देशभरातील अनेक शहरांमध्ये तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. उकाडा एवढा वाढला आहे की, घराच्या बाहेर पडणे अशक्य झाले आहेत. घरात देखील नियमित पंख्यामुळे देखील गर्मी कमी होताना दिसत नाही. अशा स्थितीमध्ये अनेकजण सीलिंग फॅन ऐवजी एसी, कूलर खरेदी करण्याला प्राधान्य देताना दिसत आहेत. एसी, कूलरद्वारे घर अगदी मिनिटात थंड होते. तुम्ही देखील नवीन कूलर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात एकापेक्षा एक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही चांगल्या ब्रँड्सचे कूलर अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता. बाजारात Symphony, Orient Electric, Feltron, CROMPTON आणि Hindware अशा कंपन्यांचे शानदार एअर कूलर्स उपलब्ध आहे. या कूलर्सला तुम्ही १ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत ईएमआयवर खरेदी करू शकता.

​Symphony 125 L Desert Air Cooler

symphony-125-l-desert-air-cooler

Symphony 125 L Desert Air Cooler तुमच्या १००० sq ft खोलीला सहज थंड करू शकतो. खास गोष्ट म्हणजे यात तुम्हाला वारंवार पाणी भरावे लागणार नाही. याचे वजन केवल २४ किलो आहे. व्हिल दिले असल्याने तुम्ही एका खोलीतून दुसऱ्या खोलीत सहज शिफ्ट करू शकता. तसेच, पाणी समाप्त झाल्यावर अलार्म वाजेल. याची मूळ किंमत २१,९९० रुपये असून, अ‍ॅमेझॉनवर १९,४९० रुपयात उपलब्ध आहे. तुम्ही HDFC क्रेडिट कार्डद्वारे ९४५ रुपयांच्या ईएमआयवर कूलर खरेदी करू शकता.

वाचाः जिओचा हा प्लान आहे बेस्ट! फक्त ८९९ रुपयात ३३६ दिवसांची वैधता; वर्षभर मिळेल डेटा-कॉलिंगसह अनेक फायदे

​Orient Electric 65 L Desert Air Cooler

orient-electric-65-l-desert-air-cooler

Orient Electric 65 L Desert Air Cooler देखील तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. या कूलरमध्ये इंस्टंट कूलिंगसाठी अँटी बॅक्टेरियल टँक, आइस चेंबर आहे. तसेच, मच्छरांची देखील समस्या जाणवत नाही. या एअर कूलरची लाँचिंग प्राइज १५ हजार रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवर सध्या फक्त १२,६९९ रुपयात उपलब्ध आहे. तुम्ही HDFC क्रेडिट कार्डचा वापर करून ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. ईएमआयवर खरेदी केल्यास तुम्हाला २४ महिन्यांसाठी दरमहिना ६१६ रुपये द्यावे लागतील.

वाचाः कमी किंमतीत जास्त फायदे! Jio-Airtel च्या ‘या’ प्लान्समध्ये मिळेल दररोज १ जीबी डेटा-अनलिमिटेड कॉलिंग; पाहा डिटेल्स

​Feltron 100 L Desert Air Cooler

feltron-100-l-desert-air-cooler

Feltron 100 L Desert Air Cooler देखील ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवर स्वस्तात उपलब्ध आहे. या Air Cooler द्वारे तुमचे घर अगदी मिनिटात थंड होईल. तुम्ही या Air Cooler ला ई-कॉमर्स साइट Flipkart वरून खरेदी करू शकता. हा कूलर १६,१४० रुपये किंमतीत उपलब्ध आहे. तसेच, दरमहिना ५६० रुपये देवून ईएमआयवर देखील कूलरला खरेदी करता येईल. Feltron 100 L Desert Air Cooler वर कंपनी १ वर्षाची वॉरंटी देत आहे.

वाचाः स्वस्तात मिळतायत रिमोटने कंट्रोल होणारे ‘हे’ पंखे, घर अगदी मिनिटात होईल थंड; किंमत फक्त…

​CROMPTON 100 L Desert Air Cooler

crompton-100-l-desert-air-cooler

CROMPTON 100 L Desert Air Cooler ची मूळ किंमत २१,५०० रुपये आहे. परंतु, तुम्ही ई-कॉमर्स साइट Flipkart वरून १३,९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. या कूलरवर १,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. तुम्ही जुना कूलर एक्सचेंज केल्यास अतिरिक्त सूट मिळेल. या कूलरला तुम्ही ४८६ रुपयांच्या ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. हा ६५० sq ft खोलीला सहज थंड करू शकतो. हा ३ स्पीड सेटिंग्ससह येतो.

वाचाः १० हजारांच्या बजेटमध्ये येतोय दमदार ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोन, लाँचआधी समोर आले फीचर्स; पाहा डिटेल्स

​Hindware 100 L Desert Air Cooler

hindware-100-l-desert-air-cooler

Hindware 100 L Desert Air Cooler ची मूळ किंमत १४,१९० रुपये आहे. परंतु, प्लिपकार्टवरून फक्त ११,६४९ रुपयात खरेदी करता येईल. तुम्ही फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरून ईएमआयवर कूलरला खरेदी करू शकता. ३६ महिन्यांसाठी दरमहिना फक्त ४०४ रुपये देवून तुम्ही कूलर ईएमआयवर खरेदी करू शकता. तुमच्या खोलीला हा कूलर अगदी काही मिनिटात थंड करेल. हा कूलर ३ स्पीड सेटिंग्ससह येतो.

वाचाः ‘या’ तारखेला भारतात एंट्री करणार Samsung चा स्वस्तात मस्त स्मार्टफोन, १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह मिळेल बरचं काही

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here