भारतीय बाजारात गेल्या काही दिवसात स्मार्ट टीव्हीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोक घरातील जुना डब्बा टीव्ही बदलून त्याऐवजी स्मार्ट अँड्राइड टीव्ही खरेदी करत आहेत. सध्या बाजारात अगदी १० हजारांच्या बजेटमध्ये येणारे शानदार स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत. स्मार्ट टीव्हीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही सहज मोबाइल कनेक्ट करून मोठ्या स्क्रीनवर कंटेंटचा आनंद घेऊ शकता. याशिवाय इंटरनेट कनेक्ट करून देखील तुम्हाला वेगवेगळ्या स्ट्रिमिंग सर्विसचा आनंद घेता येईल. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर (Flipkart) अनेक चांगल्या कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही स्वस्तात उपलब्ध आहे. Flipkart वर रियलमी, क्रोमा, वू, वनप्लस आणि सॅमसंगचे ३२ इंच स्मार्ट टीव्ही बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. या टीव्हीवर बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. स्मार्ट टीव्हीवर मिळणाऱ्या या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​रियलमी एचडी रेडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही

रियलमी एचडी रेडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीला फ्लिपकार्टवरून स्वस्तात खरेदी करू शकता. रियलमीच्या ३२ इंच स्मार्ट टीव्हीची किंमत १७,९९९ रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवर फक्त १५,९९९ रुपयात उपलब्ध आहे. या टीव्हीवर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळेल. जुना टीव्ही एक्सचेंज केल्यास ११ हजार रुपयांपर्यंत फायदा मिळेल. ही ऑफर जुन्या टीव्हीच्या मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. तसेच, फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर ८०० रुपये कॅशबॅकचा फायदा मिळेल. अशाप्रकारे टीव्हीला फक्त ४,१९९ रुपयात खरेदी करता येईल.

वाचा –Realme च्या ‘या’ शानदार एसीची तुफान विक्री, दरमहिना फक्त १,३४८ रुपये देऊन खरेदीची संधी; सेलचा आज शेवटचा दिवस

​क्रोमा एचडी रेडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही

क्रोमा एचडी रेडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही खूपच कमी किंमतीत फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. क्रोमाच्या या टीव्हीची मूळ किंमत २५ हजार रुपये आहे. मात्र, फ्लिपकार्टवर ४८ टक्के डिस्काउंटनंतर फक्त १२,९९० रुपयात खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास ५ टक्के कॅशबॅकचा फायदा मिळेल. अशाप्रकारे टीव्हीला फक्त १२,३४० रुपयात खरेदी करता येईल. क्रोमाच्या या ३२ इंच स्मार्ट टीव्हीमध्ये अनेक आकर्षक फीचर्स दिले आहेत.

वाचा: अलर्ट: SBI ने लाखो ग्राहकांना केले सावध, ‘या’ नंबर्सवरून कॉल आल्यास करू नका रिसिव्ह

​वू प्रीमियम एचडी रेडी एलईडी स्मार्ट टीव्ही

वू प्रीमियम एचडी रेडी एलईडी स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत जवळपास २० हजार रुपये आहे. मात्र, फ्लिपकार्टवरून या टीव्हीला तुही डिस्काउंटनंतर फक्त १२,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या टीव्हीवर ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळत आहे. ही ऑफर जुन्या टीव्हीच्या मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. याशिवाय, फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास ६५० रुपयांची अतिरिक्त बचत होईल. सर्व ऑफर्सचा फायदा मिळाल्यास या टीव्हीला १,३४९ रुपयात खरेदी करता येईल.

वाचा: OnePlus च्या मोठ्या स्क्रीनसह येणाऱ्या टीव्हीला स्वस्तात खरेदीची संधी, फीचर्स एकापेक्षा एक जबरदस्त; पाहा डिटेल्स

​वनप्लस Y1S एचडी रेडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही

-y1s-

वनप्लसच्या शानदार ३२ इंच एचडी रेडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीची फ्लिपकार्टवर १६,४९९ रुपये किंमतीत विक्री होत आहे. या टीव्हीची मूळ किंमत २१,९९९ रुपये आहे. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास यावर ८२५ रुपये डिस्काउंट मिळेल. अशाप्रकारे या टीव्हीला तुम्ही अजून स्वस्तात खरेदी करू शकता. या टीव्हीमध्ये Netflix, Prime Video, Disney+Hotstar, Youtube सारखे अ‍ॅप्स दिले आहेत. यात गुगल असिस्टेंट आणि क्रोमकास्ट इन-बिल्टचा सपोर्ट मिळतो.

वाचा: ‘या’ शानदार स्मार्ट टीव्हीला खरेदीसाठी ग्राहकांचा तुफान प्रतिसाद, किंमत फक्त ८,९९९ रुपये; फीचर्स जबरदस्त

​सॅमसंग एचडी रेडी एलईडी स्मार्ट टीव्ही

तुम्ही जर कमी किंमतीत येणारा ब्रँडेड स्मार्ट टीव्ही शोधत असाल तर सॅमसंगचा हा टीव्ही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. सॅमसंगच्या ३२ इंच स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत २२,९०० रुपये आहे. परंतु, २३ टक्के डिस्काउंटनंतर १७,४९९ रुपयात खरेदी करता येईल. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास ८७५ रुपये डिस्काउंट मिळेल. तसेच, यावर ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. दोन्ही ऑफर्सचा पूर्ण फायदा मिळाल्यास हा टीव्ही फक्त ५,६२४ रुपयात तुमचा होईल.

वाचा: अवघ्या १९ रुपयांचा शानदार रिचार्ज प्लान, मिळेल हाय-स्पीड डेटाचा फायदा; पाहा डिटेल्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here