वाढत्या तापमानाने नागरिकांना अक्षरशः हैराण केले आहे. देशातील अनेक राज्यात पारा चांगला वाढला असून लोकं देखील या भयानक गर्मीपासून सुटका मिळावी यासाठी नव-नवीन Cooling Gadgets खरेदी करत आहे. देशातील कित्येक भागात तर तापमान ४०-४३ अंशांवर पोहोचले आहे. अशा परिस्थितीत बाजारात एअर कंडिशनर (एसी) आणि कुलरची मागणी वाढली आहे. तुमच्यापैकी अनेक जण असे असतील जे एअर कंडिशनर घेण्याचा विचार करत असतील. पण, जर तुम्ही AC घेणार असाल तर, तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुम्हाला नंतर समस्या येऊ शकतात. शिवाय, AC च्या किमती इतर कुलिंग डिव्हाइसेसपेक्षा अधिकअसल्यामुळे एसी खरेदी करतांना हलगर्जीपणा केल्यास तुमचे पैसे देखील व्यर्थ जाऊ शकतात. काही सोप्प्या टिप्स फॉलो करून तुम्ही एक चांगला AC घरी आणू शकता आणि या रणरणत्या उन्हात गारवा मिळवू शकता

AC चा आकार

ac-

खोलीच्या आकारानुसार एसीचा आकार निवडणे अवघड असू शकते: जर आपण मोठ्या आकाराचा एसी घेत असाल तर ते खोलीला लवकर थंड करतो. परंतु, यात विजेचा वापर देखील जास्त होतो. तर, एक छोटा एसी खोलीला हळू-हळू थंड करतो आणि जास्त वीज वापरतो. एसीची क्षमता खोलीच्या आकारावर अवलंबून असते. भारतात, AC चे वजन टन आकाराने केले जाते. आजकाल पोर्टेबल ऐसीचा वापर देखील वाढत असून हे एसी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कॅरी करायला सोप्पे असतात. तुम्ही खरेदी करण्यापूर्वी हे एसी देखील पाहू शकता.

वाचा : Jio, Airtel आणि Vi चा ४९९ रुपयांचा प्लान आहे खास, IPL फॅन्सना मिळतो फायदा, पाहा डिटेल्स

​नॉन AC फीचर्स

-ac-

नॉन एसी फीचर्स: आजकाल असे एसीही बाजारात विकले जात आहेत. जे, खोलीला थंडावा देण्याबरोबरच खोलीची हवाही स्वच्छ करतात. याशिवाय, कीटकांना पळवून लावणारे एसीही बाजारात उपलब्ध आहेत. अँटी-बॅक्टेरिया फिल्टरपासून ते Auto Cleaning एसीसाठी सर्वोत्कृष्ट Features मानली जातात. म्हणूनच असा AC निवडावा. जो आपल्याला उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात हिट फीचर प्रदान करेल. बरेच एसी डिहूमिडिफायरसह येतात. एसीमध्ये स्लीप मोड देखील असावा ज्यामुळे दर तासाला कूलिंग कमी करून वीज बिल वाचविता येईल. एसी खरेदी करतांना हे फीचर्स आहेत की नाही हे नक्की तपासा.

वाचा : मस्तच ! Vivo च्या ‘या’ २ शानदार स्मार्टफोन्सच्या किमतीत कपात ,फोन्स स्वस्तात येतील घरी, पाहा फीचर्स

​मोठ्या खोल्यांसाठी AC

-ac

मोठ्या खोल्यांसाठी एसी: एसी खरेदी करताना आवर्जून लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे खोलीचा आकार जर तुम्हाला मोठ्या खोलीसाठी किंवा हॉलसाठी एसी घ्यायचा असेल तर तुम्ही फ्लोअर स्टँडिंग एसीची निवड करू शकता. तुम्हाला ते एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यात कोणतीही अडचण येणार नाही. तसेच कुलिंग देखील छान मिळते. एसीचे बजेटही महत्वाचे आहे. सहसा १ टन एसीची किंमत २५,००० रुपयांपासून ते ३५,००० रुपयांपर्यंत आहे. १.५ टन एसीची किंमत ३०,००० ते ४५,००० रुपयांपर्यंत आहे. तर, २ टनचा एसी खरेदी करण्यासाठी तुम्हाला ४०,००० ते ५२,००० रुपये मोजावे लागतील.

वाचा: स्वस्त पण सुपर-फास्ट ब्रॉडबँड प्लान्स ! ३३०० GB डेटासह १०० Mbps स्पीड, किंमत पाहून तुम्हीही म्हणाल बेस्टच

​विंडो आणि स्प्लिट एसी

विंडो आणि स्प्लिट एसी: विंडो आणि Split AC हे शब्द हमखास युजर्सकडून ऐकायला मिळतात. तुम्ही जर नवीन एसी खरेदी करणार असाल तर विंडो आणि Split AC पैकी नेमका चांगला कोणता हे जाणून घेणे देखील आवश्यक आहे. तसे पाहिल्यास विंडो एसी सर्वोत्तम आहे, कारण ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात कोणतीही अडचण येत नाही. परंतु, सॅमसंगसारख्या मोठ्या कंपन्यांनी आता विंडो एसी बनवणे बंद केले आहे. स्प्लिट एसी देखील चांगले असतात. त्यामुळे तुम्ही स्प्लिट एसी खरेदी करू शकता.

वाचा: यूजर्सना झटका ! Amazon Prime Video च्या सब्सक्रिप्शनमध्ये ‘या’ कंपनीने केली कपात, ‘इतकेच’ दिवस मिळणार फ्री सर्व्हिस

५ स्टार रेटिंग

5 स्टार रेटिंग आहे की नाही हे नक्की पाहा : एसी हे असे कुलिंग डिव्हाइस आहे. जे इतर गॅझेट्सपेक्षा महाग असते. एसी खरेदी करतांना युजर्सना चांगलेच पैसे खरेदी करावे लागतात. म्हणून खरेदीच्या वेळी योग्य ती काळजी घेतली तर नंतर नुकसान होत नाही. किंवा तुम्ही खर्च केलेले पैसे देखील वाया जात नाही. म्हणून AC खरेदी करताना ५ स्टार रेटिंगची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. तुम्ही जितका जास्त रेट असलेला एसी खरेदी कराल तितकी जास्त विजेची बचत होईल आणि तुमच्या खिशावर त्याचा परिणाम होणार नाही.

वाचा: नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर न विसरता करा ‘हे’ काम, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान, पाहा टिप्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here