भारतीय बाजारात स्मार्ट टीव्हीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्राहकांची मागणी पाहता कंपन्या देखील एकापेक्षा एक शानदार स्मार्ट टीव्ही सादर करत आहेत. तुम्ही जर नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्याकडे चांगली संधी आहे. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर TV Days सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये ७.५ हजार रुपयांपासून ते १५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये शानदार फीचर्ससह येणारे LED Smart TV खरेदीसाठी उपलब्ध आहे. या सेलमध्ये तुम्ही टीव्हीला बंपर डिस्काउंट आणि आकर्षक ऑफर्ससह खरेदी करू शकता. Flipkart TV Days सेलचा लाभ १९ एप्रिलपर्यंत घेता येईल. या सेलमध्ये तुम्हाला KODAK, Realme, OnePlus, MarQ By Flipkart आणि Thomson च्या स्मार्ट टीव्हीवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळेल. सेलमध्ये आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध असलेल्या या टीव्हींविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​KODAK 60 cm (24 inch) HD Ready LED TV(24HDX100S)

kodak-60-cm-24-inch-hd-ready-led-tv24hdx100s

KODAK 24 inch HD Ready LED TVची मूळ किंमत १०,४९९ रुपये आहे. परंतु, सेलमध्ये हा टीव्ही फक्त ७,४९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. टीव्हीला खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेच्या कार्डचा वापर केल्यास ५ टक्के कॅशबॅकचा फायदा मिळेल. या टीव्हीमध्ये २४ इंच शानदार डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १३६६x७६८ पिक्सल, रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. KODAK चा हा टीव्ही २० वॉट स्पीकरसह येतो.

वाचा – घरीच घ्या थिएटरचा आनंद! फक्त ९,९९९ रुपयात मिळतोय ५० इंच स्मार्ट टीव्ही, EMI वरही खरेदीची संधी

​Realme 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV

realme-80-cm-32-inch-hd-ready-led-smart-android-tv

Realme HD Ready LED Smart Android TV ला फ्लिपकार्ट सेलमध्ये फक्त १४,९९९ रुपयात खरेदी करू शकता. तुम्ही जर SBI कार्डचा वापर करून टीव्हीला खरेदी केल्यास १ हजार रुपये अतिरिक्त डिस्काउंटचा फायदा मिळेल. तसेच, फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास ५ टक्के कॅशबॅकचा फायदा मिळेल. टीव्हीवर ४,७५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा होईल. ही ऑफर जुन्या टीव्हीच्या मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे.

वाचाः एकाच रिचार्जमध्ये तब्बल ४५५ दिवसांची वैधता, मिळेल १३६५GB डेटा आणि फ्री कॉल्स; दिवसाचा खर्च फक्त ६ रुपये

​OnePlus Y1 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV(32HA0A00)

oneplus-y1-80-cm-32-inch-hd-ready-led-smart-android-tv32ha0a00

OnePlus Y1 32 inch HD Ready LED Smart Android TV सेलमध्ये फक्त १४,९९९ रुपयात उपलब्ध आहे. वनप्लसच्या या टीव्हीला तुम्ही फ्लिपकार्ट सेलमध्ये १९ एप्रिलपर्यंत स्वस्तात खरेदी करू शकता. तुमच्याकडे एसबीआय कार्ड असल्यास तुम्हाला २ हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंटचा फायदा मिळेल. स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर यामध्ये ३२ इंच HD Ready LED डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. यात २० वॉटचे साउंड आउटपूट मिळतो.

वाचाः Jio ची धमाकेदार ऑफर! चक्क मोफत देत आहे ४जी स्मार्टफोन, जाणून घ्या संपूर्ण माहिती

​MarQ By Flipkart 80 cm (32 inch) HD Ready LED TV(32HDNDMSVAB)

marq-by-flipkart-80-cm-32-inch-hd-ready-led-tv32hdndmsvab

MarQ By Flipkart 32 inch HD Ready LED TV देखील सेलमध्ये खूपच स्वस्तात उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये हा शानदार टीव्ही फक्त ८,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. टीव्ही खरेदी करताना फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेच्या कार्डचा वापर केल्यास ५ टक्के कॅशबॅकचा फायदा मिळेल. तसेच, SBI क्रेडिट कार्ड वापरून टीव्ही खरेदी केल्यास १,५०० रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा होईल. हा टीव्ही २० वॉट स्पीकर आणि ६० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येतो.

वाचाः स्वस्तात खरेदी करा Apple चे प्रोडक्ट्स; iPhone, iPad सह अनेक डिव्हाइसवर बंपर डिस्काउंट, होईल हजारो रुपयांची बचत

​Thomson 9A Series 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV (32PATH0011)

thomson-9a-series-80-cm-32-inch-hd-ready-led-smart-android-tv-32path0011

Thomson 9A Series 32 inch HD Ready LED Smart Android TV सेलमध्ये १५ हजारांच्या बजेटमध्ये उपलब्ध आहे. या टीव्हीला तुम्ही फक्त ११,९९९ रुपयात खरेदी करू शकता. टीव्ही खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास ५ टक्के कॅशबॅकचा फायदा मिळेल. याशिवाय, SBI क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला १,५०० रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. टीव्हीवर ४,२०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास टीव्हीला अजून स्वस्तात खरेदी करू शकता.

वाचाः स्वस्त स्मार्टवॉच खरेदीचे स्वप्न होणार पूर्ण! ‘या’ तारखेला भारतात लाँच होणार Dizo Watch S; पाहा डिटेल्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here