नवी दिल्लीः करोना व्हायरसच्या फेक बातम्या सोशल मीडियावर रोखण्यासाठी सरकारकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. खोट्या बातम्या रोखण्यासाठी व्हॉट्सअॅपनेही मेसेज फॉरवर्डेडची संख्या पाचवरून एकवर आणली आहे. परंतु, लोकांना याचा काहीही फरक पडला नाही. सोशल मीडियावर अद्यापही फेकिंग बातम्या शेअर करणे सुरूच आहे. त्यामुळे फेसबुकने सॉफ्टवेअर कंपनी चालवणाऱ्या एका भारतीयावर करोना व्हायरसची खोटी बातमी शेअर केल्याने चुकीची माहिती पसरवल्याप्रकरणी थेट कॅलिफोर्नियाच्या कोर्टात गुन्हा दाखल केला आहे.

वाचाः

फेसबुक कंपनीने या फेक जाहिरातीची समिक्षा केल्यानंतर त्यात चुकीची माहिती आढळल्याने ही कारवाई केली आहे. बसंत गज्जर यांची कंपनी लीडक्लोकने करोना व्हायरस, क्रिप्टोकरन्सी, वजन कमी करण्यासंबंधीचे औषध इत्यादीच्या संबंधी खोटी माहिती आणि चुकीची जाहिरात केल्याप्रकरणी तसेच जाहिरातीतून लोकांची दिशाभूल केल्याप्रकरणी अॅड-क्लोकिंग सॉफ्टवेअर उपलब्ध केले. त्यामुळे कंपनीच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम यासारख्या प्लेटफॉर्मवर लोकांनी चुकीची माहिती पाहावी लागली. फेसबुकने ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.

वाचाः
अॅड-क्लोकिंग सॉफ्टवेअर ऑनलाइन कंपन्यांचे सर्च इंजिन इंजिनला धोका देण्यासाठी बनवले जाते. क्लोकिंगला याआधीच बेकायदेशीर ठरवण्यात आलेले आहे. फेसबुकने विधी विभागाचे संचालक जेसिका रोमेरो यांनी यासंबंधी बोलताना सांगितले की, थायलंडमध्ये लीडक्लोक नावाच्या कंपनीने जाहिराती धोरणाचे उल्लंघन केले आहे. लीडक्लोकमुळे गुगल, ओथ, वर्डप्रेस, शॉपिफाई आणि अन्य कंपन्यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. याप्रकरणी लीडक्लोकच्या सॉफ्टवेअरचा वापर जागतिक महामारी संकट करोना व्हायरस, क्रिप्टोकरन्सी, औषधे आणि खोट्या बातम्या पसरवण्यासाठी केला जात आहे, हे अत्यंत चुकीचे आहे.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here