Redmi 10A Launched today : सर्वसामान्यांना परवडणारा Xiaomi चा Redmi 10A आज भारतात लॉन्च झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला हा स्मा्टफोन अखेल लॉन्च झाला आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर त्यांनी स्मार्टपोनचे सर्व डिटेल्स दिले आहेत. या Redmi 10A स्मार्टफोनला कंपनीने ‘देशाचा स्मार्टफोन’ म्हटले आहे. Redmi 10A मॉडेल आधीच चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता. त्यामुळे आतापर्यंत या स्मार्टफोनची अंदाजे किंमत लावण्यात येत होती. मात्र, हा स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर याची स्टार्टिंग रेंज काय आहे. यामध्ये आधीच्या तुलनेत कोणते वेगळे फीचर्स आहेत याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Xiaomi Redmi 10A चे फीचर्स : 

बेस मॉडेलच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजच्या चायनीज व्हेरिएंटची किंमत CNY 600 आहे जी अंदाजे 8,300 रुपये आहे. मात्र, भारतात याची किंमत केवळ 9,499 रूपयांपासून सुरु होते. हा स्मार्टफोन ब्ल्यू आणि ब्लॅक अशा दोन कलरमध्ये उपलब्ध आहे. 

यात 60Hz रिफ्रेश रेटसह वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच आणि 5-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरासह 6.53-इंचाचा 720p IPS LCD डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G25 चिप सह 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. Redmi किमान 64GB इंटर्नल स्टोरेजसह 4GB व्हेरियंट देऊ शकते. MIUI 12.5 सह Android 11 चालवू शकतो. Redmi 10A च्या भारतीय व्हर्जनमध्ये आवश्यक असल्यास व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने समान MediaTek Helio प्रोसेसर आहे. 

रेडमी 10A मध्ये 6.5-इंचाचा HD डिस्प्ले मिळू शकतो हे टीझर इमेजमधून समोर आले आहे. याची पुष्टी झाली आहे की यात एर्गोनॉमिक ग्रिपसह इव्हॉल डिझाइन आहे. कॅमेरा म्हणून, Redmi 10A मधील टीझरनुसार, यामध्ये एक उत्तम कॅमेरा दिला आहे. 

फोटो पाहिल्यास, ड्युअल लेन्ससह एक AI लेन्स आणि फ्लॅश दिसू शकतो. कंपनीने याबद्दल सांगितले असले तरी या स्मार्टफोनमध्ये अनेक प्रकारचे फोटोग्राफी मोड उपलब्ध आहे. हा आगामी फोन एर्गोनॉमिक ग्रिपसह उत्कृष्ट डिझाइनमध्ये बाजारात उपलब्ध आहे. पॉवरसाठी,  स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी दिली जाऊ शकते, जी 10W मायक्रो-USB चार्जिंगसह दोन दिवसांचा बॅकअप देईल. 

महत्वाच्या बातम्या : 

technology

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here