेनमेंटसह फोटो आणि व्हिडिओ अॅपवर खर्च करण्यात आले आहेत. यात टिकटॉकचा समावेश आहे. टिकटॉकने आयओएस च्या टॉप कन्ज्युमर स्पेंडिंग अॅप्सच्या यादीत आपले स्थान मिळवले आहे. टिकटॉकची प्रसिद्धी खूप वाढली आहे. टिकटॉक सध्या तीन नंबरवर आहे. टिंडर आणि यूट्यूब टिकटॉकच्या पुढे आहेत. लॉकडाऊनच्या काळात ३१ बिलियन नवीन अॅप्स डाऊनलोड करण्यात आले आहेत.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here