सध्या Airtel, Jio आणि Vi ग्राहकांसाठी वेग-वेगळ्या रेंजमध्ये जबरदस्त प्लान्स सादर करत असतात. काही युजर्सना डेटा हवा असतो. तर, काही युजर्सना जास्त बोलायला आवडत असल्यामुळे ते अनलिमिटेड कॉलिंगसह येणारे प्लान्स खरेदी करतात. जर तुम्ही प्रीपेड ग्राहक असाल आणि बाजारात हेवी डेटा असलेला प्लान शोधत असाल. तर तुमच्याकडे सध्या अनेक पर्याय आहेत. आज आम्ही तुम्हाला Airtel, Jio आणि Vi च्या अशा प्रीपेड प्लानची माहिती देत आहो. ज्यामध्ये दररोज ३ GB डेटा दिला जातो. या प्लानमध्ये ग्राहकांना इतरही अनेक फायदे दिले जातात. या प्लान्समध्ये कमी किमतीत दररोज ३ GB डेटा दिला जातो. Airtel ग्राहकांना ५९९ रुपयांचा प्लान ऑफर करते. तसेच, दररोज १०० SMS आणि अमर्यादित व्हॉइस कॉल दिले जातात. जाणून घ्या या प्लान्सबद्दल सविस्तर आणि खरेदी बेस्ट प्लान.

VI कडेही आहेत अनेक प्लान्स

vi-

कंपनीच्या ४७५ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज ३GB डेटा, २८ दिवसांची वैधता, अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि १०० SMS मिळतात. ६९९ च्या प्लानमध्ये ५६ दिवसांची वैधता, दररोज ३ GB डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि १०० SMS मिळतात. कंपनी Disney + Hotstar वर मोफत प्रवेशासह दोन योजना देखील ऑफर करते. पहिला प्लान ६०१ रुपयांचा आहे. यामध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता, दररोज ३ GB डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉल, दररोज १०० SMS आणि १६ GB अतिरिक्त डेटा देखील दिला जातो. दुसरा प्लान ९०१ रुपयांचा आहे. यामध्ये ग्राहकांना ७० दिवसांची वैधता, अमर्यादित व्हॉईस कॉल आणि दररोज १०० एसएमएस दिले जातात.

वाचा : तुमच्या नावावर इतर लोकांनी तर SIM कार्ड काढले नाही ‘असे’ करा माहित, ‘या’ साईटची घ्या मदत

जीओच्या प्लानमध्ये अनेक बेनेफिट्स

Jio च्या ४१९ रुपयांच्या plan मध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता, दररोज ३ GB डेटा, दररोज १०० SMS आणि अमर्यादित व्हॉइस कॉल्स दिले जातात. ६०१ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता, दररोज ३ GB डेटा, अमर्यादित कॉल, दररोज १०० SMS, 6GB अतिरिक्त डेटा आणि Disney + Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी दिले जाते. जिओच्या १,११९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ८४ दिवसांची वैधता, दररोज ३ GB डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि १०० SMS दररोज दिला जातो. या सर्व व्यतिरिक्त, कंपनी ४,११९ रुपयांचा वार्षिक प्लान देखील ऑफर करते. यामध्ये ग्राहकांना दररोज ३ GB डेटा,३६५ दिवसांची वैधता,अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि १०० SMS मिळतात.

वाचा :१००० रुपयांपेक्षा कमीमध्ये घरी येतील ‘हे’ जबरदस्त कूलर्स, कडक उन्हात मिळेल जबरदस्त कुलिंग, पाहा डिटेल्स

६९९ रुपयांच्या प्लानमध्ये अनेक फायदे

६९९ रुपयांच्या प्लानमध्येही मिळतात अनेक फायदे: याशिवाय, ६९९ रुपयांच्या प्लानमध्येही मिळतात अनेक फायदे मिळतात. तुमचे बजेट थोडे अधिक असेल तर कंपनी तुमच्यासाठी ६९९ रुपयांचा प्लान देखील ऑफर करते. या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज ३ GB डेटा दिला जातो. तसेच या प्लानची वैधात देखील चांगली आहे. ६९९ रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला तब्बल ५६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. तसेच, यामध्ये तुम्ही अमर्यादित कॉलचा आनंद घेऊ शकता. रोज १०० SMS ची सुविधा देखील या प्लानमध्ये मिळेल.

वाचा Vodafone-Idea यूजर्सना मोठा झटका, कमी झाली ‘या’ सर्व्हिसची व्हॅलिडिटी, पाहा डिटेल्स

​एअरटेलचा ५९९ रुपयांचा प्लान

एअरटेलचा ५९९ रुपयांचा प्लान आहे मस्त: एअरटेल कंपनी कायमचा ग्राहकांसाठी वेग- वेगळे प्लान्स ऑफर करत असते. तुम्ही एअरटेल युजर असाल तर तुमच्याकडे सध्या अनेक पर्याय आहेत,. कंपनी ग्राहकांना ५९९ रुपयांचा प्लान ऑफर केला आहे. यामध्ये ग्राहकांना २८ दिवसांच्या वैधतेमध्ये दररोज ३ GB डेटा दिला जातो. यासोबतच या प्लानमध्ये अँलिमिटड व्हॉईस कॉल आणि दररोज १०० एसएमएस देखील दिले जातात. इतकेच नाही तर डिस्ने + हॉटस्टार मोबाईल ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक वर्षासाठी मोफत प्रवेश देखील दिला जातो.

वाचा : Excitel ने आणला 400 Mbps चा स्वस्त प्लान, JioFiber-Airtel चे टेन्शन वाढणार, पाहा किंमत

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here