आजकाल टेलिकॉम कंपन्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत स्वस्तात अधिक फायदे देणारे अनेक प्लान्स सादर करत असतात. vodafone ide, Relaince jio , BSNl , Airtel देखील युजर्सना भन्नाट प्लान्स ऑफर करतात. विशेष म्हणजे यातील देशातील दोन सर्वात मोठे दूरसंचार ऑपरेटर Airtel, Reliance Jio त्यांच्या ग्राहकांना प्रीपेड प्लान्सची एक लांबलचक यादीच देतात. हे प्लान्स किंमतीनुसार डेटा, कॉल आणि इतर फायदे देतात. आज आम्ही Airtel आणि Jio च्या स्वस्त आणि सर्वाधिक विकल्या जाणार्‍या प्लान्सबद्दल सांगत आहोत. जे कमी किमतीत बरेच फायदे देतात. या यादीतील सर्वात स्वस्त प्लान ११९ रुपयांचा आहे आणि सर्वात महाग प्लान ३०० रुपयांपेक्षा कमी आहे. या कंपन्यांच्या सर्वोत्कृष्ट प्लान्सपैकी कोणत्या कंपनीचा प्लान तुमच्या कामाचा आहे ते जाणून घ्या आणि प्लान खरेदी करण्यापूर्वी त्यातील बेनिफिट्स आणि किंमत देखील पाहा.

विविध फायद्यांसह येणारे प्लान्स

कंपनी ग्राहकांना अनेक विविध फायद्यांसह येणारे काही भन्नाट प्लान्स ऑफर करते. ज्यांचा युजर्सना लाभ घेता येतो. याशिवाय, Jio काही प्रीपेड प्लान्स ऑफर करते. २ GB/ Day ज्यांची किंमत अनुक्रमे २३ -दिवस आणि २८ -दिवसांच्या वैधतेसह २४९ आणि २९९ रुपये आहे. Jio 296 रुपये किंमतीचा प्रीपेड प्लॅन ऑफर करते. जो Airtel सारखाच आहे. जो २५ GB डेटा ऑफर करतो. परंतु, १ महिन्याच्या वैधतेसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि १०० SMS / दिवस ऑफर करतो. तुम्ही Jio युजर असाल तर हे प्लान्स वापरून मोठी बचत करू शकता.

वाचा: फोन हरविल्यास किंवा चोरी गेल्यास घाबरुन न जाता फॉलो करा ‘ही’ सोप्पी ट्रिक, सहज करता येईल फोन ट्रॅक

​जिओचा सर्वात स्वस्त प्लान

जिओचा सर्वात स्वस्त प्लान: एअरटेलच्या तुलनेत जिओ २९९ रुपयांच्या खाली अनेक प्लान्स ऑफर करते. Jio कडे १४९ रुपयांचा प्लान आहे. कंपनीकडे १७९ रुपये आणि २०९ रुपये किंमतीचे तीन १ GB / दिवस दैनिक डेटा प्रीपेड प्लान आहेत. जे अनुक्रमे २० – दिवस, २४-दिवस आणि २८ -दिवसांच्या वैधतेसह येतात. Jio देखील चार १.५ GB दैनिक डेटा प्रीपेड प्लान्स ऑफर करते. ज्यांची किंमत ११९ रुपये, १९९ रुपये, २३९ रुपये आणि २५९ रुपये आहे आणि अनुक्रमे १४-दिवस, २३-दिवस, २८-दिवस आणि १-महिना वैधता आहे.

वाचा: फक्त २५४ रुपये देऊन घरी आणा ‘ हे’ ब्रँडेड Air Coolers, डिव्हाइसेस आकाराने कॉम्पॅक्ट पण कूलिंगमध्ये जबरदस्त, पाहा डिटेल्स

​लिस्टमध्ये २६५ रुपयांच्या प्लान

लिस्टमध्ये २६५ रुपयांच्या प्लान: तसेच या लिस्टमध्ये २६५ रुपयांच्या प्लानचा समावेश आहे. जो, २८ दिवसांच्या वैधतेसाठी १ GB/ दिवस ऑफर करतो. याशिवाय, एअरटेल २९९ रुपयांच्या किमतीत २८ दिवसांसाठी प्रतिदिन १.५ GB डेटा ऑफर करते. टेलको २९६ रुपयांचा प्रीपेड प्लान देखील ऑफर करतो. जो २८ दिवसांच्या वैधतेसाठी २५ GB डेटा ऑफर करतो. हे सर्व प्लान्स मोफत व्हॉइस कॉल आणि १०० SMS/ दिवस तसेच Amazon Prime Video च्या मोबाइल आवृत्तीच्या सबस्क्रिप्शनसह येतात, जे फक्त वैध आहे. बजेट युजर्ससाठी हे प्लान्स बेस्ट ठरू शकतात.

वाचा : Realme ते Samsung ‘या’ भन्नाट स्मार्टफोन्सची किंमत १०,००० पेक्षा कमी, गिफ्ट देण्यासाठी बेस्ट पर्याय, पाहा लिस्ट

Airtel चे परवडणारे प्लान्स

airtel-

एअरटेलचे सर्वात परवडणारे प्लान्स : एअरटेलचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान १५५ रुपयांच्या किंमतीचा आहे. जो युजर्सना २४ दिवसांसाठी १ GB डेटा ऑफर करतो. त्याचप्रमाणे, कंपनी १७९ रुपयांचा प्रीपेड प्लान देखील ऑफर करते. जो २८ दिवसांच्या वैधतेसाठी २ GB डेटा देते. एयरटेलकडे १ GB / दिवस डेटासह काही भन्नाट प्लान्स देखील आहेत. एअरटेल २०९ रुपयांच्या किमतीत प्रीपेड प्लान ऑफर करते. जो २१ दिवसांच्या वैधतेसाठी प्रतिदिन १ GB डेटा देतो. पुढील पॅक २३९ रुपयांचा प्लान आहे जो २४ दिवसांच्या एकूण वैधतेसाठी दररोज १ GB डेटा ऑफर करतो.

वाचा: घरी अर्जेंट कॉल करायचाय पण, वेळेवर नेटवर्कने धोका दिला ? ही सोप्पी ट्रिक वापरून नेटवर्क नसतांनाही करता येईल कॉल

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

1 COMMENT

  1. Of course, your article is good enough, baccarat online but I thought it would be much better to see professional photos and videos together. There are articles and photos on these topics on my homepage, so please visit and share your opinions.
    b

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here