नवी दिल्लीः अॅपल कंपनीचा सर्वात स्वस्तातील iPhone SE 2 या महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. येत्या १५ एप्रिलला हा स्मार्टफोन लाँच होणार आहे. गेल्या काही दिवसापासून या फोनची चर्चा आहे. हा स्मार्टफोन ३१ मार्चला लाँच करण्यात येणार होता. परंतु, भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने या फोनची लाँचिंग पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर हा फोन ३ एप्रिलला लाँच होणार असल्याची बातमी समोर आली होती. परंतु, आता हा आयफोन १५ एप्रिलला लाँच होणार आहे. तर २२ एप्रिलपासून या फोनची विक्री करण्यात येणार आहे. काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, या फोनला कंपनी 9 या नावाने लाँच करू शकते.

वाचाः

या आयफोनच्या लाँचआधी अनेक रिपोर्ट्स लीक झाले आहेत. यात फोनची डिझाईन आणि फीचर्सची माहिती आहे. लाँच होणारा आयफोन हा २०१६ साली आलेल्या iPhone SE चे अपग्रेडेड व्हर्जन असणार आहे. या आयफोनच्या डिझाईन संदर्भात आलेल्या माहिती नुसार, या फोनमध्ये iPhone 8 चे फीचर्स पाहायला मिळतील. कंपनीने आयफोन SE 2 मध्ये टच आयडी फीचर दिले होते. तसेच अनेक युजर्संना या फोनध्ये फेस आयडी देण्याची शक्यता आहे. हा फोन गोल्ड, सिल्वर आणि ग्रे या तीन रंगात लाँच करण्याची शक्यता आहे.

वाचाः

या आयफोनच्या वैशिष्ट्यावर एक नजर टाकल्यास या फोनमध्ये सीरिजमधील A13 बायॉनिक चिपसेट दिला जाण्याची शक्यता आहे. फोनमध्ये कंपनी ३ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज आणि १२८ जीबी स्टोरेज या पर्यायामध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. फोनचा डिस्प्ले हा ४.७ इंचाचा असू शकतो. तसेच या फोनमध्ये एलसीडी स्क्रीन यासारखे फीचर देण्यात येणार आहेत.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here