भारतात स्मार्टफोनची मागणी गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, असे असले तरीही फीचर फोन वापरणाऱ्यांची संख्याही कमी नाही. भारतातील ग्रामीण भागात प्रामुख्याने फीचर फोनचा वापर केला जातो. तसेच, अनेकजण स्मार्टफोनसोबतच आणखी एक फोन म्हणून फीचर फोनचा वापर करतात. तुम्ही देखील फीचर फोन (Feature Phones) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्हाला तुम्हाला ५ असे पर्याय सुचवत आहोत, ज्यांची किंमत खूपच कमी आहे. नोकियापासून ते सॅमसंग ब्रँडचे शानदार फीचर बाजारात उपलब्ध आहेत. यांची सुरुवाती किंमत फक्त ७९२ रुपये आहे. विशेष म्हणजे हे फोन दमदार बॅटरीसह येतात. सिंगल चार्जमध्ये या फीचर फोन्सची बॅटरी अनेक दिवस टिकते. कमी किंमतीत तुम्ही ड्यूल सिम, रेडिओ, कॅमेरा अशा फीचरसह येणारे फोन्स खरेदी करू शकता.

​I Kall K3310

i-kall-k3310

I Kall K3310 या फोनची किंमत फक्त ७२९ रुपये आहे. ड्यूल सिम सपोर्टसह येणाऱ्या या फोनमध्ये अनेक फीचर्स मिळतील. यामध्ये कॅमेरा, रेडिओ, ब्लूटूथ, म्यूझिक प्लेअर, टॉर्चची सुविधा मिळेल. I Kall K3310 फीचर फोनमध्ये ४.५७ इंचाचा शानदार डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १२८x१६० पिक्सल आहे. यात ३२ एमबी रॅम आणि ६४ एमबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे. तसेच, १००० एमएएचची बॅटरी दिली असून, जी स्टँडबायवर ५ दिवस टिकते.

वाचा – मस्तच! चक्क निम्म्या किंमतीत मिळतोय ‘हा’ शानदार एसी, मिनिटात खोली करेल थंड; पाहा ऑफर्स

​Nokia 110 Dual SIM

nokia-110-dual-sim

Nokia 110 Dual SIM स्मार्टफोनला तुम्ही ई-कॉमर्स साइट Amazon वरून स्वस्तात खरेदी करू शकता. Amazon वर हा फोन १,६९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. यामध्ये ड्यूल सिम सपोर्ट दिला आहे. हा नोकिया सीरिज ३०+ वर काम करतो. या फीचर फोनमध्ये १.७७ इंच डिस्प्ले दिला असून, यात रियर कॅमेरा, रेडिओ आणि म्यूझिक प्लेअरची सुविधा मिळते. फोनच्या स्टोरेजला ३२ जीबीपर्यंत वाढवू शकता. यात ८०० एमएएचची बॅटरी दिली आहे.

वाचा: Samsung चा धमाका! भारतात लाँच झाला स्वस्तात मस्त ५जी स्मार्टफोन, किंमत एवढी कमी की विश्वास बसणार नाही

​SAMSUNG Guru Music 2 SM-B315

samsung-guru-music-2-sm-b315

SAMSUNG Guru Music 2 SM-B315 फीचर फोन ड्यूल सिम सपोर्टसह येतो. यामध्ये २ इंच टीएफटी डिस्प्ले दिला आहे. हा फोन Amazon वर २०६० रुपये किंमतीत उपलब्ध आहे. यामध्ये रेडिओ आणि म्यूझिक प्लेअर सारखे फीचर्स दिले आहेत. या फीचर फोनमध्ये कॅमेरा आणि ब्लूटूथची सुविधा मात्र मिळत नाही. याच्या स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १६ जीबीपर्यंत वाढवू शकता. फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी ८०० एमएएचची बॅटरी दिली आहे.

वाचा: फोनच्या चार्जरमध्ये लपलेला आहे Spy कॅमेरा, करता येईल कोणाचीही गुपचूप हेरगिरी; किंमतही कमी

​Motorola a10

motorola-a10

Motorola a10 हा फीचर फोन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल. फोनमध्ये ३२ जीबी स्टोरेज मिळते. या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे हा मीडियाटेक प्रोसेसरवर चालतो. यामध्ये पॉवर बॅकअपसाठी १७५० mAh ची दमदार बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, याची साउंड क्वालिटी जबरदस्त आहे. यात वायरलेस रेडिओ रेकॉर्डिंगची सुविधा दिली मिळते. फोनमध्ये सहा भारतीय भाषेत टायपिंग करता येईल. हा फीचर फोन Amazon वर १३४९ रुपयात उपलब्ध आहे.

वाचा: ५०००mAh बॅटरी आणि ५०MP कॅमेऱ्यासह Realme चा प्रीमियम स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

​Lava GEM

lava-gem

Lava GEM फीचर फोन गोल्ड आणि ब्लॅक अशा दोन कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये २.८ इंच क्यूव्हीजीए डिस्प्ले दिला आहे. यात १.३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. फोन ड्यूल सिम सपोर्टसह येतो. यामध्ये म्यूझिक प्लेअर, व्हिडिओ प्लेअर, एफएम रेडिओ सारखे फीचर्स दिले आहेत. तर पॉवर बॅकअपसाठी १७५० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोनच्या स्टोरेजला ३२ जीबीपर्यंत वाढवू शकता. फोन १६४९ रुपयात उपलब्ध आहे.

वाचा: महागडे फोन्स स्वस्तात! Xiaomi ते Samsung… Flipkart Sale मध्ये या हँडसेट्सवर बंपर डिस्काउंटचा फायदा, पाहा डिटेल्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here