सध्या अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. स्मार्टफोनचा वापर प्रचंड वाढला आहे. अगदी मित्र-मैत्रिणींशी संवाद करण्यापासून ते शॉपिंग करण्यासाठी सर्वच ठिकाणी फोन गरजेचा झाला आहे. फोनचा वापर दिवसभर होत असल्याने यात मिळणारी बॅटरी देखील पॉवरफुल असणे गरजेचे आहे. अगदी काही तासांसाठी देखील फोन चार्जिंगला लावल्यास अनेक कामे करणे शक्य होत नाही. त्यामुळे दमदार बॅटरीसह येणारे फोन खरेदी करणे गरजेचे आहे. बाजारात ५००० एमएएच, ६००० एमएएच बॅटरी सारखे येणारे अनेक चांगले फोन्स उपलब्ध आहेत. या फोन्सला एकदा चार्ज केल्यावर नियमित वापरासह याची बॅटरी एक-दीड दिवस सहज टिकते. बाजारात ६००० एमएएच बॅटरीसह येणारे Samsung Galaxy M33 5G, Redmi 10, moto g40 fusion सारखे चांगले फोन्स उपलब्ध आहेत. या फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Samsung Galaxy M33 5G

samsung-galaxy-m33-5g

Samsung Galaxy M33 5G मध्ये २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. एकदा चार्ज केल्यावर तुम्ही फोनला अनेक तास सहज वापरू शकता. हा फोन काही दिवसांपूर्वीच भारतात लाँच झाला आहे. फोनमध्ये ६.६ इंच फुल एचडी+ इनफिनिटी वी डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. यात क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. ५० मेगापिक्सल मुख्य कॅमेऱ्यासह येणाऱ्या या फोनची सुरुवाती किंमत १८,९९९ रुपये आहे.

वाचा – १० हजारांच्या बजेटमध्ये येणाऱ्या ‘या’ भन्नाट स्मार्टफोनची आजपासून विक्री सुरू, पहिल्या सेलमध्ये स्वस्तात करा खरेदी

​Redmi 10

redmi-10

Redmi 10 स्मार्टफोन देखील दमदार फीचर्ससह येतो. यामध्ये १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ६.७ इंच HD+LCD डिस्प्ले दिला आहे. यामध्ये रियर पॅनेलवर ड्यूल कॅमेरा सेटअप मिळतो. यात ५० मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सल पोर्ट्रेट सेंसर दिला आहे. भारतात या स्मार्टफोनची सुरुवाती किंमत १०,९९९ रुपये आहे. फोनला भारतीय बाजारात मार्च महिन्यात लाँच करण्यात आले होते.

वाचा: धुमाकूळ घालायला आला Moto चा ‘हा’ भन्नाट स्मार्टफोन, १५ हजारांच्या बजेटमध्ये भारतात लाँच; पाहा फीचर्स

​Moto g40 fusion

moto-g40-fusion

मोटो जी४० फ्यूजन स्मार्टफोनमध्ये ६००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. ही बॅटरी २० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. यामध्ये ६.८ इंच फुल एचडी+ डिस्प्ले दिला आहे, जो एचडीआर१० सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. या फोनला तुम्ही ई-कॉमर्स साइट Amazon वरून स्वस्तात खरेदी करू शकता. Moto g40 fusion स्मार्टफोन १४,४९९ रुपये सुरुवाती किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे.

वाचा: फक्त ११ हजारांच्या बजेटमध्ये Realme च्या स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, फीचर्स एकापेक्षा एक जबरदस्त

​Nokia C30

nokia-c30

Nokia C30 स्मार्टफोनमध्ये ३ जीबी रॅम + ३२ जीबी स्टोरेज दिले आहे. या स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९,९९९ रुपये आहे. तुम्ही फोनला ई-कॉमर्स साइट Amazon वरून खरेदी करू शकता. फोनमध्ये ६००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे, जी सिंगल चार्जमध्ये ३ दिवस टिकते. फोनमध्ये ६.८२ इंच एचडी+ डिस्प्ले दिला आहे. तर फोटोग्राफीसाठी रियरला एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा मिळतो. फ्रंटला ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

वाचा: स्मार्टफोनच्या एका क्लिकवर मिळेल स्वस्त पेट्रोल-डिझेलची माहिती; ‘हे’ अ‍ॅप्स येतील खूपच उपयोगी

​realme narzo 50A

realme-narzo-50a

realme narzo 50A स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२,४९९ रुपये आहे. फोनमध्ये ६००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. तसेच, MediaTek Helio G८५ Octa-core प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. फोनच्या स्टोरेजला २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता. यात ६.५ इंच एचडी+ डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी रियरला ५० मेगापिक्सल + २ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल आणि फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

वाचा: धमाकेदार ऑफर! चक्क रिचार्जच्या किंमतीत मिळतोय दमदार Realme 9i स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here