सध्या भारतात स्मार्टवॉचची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हेल्थ फीचर्ससोबतच स्टाइलिश लूकसह येणाऱ्या स्मार्टवॉचला ग्राहकांची पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे यांची किंमत देखील कमी असल्याने ग्राहकांकडून सर्वसाधारण घड्याळाच्या तुलनेत स्मार्टवॉच खरेदीला प्राधान्य दिले जाते. बाजारात दमदार फीचर्ससह येणाऱ्या अनेक शानदार स्मार्टवॉच उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या वॉचच्या माध्यमातून तुम्ही कॉलिंग देखील करू शकता. स्मार्टवॉचमध्ये SPO2 सोबतच ब्लूटूथ कॉलिंग फीचरचा सपोर्ट दिला जात आहे. यामुळे तुम्ही फोनवर करू शकणारे प्रत्येक काम स्मार्टवॉचच्या माध्यमातून सहज करू शकता. मेसेज नॉटिफिकेशन, हेल्थ ट्रॅकिंगची देखील यात सुविधा मिळते. बाजारात ५ हजारांच्या बजेटमध्ये Fire-Boltt Ring 2, Noise Colorfit Ultra, Crossbeats Ignite S4, Pebble Cosmos Pro आणि ZOOOK Dash या शानदार वॉच उपलब्ध आहेत. कॉलिंग सपोर्टसह येणाऱ्या या वॉचविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Fire-Boltt Ring 2

fire-boltt-ring-2

Fire-Boltt Ring 2 स्मार्टवॉच ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येते. यामध्ये १.६९ इंचाची शानदार एचडी स्क्रीन दिली आहे. याचा फुल टच डिस्प्ले हा २४०x२८० पिक्सल रिझॉल्यूशनसह येतो. यामध्ये वॉइस असिस्टेटंचा सपोर्ट दिला आहे. वॉच वॉटर रेसिस्टेंट आहे. म्हणजेच, पाण्यात देखील सुरक्षित राहते. तसेच, सिंगल चार्जमध्ये या वॉचला तुम्ही एक आठवडा सहज वापरू शकता. Fire-Boltt ची ही शानदार स्मार्टवॉच ४,४९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे.

वाचा – धमाकेदार सेल! अवघ्या १ रुपयात मिळत आहे ‘हे’ प्रोडक्ट, लॅपटॉप-फोन्सवरही ६ हजार रुपयांपर्यंत सूट; पाहा डिटेल्स

Noise Colorfit Ultra

noise-colorfit-ultra

Noise Colorfit Ultra स्मार्टवॉचमध्ये १.७५ इंच TruView स्क्रीन दिली आहे. यात अनेक शानदार हेल्थ फीचर्स देखील मिळतात. यामध्ये ऑक्सिजन, हार्ट रेट, स्ट्रेस, REM आणि स्लिप मॉनिटर्स दिले आहे. यात हेल्थ केअर पर्सनल असिस्टेंटचा देखील सपोर्ट मिळतो. यामध्ये ६० इनबिल्ट स्पोर्ट्स मोड्सचा सपोर्ट दिला आहे. यात कॉल्स आणि एसएमएसला रिप्लाय देण्याची सुविधा मिळते. वॉच अँड्राइड आणि आयओएस डिव्हाइसला सपोर्ट करते. Noise Colorfit Ultra ची किंमत ३,१९९ रुपये आहे.

वाचाः स्वस्तात खरेदी करा Apple चे प्रोडक्ट्स; iPhone, iPad सह अनेक डिव्हाइसवर बंपर डिस्काउंट, होईल हजारो रुपयांची बचत

Crossbeats Ignite S4

crossbeats-ignite-s4

Crossbeats Ignite S4 मध्ये १.८ इंच IPS HD 3D कर्व्ड डिस्प्ले दिला आहे. यात ब्लड ग्लूकोज मॉनिटर आणि लोकेशन शेअरिंगसह बिल्ट-इन वॉइस असिस्टेंटचा सपोर्ट मिळतो. वॉचला ग्रीन, ब्लू आणि ब्लॅक कलरमध्ये खरेदी करता येईल. वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंगचा सपोर्ट दिला असून, याद्वारे तुम्ही कॉलला उत्तर देऊ शकता. डिव्हाइस वॉटर रेसिस्टेंट आहे. तसेच, सिंगल चार्जमध्ये याची बॅटरी ३ दिवस टिकते. Crossbeats Ignite S4 स्मार्टवॉचची किंमत ४,९९९ रुपये आहे.

वाचाः स्वस्त स्मार्टवॉच खरेदीचे स्वप्न होणार पूर्ण! ‘या’ तारखेला भारतात लाँच होणार Dizo Watch S; पाहा डिटेल्स

Pebble Cosmos Pro

pebble-cosmos-pro

Pebble Cosmos Pro एक शानदार ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉच आहे. यात अनेक जबरदस्त फीचर्स दिले आहे. यामध्ये इनबिल्ट स्टोरेज दिले असून, याद्वारे तुम्ही गाणी रेकॉर्ड करू शकता. यात SpO2, BP सह इतर हेल्थ फीचर्स देखील मिळतात. यामध्ये १.७ इंच शानदार एचडी एलसीडी डिस्प्ले दिला आहे. स्टँडबाय मोडवर याची बॅटरी सिंगल चार्जमध्ये १५ दिवस टिकते. Pebble Cosmos Pro स्मार्टवॉचला तुम्ही २,९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता.

वाचाः घरीच घ्या थिएटरचा आनंद! फक्त ९,९९९ रुपयात मिळतोय ५० इंच स्मार्ट टीव्ही, EMI वरही खरेदीची संधी

ZOOOK Dash

zoook-dash

ZOOOK Dash स्मार्टवॉचमध्ये १.६९ इंच फुल एचडी स्क्रीन दिली आहे. यात तुम्हाला इनकमिंग कॉल रिमाइंडर्स, शेड्यूल रिमाइंडर्ससह अनेक फीचर्स मिळतात. यात हेल्थ फीचर्स देखील दिले आहेत. वॉचमध्ये तुम्हाला २४x७ हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सिजन लेव्हल मॉनिटर सारखे फीचर्स मिळतात. यात १९ स्पोर्ट्स मोड दिले आहेत. याची बॅटरी सिंगल चार्जमध्ये १० दिवस टिकते. ZOOOK Dash स्मार्टवॉच फक्त २,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे.

वाचाः मोबाइल नंबर सुरू ठेवण्यासाठी उपयोगी येईल ‘हा’ प्लान, फक्त ७९७ रुपयात ३९५ दिवसांची वैधता; पाहा बेनिफिट्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here