स्मार्ट टीव्हीमुळे आता घरबसल्याच थिएटरचा आनंद मिळत आहे. स्मार्ट टीव्हीला सहज मोबाइल व इंटरनेट कनेक्ट होत असल्याने सहज कोणत्याही चित्रपट व वेब सीरिजचा आनंद घरबसल्या घेता येतो. मोठी स्क्रीन, दमदार साउंड व इतर फीचर्समुळे घरीच अगदी थिएटरचा अनुभव मिळतो. या सर्व गोष्टींमुळे अनेकजण नियमित टीव्ही खरेदी करण्याऐवजी स्मार्ट टीव्हीला प्राधान्य देत आहेत. विशेष म्हणजे बाजारात अगदी कमी बजेटमध्ये येणारे चांगले स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत. तुम्ही देखील नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात एकापेक्षा एक दमदार पर्याय उपलब्ध आहेत. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर (Flipkart) बंपर डिस्काउंटसह काही स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत. तुम्ही फ्लिपकार्टवरून Infinix, Candes, Samsung, Onida आणि Vu या कंपन्याचे स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. या टीव्हींवरील ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Infinix X1 Full HD LED Smart Android TV

infinix-x1-full-hd-led-smart-android-tv

Infinix X1 Full HD LED Smart Android TV ची मूळ किंमत २४,९९९ रुपये आहे. मात्र, २० टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही १९,९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. हा टीव्ही ४३ इंच स्क्रीनसह येतो. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास या टीव्हीवर १ हजार रुपये कॅशबॅकचा फायदा मिळेल. तसेच, ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. अशाप्रकारे टीव्हीला ७,९९९ रुपये किंमतीत तुम्ही खरेदी करू शकता.

वाचा – पूर्ण ३१ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह लाँच झाले दोन स्वस्त प्रीपेड प्लान्स, डेटा-कॉलिंगसह अनेक बेनिफिट्स, रिचार्जची किंमत फक्त…

​Candes Full HD LED Smart Android TV

candes-full-hd-led-smart-android-tv

Candes Full HD LED Smart Android TV ची मूळ किंमत २९,९९० रुपये आहे. परंतु, तुम्ही ४५ टक्के डिस्काउंटनंतर १६,४८९ रुपयात खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर टीव्हीवर ८२५ रुपये डिस्काउंटचा फायदा मिळेल. यामध्ये ४० इंच डिस्प्ले दिला आहे. तसेच, Netflix, Prime Video, Disney+Hotstar आणि Youtube अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळतो. यात गुगल असिस्टेंट आणि क्रोमकास्ट इन-बिल्टचा सपोर्ट दिला आहे. हा टीव्ही अँड्राइड ओएसवर काम करतो.

वाचा: भन्नाट ऑफर! ५०MP कॅमेऱ्यासह येणाऱ्या Moto च्या ‘या’ स्मार्टफोनला खूपच स्वस्तात खरेदीची संधी, सेलचा आज शेवटचा दिवस

​Samsung HD Ready LED Smart TV

samsung-hd-ready-led-smart-tv

Samsung HD Ready LED Smart TV हा ३२ इंच डिस्प्लेसह येतो. या टीव्हीची मूळ किंमत २२,९०० रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवरून फक्त १६,९९० रुपयात खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास ८५० रुपये कॅशबॅकचा फायदा मिळेल. तसेच, टीव्हीवर ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळतो. दोन्ही ऑफर्सचा पूर्ण फायदा मिळाल्यास सॅमसंगच्या या टीव्हीला फक्त ५,१४० रुपयात खरेदी करता येईल.

वाचा: विजेशिवाय चालतात ‘हे’ हटके एसी, होईल हजारो रुपयांची बचत; जाणून घ्या किंमत

​Onida HD Ready LED Smart TV

onida-hd-ready-led-smart-tv

Onida HD Ready LED Smart TV मध्ये ३२ इंच डिस्प्ले दिला आहे. या टीव्हीची मूळ किंमत २३,४९० रुपये आहे. परंतु, १२,९९९ रुपयात फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास यावर अतिरिक्त डिस्काउंटचा फायदा मिळेल. ऑफरचा फायदा मिळाल्यास हा टीव्ही फक्त १२,३४९ रुपयात तुमचा होईल. या टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि यूट्यूब सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट दिला आहे. यात २० वॉट साउंड आउटपूट दिले आहेत.

वाचा: Jio चा स्वस्तात मस्त प्रीपेड प्लान! दररोज ३ जीबी डेटा-अनलिमिटेड कॉलिंगचा मिळेल फायदा, पाहा डिटेल्स

​Vu Premium HD Ready LED Smart TV

vu-premium-hd-ready-led-smart-tv

Vu Premium HD Ready LED Smart TV ची मूळ किंमत जवळपास २० हजार रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवरून ३७ टक्के डिस्काउंटनंतर फक्त १२,४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास ५ टक्के कॅशबॅकचा फायदा मिळेल. यावर ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर्सचा देखील फायदा मिळेल. या सर्व ऑफर्सचा फायदा मिळाल्यास टीव्ही फक्त ८७४ रुपयात तुमचा होईल. हा ३२ इंच टीव्ही दमदार फीचर्ससह येतो.

वाचा: Flipkart वर सुरू होतोय खास सेल, आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत मिळतील स्मार्टफोन्स; डिस्काउंट-ऑफर्सचा पाऊस

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here