वाचाः
या अॅपच्या माध्यमातून लोकांना जिओ पार्टनर बनवता येते तसेच दुसऱ्या जिओ नंबरवर रिचार्ज करता येवू शकते. त्यासाठी कंपनी त्या लोकांना निश्चितपणे कमिशन देत आहे. याआधी लोक कंपनीचे अॅप आणि अधिकृत साईट यावर जाऊन जिओ नंबर रिचार्ज करीत होते. परंतु, याआधी त्यांनी कमिशन मिळत नव्हते. कंपनीोसोबत जोडलेल्या लोकांना (पार्टनर) ला एका रिचार्जवर ४.१६ टक्के कमिशन मिळणार आहे. या कमिशनची रक्कम लोकांना बँक किंवा ई-वॉलेट वर जमा करता येवू शकते. तसेच मोबाइल अॅपची २० दिवसांपूर्वीची रिचार्ज हिस्ट्री चेक करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
वाचाः
जिओ पोस लाइटमध्ये सर्वात आधी नोंदणी करावी लागेल. त्यानंतर ई-वॉलेट अॅड करावे लागेल. त्यात ५०० ते २००० रुपयांपर्यंत रक्कम टाकता येवू शकते. उदाहरणासाठी जर तुम्ही १०० रुपयांचा रिचार्ज केला तर कंपनी तुम्हाला ४.१६ टक्के कमिशन देईल. प्रत्येक वेळी तुम्हाला कमिशन मिळेल.
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times