देशातील प्रमुख खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडियाकडे यूजर्ससाठी अनेक शानदार प्लान्स उपलब्ध आहेत. मात्र, या कंपनीच्या प्लान्सची किंमत थोडी जास्त आहे. त्यामुळे ग्राहक सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलला प्राधान्य देतात. BSNL कडे इतर कंपन्यांच्या तुलनेत अनेक स्वस्त प्लान्स उपलब्ध आहे. कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेळोवेळी शानदार ऑफर्स देखील आणत असते. कंपनीकडे २८ दिवसांच्या वैधतेसह येणारे काही शानदार प्लान्स देखील उपलब्ध आहेत. या प्लान्सच्या किंमती कमी असल्या तरीही यात बेनिफिट्स जास्त मिळतात. यूजर्सला या प्लानमध्ये डेटा, कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते. कंपनीकडे १५३ रुपये, १८७ रुपये आणि १५१ रुपये किंमतीचे महिन्याभराच्या वैधतेसह येणारे शानदार प्लान्स उपलब्ध आहेत. BSNL च्या या स्वस्तात मस्त प्लान्समध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​बीएसएनलचा १५३ रुपयांचा रिचार्ज प्लान

बीएसएनएलकडे १५३ रुपये किंमतीचा शानदार रिचार्ज प्लान उपलब्ध आहे. या प्लानची वैधता २८ दिवस आहे. यामध्ये यूजर्सला २८ दिवसांसाठी देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच, दररोज १०० मोफत एसएमएस देखील मिळतात. याशिवाय, या प्रीपेड प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा दिला जात आहे. अशाप्रकारे संपूर्ण कालावधीसाठी एकूण २८ जीबी डेटा मिळेल. डेली डेटा लिमिट समाप्त झाल्यानंतर तुम्ही ४० kbps स्पीडने इंटरनेट वापरू शकता.

वाचा: धुमाकूळ घालायला आला ‘या’ कंपनीचा शानदार स्मार्टफोन, किंमत फक्त ७.५ रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती

​बीएसएनएलचा १८७ रुपयांचा रिचार्ज प्लान

बीएसएनएलकडे २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारा आणखी एक प्लान उपलब्ध आहे. १८७ रुपयांच्या या प्रीपेड प्लानची वैधता २८ दिवस आहे. तुम्ही जर दररोज जास्त डेटा वापरत असाल तर हा प्लान तुमच्या फायद्याचा ठरेल. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा अशाप्रकारे एकूण ५६ जीबी डेटाचा फायदा मिळते. डेली डेटा लिमिट समाप्त झाल्यानंतर तुम्ही ४० केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता. याशिवाय, देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची देखील सुविधा मिळते.

वाचा: सिम कार्डचा एक कोपरा कट केलेला का असतो? जाणून घ्या

​बीएसएनएलचा १५१ रुपयांचा रिचार्ज प्लान

हा या लिस्टमधील तिसरा व सर्वात स्वस्त प्लान आहे. BSNL च्या १५१ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवस आहे. या प्लानमध्ये तुम्हाला एकूण ४० जीबी डेटाचा फायदा मिळतो. या प्लानमध्ये अतिरिक्त बेनिफिट्स देखील मिळतील. यूजर्सला झिंग सबस्क्रिप्शन दिले जात आहे. दरम्यान, कंपनीकडे १५१ रुपये आणि १५३ रुपये किंमतीचे दोन प्रीपेड प्लान्स उपलब्ध आहे. या प्लान्सच्या किंमतीत फक्त २ रुपयांचा फरक आहे, मात्र बेनिफिट्स वेगवेगळे मिळतात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार यातील प्लान निवडू शकता.

वाचा: खास विद्यार्थ्यांसाठी लाँच झाली ‘ही’ दमदार लॅपटॉप सीरिज, किंमत २५ हजार रुपयांपेक्षा कमी, पाहा डिटेल्स

​इतर कंपन्यांचे २८ दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लान्स

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे २८ दिवसांच्या वैधतेसह येणारा २०९ रुपयांचा प्लान आहे. या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग दररोज १०० मोफत एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. एअरटेलकडे देखील १७९ रुपयांचा २८ दिवसांच्या वैधतेसह येणारा प्लान आहे. या प्लानमध्ये एकूण २ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, एकूण ३०० एसएमएस आणि प्राइम व्हिडिओ, फ्री हॅलोट्यून्स, विंक म्यूझिकचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. तसेच, वीआयच्या २८ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लानची किंमत देखील १७९ रुपये असून, यात देखील एकूण २ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, एकूण ३०० एसएमएसची सुविधा मिळते.

वाचा: Oppo चा ‘हा’ बेस्टसेलर स्मार्टफोन हजार रुपयांनी झाला स्वस्त, खूपच कमी किंमतीत खरेदीची संधी; फीचर्स जबरदस्त

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here