खासगी टेलिकॉम कंपन्या Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea कडे एकापेक्षा एक स्वस्त प्लान्सची मोठी लिस्ट उपलब्ध आहे. कंपन्या आपल्या ग्राहकांना कमी किंमतीत जास्तीत जास्त फायदे देण्याचा प्रयत्न करतात. केवळ डेटा, कॉलिंगच नाही तर या प्लान्समध्ये अतिरिक्त बेनिफिट्स देखील मिळत आहे. कंपन्यांकडे अगदी महिन्याभरापासून ते वर्षभराच्या वैधतेसह येणारे शानदार प्लान्स उपलब्ध आहेत. तुम्ही महिन्याभराच्या वैधतेसह येणारे स्वस्त प्लान्स शोधत असाल तर तिन्ही कंपन्या असे प्लान्स ऑफर करत आहे. Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea कडे ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे शानदार प्लान्स उपलब्ध आहेत. या प्लान्समध्ये दररोज डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंगचा फायदा मिळतो. तसेच, काही प्लान्समध्ये Amazon Prime चे देखील मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या या शानदार प्रीपेड प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Airtel चे शानदार प्रीपेड प्लान

airtel-

Airtel चा २०९ रुपयांचा प्रीपेड प्लान: Airtel च्या या प्लानमध्ये २१ दिवसांसाठी दररोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि १ महिन्यासाठी Amazon Prime चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

Airtel चा २३९ रुपयांचा प्रीपेड प्लान: या प्लानमध्ये २४ दिवसांसाठी दररोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. तसेच, प्राइम व्हिडिओ मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

Airtel चा २६५ रुपयांचा प्रीपेड प्लान: या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. तसेच, प्राइम व्हिडिओचा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो. प्लानची वैधता २८ दिवस आहे.

Airtel चा २९६ रुपयांचा प्रीपेड प्लान: या प्लानमध्ये ३० दिवसांसाठी एकूण २५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि Amazon Prime चे सबस्क्रिप्शन दिले आहे.

वाचा – Xiaomi ची धमाकेदार ऑफर! महागडा स्मार्ट टीव्ही मिळतोय खूपच स्वस्तात, फीचर्स एकच नंबर; पाहा डिटेल्स

​Reliance Jio चे शानदार प्रीपेड प्लान

reliance-jio-

Reliance Jio चा २५९ रुपयांचा प्रीपेड प्लान: जिओच्या या प्लानमध्ये एक महिन्यासाठी दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएस, JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

Reliance Jio चा २३९ रुपयांचा प्रीपेड प्लान: Reliance Jio च्या या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस, जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. या प्लानची वैधता २८ दिवस आहे.

वाचाः स्वस्तात मिळतायत रिमोटने कंट्रोल होणारे ‘हे’ पंखे, घर अगदी मिनिटात होईल थंड; किंमत फक्त…

​Reliance Jio चे इतर प्लान्स

reliance-jio-

Reliance Jio चा २०९ रुपयांचा प्रीपेड प्लान: Reliance Jio च्या या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानची वैधता २८ दिवस आहे. यात JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

Reliance Jio चा १९९ रुपयांचा प्रीपेड प्लान: कंपनीच्या या प्लानची वैधता २३ दिवस आहे. यामध्ये दररोज १.५ जीबी डेटा, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएस आणि JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

वाचाः १० हजारांच्या बजेटमध्ये येतोय दमदार ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोन, लाँचआधी समोर आले फीचर्स; पाहा डिटेल्स

​Vodafone Idea चा २३९ रुपयांचा प्रीपेड प्लान

vodafone-idea-

टेलिकॉम कंपनी Vodafone Idea कडे २३९ रुपये किंमतीचा शानदार प्रीपेड प्लान उपलब्ध आहे. या प्लानची वैधता २४ दिवस असून, यात दररोज १ जीबी डेटाचा फायदा मिळतो. अशाप्रकारे, प्लानच्या संपूर्ण कालावधीसाठी एकूण २४ जीबी डेटाचा फायदा मिळेल. याशिवाय, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. तसेच, दररोज १०० मोफत एसएमएस मिळतील. Vodafone Idea च्या या प्लानमध्ये अतिरिक्त बेनिफिट्सचा फायदा मिळत नाही.

वाचाः ‘या’ तारखेला भारतात एंट्री करणार Samsung चा स्वस्तात मस्त स्मार्टफोन, १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह मिळेल बरचं काही

​Vodafone Idea चा २९९ रुपयांचा प्रीपेड प्लान

vodafone-idea-

खासगी टेलिकॉम कंपनी Vodafone Idea कडे २९९ रुपयांचा देखील शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानची वैधता २८ दिवस आहे. या प्लानमध्ये अतिरिक्त बेनिफिट्सचा देखील फायदा मिळतो. यामध्ये यूजर्सला बिंज ऑल नाइट, वीकेंड डेटा रोलओव्हरचा फायदा मिळेल. तसेच, Vi Movies चा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो.

वाचाः Xiaomi च्या पॉवरफुल स्मार्टफोनवर मोठी सूट, ३० हजारांचा हँडसेट फक्त १० हजारात होईल तुमचा; पाहा ऑफर

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here